छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला दूसरा राज्याभिषेक? फक्त १% लोकांना माहिती असलेला इतिहास.
छत्रपती महाराजांचा पहिला राज्यभिषेक गागा भट्टानी केला हे सर्वांना माहिती असेलच. पण महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाल्याची संपूर्ण माहिती श्री शिवराज्याभिषेक कल्पतरु या संस्कृत अध्यात्मिक ग्रंथामध्ये आहे. या ग्रंथाचे लिखाण निच्चलपुरी गोसावी या साधूंनी केले आहे. जे पहिल्या राज्याभिषेकाला हि उपस्थित होते.
या ग्रंथामध्ये असे सांगितले आहे कि गागा भट्टानी केलेल्या राज्याभिषेकामध्ये काही चुका घडल्या आणि त्याचे परिणाम पुढे भोगावे लागले. शिवरायांच्या पत्नी गागा भट्टांच्या आगमननंतर मरण पावल्या. प्रतापराव गुजर हे नेसरीच्या लढाईत मारले गेले. शिवराज्याभिषेक दरम्यान एका मोठ्या अपघातात एक लाकूड पडले. ते लाकूड गागा भट्टांच्या नाकाला लागले. राजपुरोहित बाळंभट्टांच्या मस्तकावर देखील स्तंभावरील एक फुल गळून पडले. पहिल्या राज्याभिषेकावेळी गडावरील शिरकाई भवानीची पूजा झाली नव्हती.
कोकणच्या भार्गवरामची हि पूजा बांधणी नव्हती. सिंहासनास आधार देण्यास मंत्रविद्येचा आश्रय घेण्यात आला नव्हता. गडांच्या महाद्वाराच्या रक्षण करणाऱ्यांचे पूजन केले नव्हते. सिंहासन रोहनच्या वेळी संभाजी महाराजांच्या मस्तकावरून २ मोती ओघळले. शिवाजी राजांच्या जवळील कट्यार म्यानबद्ध नाही असेही त्यांना आढळून आले. राज्याभिषेकाच्या रथात मिरवणुकिच्या वेळी महाराज चढत असताना कणा वाकला म्हणून राजांची हत्तीवरून मिरवणूक काढावी लागली. त्यांची प्रत्यंचा ओढत असताना महाराजांच्या बोटातील अंगठी गळून पडली.
एकंदरीत हे अनेक अपशकुन झाल्यांनतर निच्चलपुरी महाराजांना येऊन भेटले आणि हे राजा राज्याभिषेकाच्या तेराव्या, बाविसाव्या. पंचवनव्या आणि पाससठाव्या दिवशी अशुभ घटना घडतील. महाराजांनी प्रथम या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले परंतु तेराव्या दिवशीच राजमाता जिजाऊ सोडून गेल्या. बाविसाव्या दिवशी हत्ती मरण पावला. असे अजून काही प्रसंग घडल्यानांतर महाराजांनी निच्चलपुरींना बोलवून घेतलं आणि सांगितले आपल्या बोलण्याचा मला पडताळा आला आहे.
आपण मला तांत्रिक विधीने अभिषेक करावा. नांतर निच्चलपुरींनी मंत्र म्हणणारे साधू निवडले आणि शुभदिवस बघून हे कार्य सुरु झाले. अश्विन पंचमीला अभिषेक केला तसेच सिंहासनपाशी समंत्र भूमी शुद्ध केली. नवे सिंहासन मांडले, सिंहासनाच्या सिंहाची पूजा पार पडली. अनेक देवीदेवतांची पूजा केली. सिंहासनाच्या आठही सिंहास राजांनी बळी दिले.
अशाप्रकारे अनेक विधी पार पडून दुसऱ्या वेळी राज्याभिषेक पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. या ग्रंथाची सध्या एकच प्रत उपलब्ध आहे व ती Royal Asiatic Society येथे आपणास पाहायला मिळते. या ग्रंथाच्या श्लोकावरून असे वाटते कि जिंजेच्या वेढ्यातून राजाराम महाराज जेव्हा सुटून आले तेव्हाच या ग्रंथाचे लिहून केले असावे.
यावर काही इतिहासकार १०० टक्के विश्वास ठेवतात तर काहीजण म्हणतात यातील सर्व लिखाण खरं नाही आणि यातील काहीच गोष्टी फक्त खऱ्या आहेत. हे लिखाण किती टक्के खरे आहे हे माहिती करून घेण्यापेक्षा हि माहिती तेव्हाच लिहिली गेली असल्याने त्याची नोंद घेणे गरजेचे आहे.
मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती आवडली असेल, आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.