गणेश पूजनाकरिता या ठिकाणी करावी लागते एक वर्ष अगोदर नोंदणी..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला १ हजार वर्ष जुन्या गणेश मंदिरात पूजा करण्यासाठी १ वर्ष आधी करावे लागते बुकिंग आणि ते बुकिंग कसे करावे लागते आणि का करावे लागते याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो सर्वत्र गणेश उस्तवाचा सण मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो. या ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही एका खास गणेश मंदिराविषयी सांगणार आहोत.

राजस्थान च्या बांसवाड जिल्ह्यातील तळवाडा येथे ११व्या शतकातील श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. या मंदिरावर २८२ सुवर्ण कळस आहेत. इथे श्रीकृष्ण जन्मोस्तवाप्रमाणेच गणेश जन्मोत्सव साजरा करण्याची देखील मोठी परंपरा आहे. या निमित्ताने गणपतीला पाळण्यात ठेऊन झोका देण्याची प्रथा आहे. या मंदिराची लोकप्रियता एवढी आहे कि गणेशोस्तवानिमित्त पूजा अर्चना करण्यासाठी १ वर्ष आधीच बुकिंग करावी लागते.

खास गोष्ट म्हणजे येथील गणरायाची मूर्ती चिंचेच्या झाडाखाली आहे. यामुळे या मंदिराचे नाव हिंदीत आमलीया गणेश मंदिर असे देखील आहे. तर मित्रांनो तुम्हाला या मंदिराबद्दल हि माहिती आवडली असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *