महिला अशा कोणत्या गोष्टी पाहून पुरुषाकडे आकर्षित होतात..?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महिला कोणत्या प्रकारच्या पुरुषांकडे आकर्षित होतात..? किंवा आपल्या जन्माचा जोडीदार कसा असावा, त्याची याच्याबद्दल संकल्पना काय आहे, कोणत्या आणि कशा पद्धतीचे पुरुष महिलांना आवडतात याची माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत.

पहिला जो पुरुष असतो तो पैसेवाला असतो. पैसा है तो उसके सामने दुनिया झुकती है. आता सगळी दुनिया पैशावर चालत आहे. त्यामुळे ज्याच्याकडे पैसा असतो त्यालाच दुनिया सलाम करते आणि तो दिसायला कसाही असुद्या त्याच्यावर प्रेम करणाऱ्या महिला खूप उपलब्ध आहेत. त्यामुळे पैसा कमवा आणि सर्व सुखसोयी मिळवा अशी एक म्हण सध्या समाजामध्ये रूढ झालेली आहे. मित्रांनो गोष्ट कडू आहे पण सत्य आहे.

दुसरा पुरुष म्हणजे जबरदस्त शरीरयष्टी म्हणजे पर्सनॅलिटी चांगली आहे, दिसायला रूपवान आहे अशांकडे महिला लगेच आकर्षित होतात. कोणाला वाटत नाही आपला जोडीदार चांगला दिसू नये, किंवा आपल्या जोडीदाराच्या पर्सनॅलिटी चांगली असावी. चांगल्याकडे सगळेच आकर्षित होतात. त्यामुळे महिला अशा पुरुषांकडे आकर्षित होतात.

तिसरं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे चांगलं वक्तृत्व असणारा, चांगलं बोलणं असणारा. जो बोलतो तो सुद्धा दुनियेला झुकवतो. काही माणसे एवढी चतुर असतात जी बोलून बोलून समोरच्या माणसाला आपलं ऐकण्यास भाग पाडतात.आणि अशा माणसांकडे सगळी दुनिया आकर्षित होत असते. त्यामुळे ज्याचं वक्तृत्व चांगलं आहे त्यांकडे सुद्धा महिला आकर्षित होतात.

चौथा पुरुष असा तो म्हणजे चांगला सेटल असणारा, चांगला जॉब, ज्याचं घरदार सर्व चांगलं आहे, कोणत्याही गोष्टींची त्याला उणीव नाही. अशांकडे सुद्धा महिला लगेच आकर्षित होतात. कारण तो सेटल आहे ना., त्याला कसलं टेन्शन नाही.

आणि पाचवं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे सगळीकडे प्रसिद्ध असणारा, फेम असणारा मग तो सोशल मीडियांवरून असो, पॉलिटिक्स किंवा इतर वेगळ्या कारणांमुळे असो. फेमस माणसांकडे सगळी दुनिया आकर्षित होते. आणि अशा लोकांना सुद्धा महिला भाव देतात.

मित्रांनो हि सगळी सांगितलेली माहिती समाजातील निरीक्षण करून मिळवलेली आहे. कटू आहे पण सत्य आहे. तुम्हाला काय वाटत हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि माहिती आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरु नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *