उच्चशिक्षित तरुण बापाला म्हणतोय, “बाप म्हणून तुम्ही काय केलंय माझ्यासाठी.?” पुढे जे झाले ते पाहून धक्का बसेल.!

उच्चशिक्षित तरुण बापाला म्हणतोय, “बाप म्हणून तुम्ही काय केलंय माझ्यासाठी.?” पुढे जे झाले ते पाहून धक्का बसेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अहो ऐकलंत का ? राहुल चा डबा नेऊन देता का? जरा कंपनी मध्ये.. राग गेला नाही का? डब्बा न घेता गेला तो, शरद रावांनी विचारलं.. आज राहूल लवकर सकाळी गेला. चेअरमन येत आहेत म्हणून राहुल सकाळी सातलाच कंपनी मध्ये गेला त्यामुळे सकाळी लवकर डबा तयार नाही झाला. ठीक आहे असे शरद राव म्हणाले.. शरद राव यांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आत मध्ये गेल्यावर तिने सुटकेचा निश्वास सोडला.

शरद राव तयार झाले म्हणजे त्यांचा आणि राहुल चा झालेला वाद त्यांनी ऐकला नव्हता. वाद कसला राहुल नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आगपाखड करणं आणि पुष्‍पाबाई नवऱ्याची बाजू घेणार विषय ही तोच वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही.. काही केले का माझ्यासाठी… बापा विषयीचा हा चुकीचा समज त्याच्या मनात रुजवला होता. आई माझ्या मित्राचे वडील शिक्षक होते पण किती मोठा बंगला बांधला बघ… नाहीतर तुम्ही आम्हाला भाड्याच्या घरात ठेवत आहेत. राहुल तावातावाने बोलत होता. माहित आहे नाना घरात मोठे त्यामुळे दोन बहिणी आणि दोन भावांची लग्न त्यांनाच करावी लागली.

तुझ्या बहिणीचे लग्न त्यांनी केले, आपल्या शेताच्या कोर्टकचेऱ्या सुरू होते ..कोणी पार पडले? त्यात काय उपयोग झाला त्याचा त्यांचे भाऊ बहीण राहताहेत बंगल्यात. तर त्यांना आपला भाऊ आपल्या साठी खस्ता खाताना अनेकदा बघितले अनेकांच्या सुद्धा मनामध्ये विचार आला नाही की आपण त्याला घर बांधून द्यावे व त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. काय बोलावे.. जन्मलेला मुलगा बापाने काय केले माझ्यासाठी हे विचारतोय… मग म्हणाल्या तुझ्या वडिलांनी त्यांचे कर्तव्य केले. बहिणीकडून कधीही अपेक्षा बाळगली नाही. राहुल मूर्खासारखे म्हणत होता ठीक आहे..

हजारो मुलांच्या नानांनी अनेक दिवस क्लास फुकट मध्ये घेतले त्यांच्याकडून फी घेतली असती तर आज अशी परिस्थिती आली असते का?असे काय करतो राहुल.. नानांचे तत्त्व होते ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत म्हणून या त्यांच्या तत्व मुळे जर किती प्रसिद्ध होता आले, किती पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्काराने कोणी विचारत नाही,अचानक नाना आत आले त्यांना पाहून राहुल घाबरला ..नानांनी काही ऐकले तर नसेल ना या भीतीने तो कापरला..नाना एक परी शब्द न बोलता निघून गेले आणि तिथेच वाद संपला.

हे होते काल चे संवाद पण तो सकाळी उठल्यावर शरद राव यांनी सायकल काढली आणि सायकल वर डबा लावून ते आणि औद्योगिक वसाहतीतल्या कारखाने कडे निघाले. कारखान्यांमध्ये पोहोचता पोहोचता त्यांना चांगलीच धाप लागली होती. कंपनीच्या गेटवर पोहोचल्यावर सिक्युरिटी गार्ड ने त्यांना अडवले. राहुल पाटील साहेबांना डबा द्यायचा होता. जाऊ का नाही देत यावर गार्ड म्हणाला चेअरमन साहेब आले आहेत. यांच्यासोबत मीटिंग सुरू आहे. कोणत्याही क्षणी ते मिटींग संपवून बाहेर येतील. तुम्ही थांबा.. साहेबांना तुम्ही दिसायला नको शरद राव थोड्या दूर अंतरावर उभे राहिले होते.

थोडा वेळ म्हणता म्हणता एक तास उलटून गेला. पाय दुखायला लागले असणार बहुधा. मीटिंग संपली असावी चेअरमन साहेब यांच्या पाठोपाठ अधिकारी आणि त्यांच्यासोबत राहूल ही बाहेर आला. उभ्या असलेल्या वडिलांकडे वैतागून पाहून तो चिडला. बाहेर पडल्यावर साहेबांनी गाडीचं दार उघडलं आणि बसता बसता त्यांचं लक्ष गेलं..तसेच बाहेर झाडाखाली ते समोर कोण आहेत त्यांनी सेक्युरिटी ला विचारलं..राहुल साहेबांचे वडील आहे, जेवणाचा डब्बा द्यायला आले आहे असे सांगितलं.. राहुल ला आता घामाच्या धारा वाहू लागल्या आणि भीतीने काहीतरी होईल असे त्याला वाटू लागले. साहेब पुढे होऊन त्यांच्याजवळ गेले.

तुम्ही हायस्कूलमध्ये शिक्षक होता ना?? हो, तुम्ही ओळखलं मला? काही कळायच्या आत सगळे अवाक झाले. सर मी अतिश अग्रवाल तुमचा विद्यार्थी होतो. मी तुमच्याकडे घरी अभ्यास करण्यासाठी येत असत तेव्हा सर म्हणाले हो मी ओळखलं.. अरे वा खुपच मोठे झालात तुम्ही..सर तुम्ही इथे काय करत आहात आणि एवढ्या उन्हामध्ये काय उभे आहात, चला आत मध्ये या. खूप गप्पा मारूया.खूप दिवस नंतर हा योग आलेला आहे आणि खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत बोलायचे आहेत. चेअरमन साहेबांनी सिक्युरिटी ला विचारले तुम्ही यांना आत मध्ये काय नाही बसवले.?

तेव्हा गार्ड लाजेने चेअरमन यांना काही बोलला नाही तेव्हा सर म्हणाले की त्यांची काही चूक नाही. तुमची आत मध्ये मिटींग चालू होती म्हणूनच मी बाहेर उभा होतो. शरदरावांच्या हाताला हात धरून चेअरमन साहेब यांनी आपल्या आलिशान चेंबर कडे त्यांना नेले आणि आत मध्ये गेल्यावर आपल्या खुर्चीवर बसायला सांगितले परंतु शरद राव यांनी नकार दिला तेव्हा चेअरमन आणि जनरल मनेजर कडे हात दाखवत म्हणाले की पवार साहेब तुम्हाला कदाचित कल्पना नसतील तर पाटील सर नसते तर आपली कंपनी नसती.

मी माझ्या धान्याच्या दुकानावर असतो त्यावेळी राहुल आणि जनरल मॅनेजर एकमेकाकडे पाहून अवाक झाले. चेअरमन साहेब म्हणाले की मी अभ्यासामध्ये लहानपणापासून ढ होतो. मोठे मोठे क्लास लावून सुद्धा फारसं काही शिक्षणामध्ये परिणाम होत नव्हता अशा वेळी पाटील सरांनी माझ्या मनामध्ये शिक्षणाबद्दलची गोडी निर्माण केली. माझ्या मनामध्ये शिक्षणाबद्दलची आत्मीयता निर्माण केली आणि यामुळेच मी अभ्यास करू लागलो आणि आज या पदावर आहे त्यामुळे आज मी ज्या ठिकाणी आहेत याचे सगळे श्रेय पाटील सरांना जाते.

मी श्रीमंत बापाचा मुलगा असल्याने खूप बिघडलेला होतो. दिवसभर मस्ती करायचो आणि शाळेत न बसता बाहेर सिनेमा पाहायला जायचं आणि यामुळे माझी आई खूप चिंता करायची. पाटील सर शाळेमध्ये अतिशय शिस्तबद्ध सर होते अशावेळी माझ्या आईने सरांकडे जाऊन विनंती केली पण तो सरांनी नकार दिला कारण की सरांची खोली खूपच लहान होती आणि अशा खोलीमध्ये सर मला शिकू शकतील असे वाटते नव्हते म्हणून त्यांनी प्रत्यक्ष नकार दिला परंतु आईने त्यांना घरी येऊन शिकवण्याची विनंती केली खूप आढेवेढे घेतल्यानंतर पाटील सरांनी हा म्हटले होते परंतु पाटील सरांनी शेवटी मला शिकवण्यासाठी राजी झाली.

पहिल्या दिवशी सर मला शिकवायला आले मी अभ्यास न करत असल्यामुळे त्यांनी मला चांगले बदडले परंतु आठ दिवसांमध्ये मला शिक्षणाची गोडी लागली. सर शिकवताना खुप छान शिकवत असे, मला इंग्रजी गणित विज्ञान या विषयाची आवड निर्माण झाली. कधी कधी तर अभ्यास नाही केला तर मला करमतच नसेल एवढी अभ्यासाची सवय मला पाटील सरांनी लावली होती. नंतर नंतर माझा शैक्षणिक आलेख वाढतच गेला. मी प्रगती करू लागलो आणि म्हणूनच आज या ठिकाणी आहे. हे ऐकताच राहुल लाजेने मान खाली घालून उभा राहिला.

मग तुम्ही पाटील सरांना फी दिली की नाही असा प्रश्न जनरल मॅनेजर नी विचारलं तेव्हा चेअरमन म्हणाले की मी पास झाल्यानंतर मी आणि माझे आई-वडील सरांकडे पेढ्याचा बॉक्स घेऊन गेलो होतो आणि माझ्या वडिलांनी त्यांना एक लाखाचा चेक सुद्धा देऊ केला होता परंतु पाटील सरांनी तो नाकारला तेव्हा पाटील सर म्हणाले होते ते शब्द मला आजही लक्षात आहे.

पाटील सर म्हणाले की ,मी माझे फक्त काम केले तुमचा मुलगा आधीपासूनच हुशार होता. फक्त मी त्याला चांगला मार्ग दाखवला. आज सगळीकडे शिक्षणाचा बाजार चालू असताना प्रत्येक जण या बाजारांमध्ये स्वतःला विकण्यासाठी सिद्ध होत आहे परंतु पाटील सर सारखे शिक्षक क्वचितच आपल्याला पाहायला मिळतात. पाटील सरांनी कोणतीही पर्वा न करता माझ्यासारख्या अभ्यासात कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवले आणि आज जो मार्ग दाखवला त्यामुळे आज मी या पदावर आहे म्हणूनच पाटील सर माझ्या प्रत्येक प्रगतीचे खरे हक्कदार आहेत असे मला वाटते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *