तुमच्या पती-पत्नी मध्ये हा गुण असेल तर तुम्ही गरीबच राहनार.नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया कशाप्रकारे तुमच्या काही वाईट गुणांमुळे तुम्ही स्वतःवर गरिबी ओढवून घ्याल.

ज्या गुणांबद्दल,सवयींबद्दल,स्वभावाबद्दल आपण ही पोस्ट वाचत आहात तर हा गुण स्त्रियांसोबत पुरुषांमधेहि काही प्रमाणात दिसून येतो. जर तुमची हि विचारसरणी अशीच असेल तर लवकरात लवकर स्वतःमध्ये  बदल करण्याचा प्रयत्न करा.

सध्या लोकांचे राहणीमान बदलत आहे. प्रत्येकजण स्वतःला स्टॅंडर्ड पणे दाखवण्याचा प्रयत्न करतो. शेजारच्याने ब्रँडेड कार ,ब्रँडेड साडी अथवा ड्रेस विकत घेतला म्हणून आपणही त्या साठी हट्ट धरायचा. दुसरे लोक करतात म्हणून आपणही करायचं. स्वतःकडे महागडी गाडी , बंगला  असलं म्हणजे आपली प्रतिमा उठून दिसते. आणि त्यामुळेच सुख मिळते हीच संकल्पना नुकसानीसाठी कारणीभूत ठरते.

उदा. शेजारच्यांनी अथवा मित्रमैत्रिणिने १० लाखाची कार विकत घेतली म्हणून आपणही  १२ लाखाची कार विकत घायची. त्यांच्यापेक्षा मोठं बनायचं. सगळ्यात महागडी कार आपल्या दारात उभी आहे याची जाणीव समाजाला करून द्यायची. या साठी महिन्याचा इनकम  ४० हजार असून देखील २० हजार EMI भरून कार घरी आणली जाते. बाकी राहिलेले २० हजार घर खर्च व इतर गोष्टींमध्ये खर्च होऊन जातात आणि सेविंग पूणर्पणे ० होते.

सेविंग जर तुम्ही करत नसाल आणि पैशाचे नियोजन केलेले नसेल तर प्रगती होणे निवळ्ळ अशक्य आहे. संपूर्ण आयुष्य गरिबीमध्येच व्यतीत करावे लागेल. 

साधा प्रयोग करून पहा. 


तुमच्या घरामध्ये अनेक वस्तू असतील. त्यामधील टॉप १० वस्तूंची लिस्ट पहा म्हणजेच सर्वात १० महागड्या वस्तूंची नावे लिहा व त्याची किंमत लिहिलेल्या प्रत्येक गोष्टींविषयी विचार करा. खरंच हि घेतलेली वस्तू योग्य आहे का?  या मध्ये बऱ्याच वस्तू अजूनही कमी किमतीत मिळाल्या असत्या किंवा या मधील बऱ्याच वस्तू अशा असतील ज्या घेतल्या नसत्या तरी काही फरक पडला नसता. विनाकारण त्या वस्तू विकत घेतल्या त्याची काहीही गरज नव्हती. त्या वरती होणार खर्च टाळला असता तर बचत झाली असती. किंवा ब्रँड च्या नावाखाली आपण जो खर्च केला तो कमी पैशामध्ये सुद्धा होऊ शकला असता. त्या मध्ये सुद्धा आपण बचत करू शकलो असतो.

मोबाईल साठी ३० हजार ते  ५० हजार खर्च केला जातो पण त्या मधील आउटपुट काय.?  कशासाठी खर्च ?
खरंच त्या मधून असा वेगळा फायदा होईल का? याचा विचार करायला हवा.  ते काम १० ते १५ हजार वॉल मोबाइल देखील करू शकतो.

Team DarjaMarathi

One thought on “तुमच्या पती-पत्नी मध्ये हा गुण असेल तर तुम्ही गरीबच राहनार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *