जर तुम्हीसुद्धा रोज दही खात असाल तर हि माहिती एकदा नक्की वाचा..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी कॅलशियम आणि व्हिटॅमिन ची गरज असते. दह्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे दररोज दही खाणे हे फायदेशीर आहे. पण जर तुम्हाला कफ किंवा सर्दीचा त्रास असेल तर दह्यासोबत ओवा मिसळून खाल्ल्यास खूप फायदा होतो.
दही शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करते. रोज दही खाल्ल्याने आपले शरीर थंड राहते आणि उष्णतेच्या समस्या आपल्यापासून दूर राहतात. मित्रांनो तोंड आल्यांनतर उष्णेतेमुळे आपल्याला काहीच खाता येत नाही. अशा वेळी ज्या ठिकाणी तोंड आले आहे त्या ठिकाणी थोडे दही लावावे. दिवसातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करावा. तोंडातील छाल्यांसाठी हा रामबाण उपाय आहे.
दही आपली पचनशक्ती वाढवते. दह्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे उकचरक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल मुळे होणारे हुर्दयाचे विविध आजरा थोडा कमी होतो. दह्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपली हाडं आणि दात मजबूत होतात. दही म्हणजे इन्स्टंट एनर्जी सोर्स आहे.
जर तुम्ही बाहेरून आला आहात आणि आणि तुम्ही दही खाल्ले तर तुम्हाला लगेच फ्रेश आणि ताजेतवाने वाटेल. जर तुमची त्वचा उन्हामुळे काळी झाली असेल तर अशावेळी दही लावल्याने त्वचा निखरते. दह्यामुळे केसांमध्ये चमक येते. दह्याने केस धुतले तर कोंडा नाहीसा होतो. पण असं करत असताना केस लगेच सुकवले गेले पाहिजेत. हे होते दही खाण्याचे फायदे.
पण दही खात असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी ती म्हणजे दही हि नेहमी ताज खावं. शीळ किंवा आंबट दही कधीच खाऊ नये तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळतील.
तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती शेअर करायला जरूर विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.