डॉक्टरांचे अक्षर इतके खराब का असते..? मेडिकलवाले खराब अक्षर कसे काय ओळखतात..?
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो तुम्ही विचार करत असाल कि डॉक्टरांचे अक्षर इतके खराब का असते..? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्याच डॉक्टरांचे अक्षर खराब नसते. हे खरे आहे कि १ ते २% च डॉक्टरांचे अक्षरचं फक्त चांगले असते.
तर मित्रांनो डॉक्टर होण्याच्या अगोदर ते खूप साऱ्या परीक्षा देऊन पास होतात. त्यामध्ये खूप सारा अभ्यास करावा लागतो, खूप लिखाण करावे लागते. एवढा अभ्यास व लिखाण करून ते डॉक्टर होतात. खूप जास्त लिखाण करून त्याचे अक्षर खराब होते. आणि त्यांच्या अक्षर खराब असण्याचं हेच मूळ कारण आहे.
हे कारण आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही कारण आहेत. डॉक्टर झाल्यांनतर त्यांना वोर्कलोड खूप असतो. डॉक्टरांना खूप साऱ्या प्रिस्क्रिप्टशन लिहायला लागतात. एका तासाच्या आत ३० ते ४० पेशंट तपासायचे असतात. डॉक्टरांच्या वर वेळेची मर्यादा असते.
तसेच डॉक्टरांना डॉक्युमेंट्स मध्ये खूप डिटेल लिहायला लागतात. डिस्चार्ज, एक्सरे स्लिप, रेफेरल फॉर्म, ड्रग चार्ट अशा खूप साऱ्या गोष्टींचे लिखाण करावे लागते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हॉस्पिटल मधले प्रेशर हे काही वेगळेच असते.
म्हणून डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी ते ५ सेकंड लावण्या ऐवजी ते फक्त २ सेकांदातच लिहितात. कारण वेळेची बचत करण्यासाठी.
तर मित्रांनो आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न निर्माण झाला असेल कि मेडिकल मधील फार्मासिस्ट हे अक्षर कसे ओळखतात..? तर मित्रांनी त्यांना अनुभव असतो डॉक्टरांच्या हॅन्डव्हरायटिंगचा. ज्या वेळेस तुम्ही डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शन फार्मासिस्ट ला देता त्यावेळी फक्त ते बघून आयडिया लावतात कि या आजारावर हेच औषध आहे म्हणून.
जर तुम्ही त्याला जाऊन बोललात कि मला खोकला आहे म्हणून आणि प्रिस्क्रिप्शन च्या पहिल्या आणि शेवटच्या अक्षरात औषधाचे नाव आहे आणि त्या व्यक्तीला हा आजार आहे तर ते अंदाज लावून ते औषध देतात. आणि याच अंदाजामुळे मुळे दरवर्षी चुकीच्या औषधामुळे लोकं मरण पावतात.
एकदा भारतीय आयुर्विज्ञान परिषद यांनी डॉक्टर जे औषध लिहून देतात ते प्रिस्क्रिप्शन मध्ये कॅपिटल अक्षरात लिहून देण्यात सांगितले. पण कुठलाही डॉक्टर हे कॅपिटल अक्षरात लिहून देत नाही. कारण या नियमावर कोणताही कायदा नाही किंवा दंडही नाही. पण हे व्हायला पाहिजे.
तुमचे मत काय आहे हे आम्हाला नक्की कळवा.. आणि हि माहिती आवडल्यास शेअर करायला नक्कीच विसरू नका.