करोडोंची संपत्ती आणि गाडी असलेला न्हावी आजही कापतोय केस फक्त 50 रुपयांत..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला एक नजर फिरवली तर आपल्याला शेकडो असे व्यक्तिमत्व पाहायला मिळतील ज्यांनी आयुष्यात शून्यातून सुरुवात करून यशाचं शिखर गाठलं. काही लोकांचा प्रवास इतका अविश्वसनीय असतो तो ऐकून एकवेळ आपण थबकूनच जातो.

असंच एक यशस्वी व्यक्तिमत्व रमेश बाबू यांची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यांच्यावर एकवेळ अशी  होती कि त्यांना जेवायला देखील मिळत नव्हतं. ते घरोघरी वर्तमान पत्र टाकायचे. त्यांच्या आईने लोकांच्या घरी धुणीभांडी केली परंतु ते आज ३.५ करोडच्या रोल्स रॉयल्स गाडीमध्ये ऐटीत मिरवतात.

त्यांच्याकडे ३०० पेक्षा अधिक गाड्यांचं कलेक्शन आहे आणि संपूर्ण भारतात त्यांना बिलिनिअन बार्बर म्हणून ओळखलं जाते. त्यांचं नाव आहे रमेश बाबू. चला तर मग रमेश यांनी कशी अडचणीतून मात करून हे  वैभव उभं केलं.

रमेश बाबू बार्बर आहेत, ते लोकांचे केस कापतात. आता तुम्ही म्हणाल कि केस कपणाऱ्या रमेश बाबूंकडे रोल्स रॉयल्स कशी..? मित्रांनो रमेश बाबूंकडे फक्त रोल्स रॉयल्स च नाही तर आणखी ३७८ कार आहेत त्यापैकी १२० लक्झरी कार्स आहेत. खरतर हेच त्यांच्या यशामागचं रहस्य आहे.

सलून व्यतिरिक्त ते कार रेंटल चा बिसिनेसहि चालवतात. त्यातून त्यांना मोठा होतो. मर्सिडीज, बी एम डब्लू, जागोर, त्यांसारखी प्रत्येक गाडी भाड्याने देण्यासाठी आहे. रमेश बाबूंनी या सर्व गाड्या स्वबळावर खरेदी केल्या आहेत. त्यांनी १४ वर्षांचे असतानाच  कामाला सुरवात केली होती. ते दूध विकायचे आणि वर्तमान पत्र टाकायचे काम करायचे. त्या कामाचे त्यांना महिन्याला १०० रुपये मिळायचे.

indiatvnews.com

रमेश बाबूंच्या वडिलांना देवाज्ञा झाल्यानंतर सलून चा बिसिनेस त्यांचे काका सांभाळायचे. रमेश बाबुंचे स्वप्न मोठे होत. आयुष्यात त्यांना काही करून दाखवायचं होत. म्हणून केवळ १८ वर्षांचे असताना त्यांनी सलून चालवायला घेतलं. ते दिवसरात्र काम करू लागले. सकाळी लवकर जाऊन उशिरापर्यंत कामाला थांबू लागले. अंगी कधीकधी त्यांना जेवायला वेळ देखील मिळायचा नाही.

मात्र सलून मधील मिळणाऱ्या मिळकतीवर ते सॅटीस्फाईड नव्हते. त्यांना अजून काहीतरी हटके हवं होत. रमेश बाबूंना गाड्यांची खूप आवड होती, एव्हाना थोडी परिस्थिती सुधारली होती. काही सेव्हिंगही होती म्हणून १९९३ मध्ये त्यांनी एक ओमनी त्यांनी स्वतःच्या वापरासाठी विकत घेतली.

गाडी लोन वर होती, सुरुवातीला सर्वकाही ठीक होत मात्र २-३ महिन्यांनंतर गाडीचा हफ्ता भरणं रमेश बाबूंना जड जाऊ लागलं. काय करावं त्यांना कळेना, तेव्हा त्यांची आई नंदिनी नावाच्या महिलेच्या घरी घरकाम करायची. याच नंदिनीच्या एका सल्ल्याने रमेश बांबूचं आयुष्य बदललं. नंदिनीनी रमेश ला कार रेंट वर देण्याचा सल्ला दिला.

news18.com

तिचा तो सल्ला रमेश बाबूंना आवडला आणि रमेश बाबूंनी कार रेंट वर द्यायला सुरुवात केली. परिणामी त्यांना पैसेही मिळू लागले आणि कार चा हफ्ता देखील वेळेवर भरू लागला. सुरुवातीला ड्राइव्हर भेटत नसल्याने गाडी त्यांना स्वतःला चालवायला लागायची. मात्र हळूहळू प्रॉफिट वाढू लागला आणि त्यासोबत रमेश बाबूने बिसिनेस देखील वाढवला.

त्या काळात कार रेंट देणाऱ्या बऱ्याच कंपन्या होत्या. पण रमेश बाबूंना काहीतरी वेगळं करायचं होत. म्हणून त्यांनी २०११ मध्ये रोल्स रॉयल्स घेतली. या गाडीचे दिवसाला त्यांना ५० हजार रुपये भाडं मिळत. तरीही आजही ते सलून मध्ये लोकांचे केस कापतात. ते म्हणतात सलून हाच माझा पहिला आणि मुख्य बिसिनेस आहे आणि तो मी कधीच सोडू शकत नाही.

रमेश बाबू एक यशस्वी बिसिनेस मॅन आहेत आणि हे त्यांच्या प्रयत्नांचे फळ आहे यात काही शंका नाही. रमेश बाबूंना कार्स खूप आवडतात आणि त्यांचं एक आणखी कार घेण्याचं स्वप्न आहे. स्ट्रेच लिमोसाईन जिची किंमत आहे ८ करोड रुपये.

wnyguest.com

२१ वर्षांच्या अथक प्रयत्नांतून त्यांनी त्यांचं वैभव उभं केलं. ते त्यांच्या चिकाटीच्या बळावर हेही स्वप्न पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे. रमेश बाबू स्वप्नांच्या बळावर जिद्दीने मोठे झाले. तुम्ही देखील मोठी स्वप्ने पहा आणि त्यात पूर्णपणे स्वतःला झोकून द्या. बिलिनिअर च ठाउक नाही पण यशस्वी तर नक्कीच व्हाल.

मित्रांनो हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्कीच विसरू नका. 

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.