या कारणांमुळे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. Zee Marathi वाहिनीवर बऱ्याच काळानंतर स्वराज्यरक्षक संभाजी हि ऐतिहासिक मालिका २५ सप्टेंबर २०१७ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. संभाजी राजांचे रूप त्यांचा इतिहास मालिकेत कसा दाखवला जाईल असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागले होते. पण जेव्हा छोट्या पडद्यावर हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली तेव्हा लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. पण आता हि लोकप्रिय मालिका लवकरचं प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे दिसून येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यातच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचा शेवट अत्यंत रंजक असणार आहे. २ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेचा शेवट अत्यंत भव्यदिव्य करण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक जोरदार तयारी करत आहेत. यामालिकेने TRP च्या यादीतही टॉप ५ मध्ये आपली जागा मिळविली होती. गेल्यावर्षी एप्रिल मध्ये मालिकेने ५०० एपिसोड पूर्ण केले होते. इतिहासाला कुठलेही गालबोट न लागता हि मालिका प्रेक्षकांसमोर सादर करणं आणि तरुणाईला संभाजी राजेंची ओळख करून देणं याचं भान ठेवत हि मालिका केली असल्याचं अमोल कोल्हे यांनी मुलाखतीत सांगितलं.
या मालिकेतून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडींवर तसेच बारीक सारीक प्रसंगावर प्रकाश टाकण्यात आला. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका तर शंतनू मोघे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाड नि साकारलेली येसूबाईंची भूमिका यांना देखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले. या मालिकेची जागा दुसरी कोणती मालिका घेणार हे अजूनही कळलेलं नाही.
तर मित्रांनो तुमचे हि मालिका बंद होण्याबाबत काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि हि माहिती तुमच्या मित्रपरिवाराला देखील शेअर करायला विसरू नका.