या ३ गोष्टी जर तुम्ही करत असाल तर आयुष्यात तुमच्याकडे पैसा कधीच टिकणार नाही..!

या ३ गोष्टी जर तुम्ही करत असाल तर आयुष्यात तुमच्याकडे पैसा कधीच टिकणार नाही..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण प्रत्येकजण दैनंदिन जीवनामध्ये पैसे कमवण्यासाठी खूप करत असतो. कारण पैसा जीवनाला आवश्यक आहे.  कारण पैशांमुळे आपण चांगले शिक्षण घेऊ शकतो,राहण्यासाठी चांगले घर घेऊ शकतो, आपल्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवू शकतो.

थोडक्यात पैशाने आपण चांगल्या सुख-सुविधा मिळवू शकतो. जेणेकरून आपलं आयुष्य सुखकर होईल. पण आजकाल असे दिसून येते कि माणसं पैसे कमवतात पण त्यांना ते नेहमी कमीच पडतात. थोडक्यात कितीही पैसे कमवले तरी ते टिकत नाहीत. आर्य चाणक्यांनी घरात पैसे ना टिकण्याची ३ कारणे सांगितली आहेत. चला तर मग आज जाणून घेऊयात काय आहेत ती ३ कारणे.

१. पहिले कारण मूर्ख लोकांचा सन्मान:- चाणक्य सांगतात ज्या घरात मूर्ख लोकांचा सन्मान केला जातो तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. मूर्ख म्हणजे त्यांना अज्ञानी म्हणायचे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आपण बघतो हे बुवा,बाबा जी लोक असतात ती भोळ्या भाबड्या लोकांचा फायदा उचलतात. त्यांना महागड्या गोष्टी करायला सांगतात.

जसे कि तुम्ही या खड्याची अंगठी घाला, तुमचं घर योग्य दिशेला नाही याची मोडतोड करावी लागेल वगैरे वगैरे…  मग अशा लोकांचे सगळे पैसे इथेच खर्च होतात. तस पाहायला गेलं कि या बुवा बाबांकडे काही ज्ञान नसते. ते फक्त फालतू गोष्ट करायला सांगतात. त्याच्या मागे सुद्धा काही फालतू कारणे सांगतात. ज्याला शास्त्रीय आधार नसतो.

अशा लोकांची जी पूजा करतात त्यांच्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. पण ज्या घरात ज्ञानी व्यक्तींची पूजा होते ते घर नेहमी प्रगती पथावर असते. अशा घरातील लोक नोकरी किंवा धंदा करत असतील तर त्यांच्या क्षेत्रातील जे टॉप लोक आहेत त्यांचे ते मार्गदर्शन घेतात. त्यांचे थेट मार्गदर्शन भेटत नसेल ते लोक पुस्तक वाचतात. अशा प्रकारे त्यांची प्रगती होत जाते आणि लक्ष्मी त्यांच्या घरी येतेच आणि तिथे कायम वास करते.

२. धन धान्याची नासाडी:-  चाणक्य सांगतात ज्या घरात धन धान्याचा संचय केला जातो तिथे कष्टाची किंमत आहे आणि तिथे लक्ष्मी नेहमीच वास करते. चाणक्यांनी त्यांच्या काळात धन धान्य सांगितले पण आजच्या काळात आपण सेव्हिंग म्हणजेच गुंतवणूक म्हणू शकतो. ज्या व्यक्तीला सेव्हिंग ची किंमत नाही त्याचा फक्त पैसे उधळण्यावर भर असतो.

तो नेहमी म्हणतो कि उद्याच कोणी बघितलय आजच मज्जा करून घ्या आणि अशी वाक्य वापरून तो जेवढे पैसे कमावलेले असतात ते महागड्या गोष्टींवर खर्च करतो. पण अशा व्यक्तीच्या आयुष्यात अचानक काही संकट ओढवले म्हणजे कोणी आजारी पडले किंवा कोणाला नोकरीवरून काढून टाकले , धंदा ठप्प झाला अशा वेळेस या लोकांकडे काही गुंतवणूक नसते.

म्हणून हि लोक कर्ज काढतात लोकांकडे पैसे मागतात अशा लोकांकडे लक्ष्मी कधीच टिकत नाही. पण जे शहाणे असतात त्यांना माहित असते कि आपल्यावर कधीही आपत्ती येऊ शकते अशा वेळेस त्यांनी गुंतवणूक केलेले पैसे त्यांच्या कामाला येतात. आणि येणाऱ्या आपत्तीला ते शांत चित्ताने तोंड देतात. त्यामुळे जी व्यक्ती सेव्हिंग करत नाही त्या व्यक्तीच्या घरात कधीच लक्ष्मी टिकत नाही.

३. ज्या घरात नवरा बायकोंचे भांडणं होत राहतात:- चाणक्य सांगतात ज्या घरात पती पत्नी सामंजस्याने राहतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांचा आदर करतात, एकमेकांच्या आवडी निवडी जपतात अशा घरात लक्ष्मी कायम वास करते. पण ज्या घरात पती पत्नी सारखे भांडत असतात  एकमेकांना टचके टोमणे मारतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून घटस्फोटाची भाषणे करतात अशा घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही.

अशा घरात पती पत्नीचे सामंजस्य नसल्यामुळे दोघे पण आनंद बाहेर शोधतात. नवरा दारूच्या आहारी जातो आणि बायको महागड्या गोष्टींच्या मागे जाते. पण आपले जीवन हे आनंदासाठी चालले आहे आणि घरात आनंद भेटत नसल्यामुळे दोघेपण आनंद बाहेर शोधतात आणि मग यांचे सगळे पैसे तिथेच खर्च होतात.

दोघांच्या अशा वागणुकीमुळे मुलांवर संस्कार सुद्धा नीट होत नाही. त्या मुळे अशा घरांवर लक्ष्मी कधीच टिकत नाही. त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी किंवा पैसे टिकवायचा असेल तर नवरा बायकोने एकमेकांची माने समजून घेतली पाहिजेत. समाधानी राहील पाहिजे तरच लक्ष्मी तुमच्या घरी टिकेल.

मित्रांनो थोडक्यात सांगायचे तर चाणक्य सांगतात ज्या घरात मूर्खांची पूजा होते, धान्याचा संचय होत नाही , आणि ज्या घरात नवरा बायको सारखे भांडत असतात त्या घरात लक्ष्मी म्हणजे म्हणजेच पैसा कधीच टिकत नाही.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती शेअर करायला जरूर विसरू नका.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *