थंडी पडण्यामागचं कारण काय.? । काहीच लोकांना माहित असेल याचं खरं कारण

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जरा ऋतू बदलला किंवा हवा बदलली कि आपल्याकडे हवापाण्याच्या गप्पा सुरु होतात. ” यंदा म्हणावी तशी थंडी नाही, यंदा थंडी जरा जास्तच आहे ” अशी वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात. उत्तर भारत गारठला, थंडीमध्ये स्वेटर किंवा हिटर च्या मागणीमध्ये वाढ अशा बातम्याही तुम्हाला वाचायला मिळतात. पण हा हिवाळा दरवर्षी कसा येतो? किंवा हि थंडी नेमकी कशी पडते असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.

solarsystemscope.com

आपली पृथ्वी स्वतःभोवती जवळपास २४ तासांमध्ये पूर्ण करते. त्यामुळे कोणत्याही वेळेला पृथ्वीच्या अर्ध्या भागामध्ये उजेड तर अर्ध्या भागामध्ये अंधार असतो. पण हि पृथ्वी काही स्वतःमध्ये सरळ फिरत नाही. आपली पृथ्वी एका बाजूला २३.५ अंशामध्ये कललेली आहे हे तुम्ही वाचलं असेल. हि अशी २३.५ अंशामध्ये कललेल्या अवस्थेत पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. त्यामुळे पृथ्वीचा जो गोलार्थ सूर्याच्या जवळ असतो त्याच्यावर सूर्याची थेट किरणे पडतात. आणि जो दूर असतो त्यावर तिरपी किरणे पडतात. जिकडे डायरेक्ट किरणे पडतात तिथे उन्हाळा ऋतू तयार होतो. आणि जिथे तिरपी करीन पडत असतात तिथे हिवाळा तयार होतो किंवा थंडी वाजायला लागते.

सूर्याची किरणे कथेत किंवा तिरपी पडल्यामुळे काय फरक पडतो हे जाणून घेऊया.


earthonlinemedia.com

जेव्हा एखाद्या भागावरती अगदी थेट किरणे पडतात तेव्हा कमीत कमी जागेवर ऊर्जेचं केंद्रीकरण होत. आणि साहजिकच तिथलं तापमान वाढत. उन्हाळ्यात हेच तर होत असतं. आणि जेव्हा तीच किरणे तिरपी पडतात तेव्हा हि किरणे जास्त जागा व्यापतात आणि ती ऊर्जा विभागली जाते. म्हणजेच ती उन्हाळ्याइतकी तीव्र नसतात. आपल्या देशाचा बहुतांश भाग उष्णकटिबंधामध्ये असल्यामुळे आपल्याला एक्दम कडाक्याची थंडी जाणवत नाही. जसजसं आपण उत्तरेला जाऊ तसतशी थंडी वाढत गेल्याच दिसून येत. आपल्याकडे थंडीमध्ये दक्षिणेच्या राज्यांचा पारा थोडासा उतरतो. पण उत्तर भारतामध्ये मात्र चांगलीच थंडी पडते.

आता आपण  हिवाळ्यात जम्मू काश्मीर,हिमाचल , उत्तराखंड मध्ये बर्फ का पडतो हे जाणून घेणार आहोत. 

pexels.com

उत्तर भारतामध्ये येणाऱ्या थंडीच्या लाटेचा उगम वेस्टर्न डिस्टंबन्स मध्ये आहे. भूमध्य समुद्र, अटलांटिक समुद्र, कॅस्पियन समुद्र, काळा समुद्र त्याच्यावरती तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र इराण,अफगाणिस्थान,पाकिस्तान,मध्ये येत येत भारताजवळ येतात. त्यांना वेस्टर्न डिस्टंबन्स म्हणतात. भारताजवळ आली कि इथे आपला हिमालय पर्वत त्यांना अडवतो. मग त्या वेस्टर्न डिस्टंबन्स ला उत्तरेला जावं लागतं. पण स्बट्रोपिकल जेट वाऱ्यामुळे कधी कधी वेस्टर्न डिस्टंबन्स हि हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच दक्षिणेला सरकतात. हे गोल गोल फिरणार वार उत्तर भारतातील थंड हवा आणि त्यांनी युरेशिया मधून आणलेलं बाष्प जे आहे म्हणजेच दमट हवा आहे ती एकत्र आणतात. त्यामुळे हवेतल्या बाष्पाचे ढग तयार होतात आणि त्यामुळे पाऊस पडतो किंवा बर्फवृष्टी होते. आणि त्यामुळेच उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल आणि उत्तराखंड मध्ये बर्फ पडतो.

earthobservatory.nasa.gov

आता हे वेस्टर्न डिस्टंबन्स जर स्ट्रॉंग असले तर त्यांचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसून येतो. त्यामुळेच आपल्याकडच्या काही नाशिक, नागपूरसारख्या जिल्ह्यात एकदम पारा खाली उतरल्याचे जे दिसतं ते यामुळेच होत. जर किमान तापमान सामान्य अंशांपेक्षा खाली आलं तर त्याला थंडीची लाट आली असे म्हणतात. आणि हे तापमान ६ अंशांनी खाली घसरलं तर त्याला थंडीची तीर्व लाट आली असे म्हणतात.

आता मिळालं थंडी का पडते याचं उत्तर.? आम्हाला आशा आहे कि हि माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्र परिवाराला शेअर करायला नक्की विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *