कुत्रे धावत्या गाडीच्या मागे नेमकं का पळतात ? पहा काय आहे कारण..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो तुम्ही कधी पाहिलं किंवा अनुभवल असेल कि गाडीच्या मागे कुत्रे भुंकत पळत असतात. पण हे कुत्रे का बरं गाडीच्या मागे भुंकत पळत असतील हे जाणण्याचा विचार केलाय का..?
मित्रांनो विविध प्रकारे कुत्रे माणसांची मदत करत असतात. एखादा परका माणूस किंवा प्राणी आला तर कुत्रा गुरगुरतो किंवा भुंकतो. पण मित्रांनो तुम्ही पहिले असेल कि कुत्रे गाडीच्या चाकावर एक पाय वर करून मूत्र करतात. मित्रांनो यामागे ते दुसऱ्या कुत्रांना त्यांची जागा सांगत असतात.
उदा. तुम्ही राहता ठाण्यामध्ये पण तुमचं ऑफिस आहे दादरमध्ये. तर दादरमध्ये गेल्यावर तेथील कुत्रा तुमच्या गाडीच्या चाकावर मूत्र करतो आणि त्या गाडीला आपलंस करतो. तुम्ही दादरहून परत ठाण्याला गेलात तर दुसरा कुत्रा वासावरून त्या गाडीवर दुसऱ्या कुत्र्याने मूत्र केले आहे हे ओळखतो. कारण मित्रांनो त्यांना सहन होत नाही कि दुसरा कोणी कुत्रा त्यांच्या भागामध्ये आलेला. आणि त्याचमुळे ते आपल्या गाडीच्या मागे पळतात.
तसेच मित्रांनो तुम्ही पहिले असेल कुत्रे तुमच्या गाडीच्या खाली झोपतात. त्यांना असे वाटते कि ती जागा त्यांच्या हक्काची आहे. जेव्हा गाडी सुरु होते तेव्हा कुत्रे नाराज होतात. एखाद्या वेळेस त्या गाडीच्या खाली झोपले असता त्या कुत्र्याचा अपघात होतो. त्यावेळेस त्या गाडीचा रंग त्या कुत्र्याच्या लक्षात राहतो. त्या कुत्र्याला त्या गाडीच्या रंगासारखी गाडी दिसली तर ते कुत्रे त्या गाडीच्या मागे लागतात. तसेच त्या गाडीतील व्यक्तीला चावण्याचाही प्रयत्न करतात.
तर मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल कुत्रे आपल्या गाडीच्या मग धावण्याचा कारण. आम्हाला आशा आहे तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असणार. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्कीच विसरू नका.