मयत घेऊन नाचणारे लोकं आहेत तरी कोण..? काय आहे यामागील सत्य जाणून घ्या..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोण आहेत हे लोकं ..? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. आपला भारत देश हा विविध संस्कृतींनी भरलेला देश आहे. भारत हा एकमेव असा देश आहे जिथे आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती एकत्र पाहायला मिळतील.

जन्म आणि मृत्यू हे आजपर्यंत कोणाला चुकले नाही आणि भारत ठराविक वेळेत घडणाऱ्या गोष्टींसाठी वेगवेगळे विधी केले जातात. त्यामध्ये मृत्यूनंतर केले जाणारे विधी आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहेत. भारतात मरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण सर्व विधी करून आपण रडत रडत अलविदा करतो.

पण असे किती लोक आहेत ज्यांना असं वाटत तो व्यक्ती मेल्यांनंतर त्याच दुःख न करता त्याच सेलिब्रेशन केलं जावं. काही दिवसांपूर्वी इंटरनेट वर एक व्हिडीओ वायरल झाला होता. त्यामध्ये चक्क शवपेटी घेऊन नाचणारे लोक तुम्ही पाहिले  असतील. यामध्ये ५-६ लोक मेलेल्या व्यक्तीला नाचत नाचत अलविदा करत आहेत.


या व्हिडिओचा वापर करून बरेच मिम्स देखील वायरल झाले होते. तुम्हाला देखील नक्कीच असा प्रश्न पडला असेल कि नक्की हा विडिओ आहे तरी कुठला..? नक्कीच हा विडिओ भारतातील नाही आहे, तर हा विडिओ “घाना” देशातील आहे. तिथल्या प्राचीन प्रथेप्रमाणे मृताला असं नाचत नेलं जात. मेलेल्या माणसांची यात्रा धुमधडाक्यात व्हावी असा तेथील लोकांची समजूत आहे,. हि प्रथा आजही तितक्याच जोरदार पद्धतीने चालू आहे.

यासाठी नाचणाऱ्या शववाहकांना भाडे तत्वावर आणलं जातं. या शववाहकांना तिथे प्रचंड मागणी आहे, हे शववाहक नाचतात उड्या मारतात व पेटीला जमिनीवर ठेऊन कलाबाजी करतात. एवढेच नाहीतर शवपेटी हवेत फेकून झेलतात देखील. हे करण्यासाठी त्यांना चांगलाच पैसे मिळतो.


हि शवपेटी नेत असताना तुम्ही जितक्या लोकांची करमणूक कराल तितके जास्त पैसे त्यांना या कामाचे दिले जातात. आज हे विडिओ वायरल झाले आहेत तसेच ते २०१५ आणि २०१७ साली झाले होते. सध्या हे विडिओ वायरल होण्यामागचं कारण म्हणजे व्हिडिओसोबत जे गाणं जोडलं आहे ते खूप महत्वाचं आहे. आधी या व्हिडिओमध्ये गाणं नव्हतं पण आता जे व्हिडिओमध्ये गाणं ऐकू येत त्या गाण्याचं नाव आहे “Astronomia”

या गाण्यामुळे हा विडिओ आणखी विनोदी वाटतो. जर तुम्ही हा विडिओ पहिला नसेल तर यूट्यूब वर जाऊन “Astronomia” सर्च करून नक्की पहा. आणि हि माहिती आवडली असल्यास शेअर करायला नक्कीच विसरू नका.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *