आधार कार्ड मोबाईल वर डाउनलोड करायचंय..? तर हि ट्रिक नक्की वापरा..!

नमस्कार मित्रांनो आज पण जाणून घेऊया आपलं आधार कार्ड कशाप्रकारे आपल्या मोबाइल मध्ये डाउनलोड करू शकता.

मित्रांनो अनेकवेळा  आधार कार्ड आहे ते आपण विसरून राहतो आणि त्या नंतर आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात. आज मी या पोस्ट मध्ये तुम्हाला सांगणार आहे कि कशाप्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाइलला मध्ये अथवा कॉम्पुटर मध्ये त्याची ओरिजिनल प्रिंट डाउनलोड करू शकता. जेणेकरून ती प्रिंट तुमच्या मोबाइल मध्ये नेहमी तुमच्या सोबत राहील.

सर्वात प्रथम तुम्ही गूगल  ला जाऊन Download  aadhar  card असं लिहून सर्च करा.  त्या नंतर तुम्हाला Uidai.gov.in ची लिंक दिसेल त्या वरती क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला तिथे एक Get Aadhar Card असं ऑप्शन दिसेल त्या मध्ये Download aadhar card त्या वरती क्लिक करा.

त्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेज दिसू लागेल.

तुमच्याकडे enrolment  number  असेल तर तो सिलेक्ट करा. आणि आधार असेल तर तो तुम्ही सिलेक्ट करून तुमचा आधार कार्ड नंबर तिथे टाकायचा आहे. तसेच खाली तुमचे पूर्ण नाव (जसे आधार कार्ड वर दिलं  असेल तसेच )  नतंर तुम्हाला पिनकोड , सेक्युरीटी कोड टाकायचा आहे.

सर्व माहिती टाकून झाल्यावर Confirm  वर क्लिक करा त्या नंतर आधार कार्ड सोबत रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबर वर तुम्हाला एक One Time Password मिळेल.

Passwrd इथे टाकल्या नंतर खाली तुम्हाला एक Survey  दिसेल. कोणत्याही Options  वर सिलेक्ट करून तुम्हाला खाली Download  Aadhar वर  क्लिक करून तुमचं आधार PDF फॉरमॅट मध्ये डाउनलोड होईल. 
डाउनलोड केल्या नंतर तुम्ही ती डाउनलोड केलेली फाईल जेव्हा ओपन करायला  जाल तेव्हा तुम्हाला एक paasword टाकण्यासाठी बोलले जाईल. तो पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाचे पहिले चार अक्षरे आणि तुमचं birth Year  टाकायचं आहे. 

उदा.  amit1990

नंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड आधार कार्ड दिसू लागेल. 
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाइल मध्ये अथवा कॉम्पुटर मध्ये सेव्ह करू शकता जेणेकरून अनेकवेळा आधार कार्ड नसताना जी अडचण येते ती तुम्हाला येणार नाही. 
तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत शेअर करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *