तुम्हालाही दाढी पिकण्याची समस्या आहे का..? हे घरगुती उपाय एकदा नक्की करा..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केस पिकणे तसे वय वाढण्याची खून असते. आजकाल अगदी तरुणपणी किंवा त्यापेक्षाही कमी वयात अनेकांचे केस, दाढी पिकलेली आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ असा नाही कि त्या माणसाचे वय वाढलंय. मात्र अनेकांना आपल्या पांढऱ्या दाढीमुळे गुणवत्ता असूनही आत्मविश्वासाच्या बाबतीत गडबडायला होते. म्हणून आज आम्ही तुम्हाला यासाठी काही उपाय सांगणार आहोत.

कांद्याचा रस – २ चमचे कांद्याच्या रसात पुदिन्याची पाने, अर्धा वाटी तूरडाळ, आणि एक बटाटा एकत्र कुटा. त्याची पेस्ट दाढीच्या नाजूक केसांना लावा. याने तुमच्या दाढीचे केस हळूहळू काळे होताना दिसू लागतील.

पपईचा रस – पपईचा गर अर्धा वाटी काढून घ्या. त्यात चिमूटभर हळद टाका व त्यानंतर एक चमचा एलोवेराचा ताजा रस या मिश्रणात टाका. हे मिश्रण आपल्या दाढीला लावा. याने सुद्धा दाढी काळी होण्यास मदत होईल.

प्रोटीनयुक्त आहार वाढवा – अनेकदा शरीरात प्रोटिन्सची मात्रा कमी असणे हे सुद्धा दाढी पिकण्याचे महत्वाचे कारण असते. त्यामुळे आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा. त्यासाठी दूध, दही , तूप , हिरव्या पालेभाज्या, डाळी आदींचे सेवन करा.

आवळा – पिकणाऱ्या दाढीवर आवळ्याचा रसही प्रभावी ठरतो. सलग एक महिना आवळ्याचा रस दाढीला लावल्यास दाढी काळसर व्हायला लागते.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि हे उपाय तुम्हाला नक्कीच आवडले असतील. हि माहिती आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून ज्यांना दाढी पिकण्याची समस्या असेल ती निघून जाईल.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *