बायकोची आई ती आई अन नवऱ्याच्या आईच काय.? डोळ्यात अंजन घालणारा हा लेख एकदा नक्की वाचा.!

बायकोची आई ती आई अन नवऱ्याच्या आईच काय.? डोळ्यात अंजन घालणारा हा लेख एकदा नक्की वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतात त्या घटनेमुळे आपले हृदय भावनिक होऊन जाते आणि आपण वेगवेगळे विचार करत बसतो. कधीकधी परिस्थिती आपल्याला वेगवेगळे धडे शिकवत असते परंतु ही परिस्थिती आपण पाहत असतो. कधी कधी ती परिस्थिती आपल्या हातामध्ये सुद्धा नसते तरीही आपण त्या परिस्थितीला हाताळण्याचा प्रयत्न करत असतो अशीच एक वेगळी माहिती आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहोत, ही माहिती वाचल्यावर तुमच्या सुद्धा तुमच्या हृदयामध्ये यातना होतील.

रात्रीचे बारा वाजले होते. दिवसभर थकून भागून रमेश आपल्या घरी आला परंतु घरी आल्यावर बघतो तर काय? त्याची पत्नी त्याच्यावर रागावली होती. घरी येताच हेमाने रामेश वर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. तू कुठे होता दिवसभर?.. आता आलास?? ऑफिसमधून तर तुम्हीच लवकर निघाला होतात.

दिवसभर कुठे शेण खायला गेला होतात अशा विचित्र शब्दांमध्ये ती रमेशशी बोलू लागली होती तेव्हा आता रमेशला हेमा च्या प्रश्नाला उत्तर देताना जीभ अडखळत होती तो म्हणाला अगं आईला घ्यायला गेलो होतो तेव्हा ती रागाने लाल झाली आणि म्हणाली काय ? आईला आणले ?? राहू द्यायचे होते ना तुमच्या भावाच्या घरी.दरवाजाच्या बाहेर अंधारात उभी राहून आई आपल्या पदराने डोळे पुसत होती. हेमाने बाहेर जाऊन उभे असलेल्या आईकडे बघितले सुद्धा नाही आणि तिची विचारपुस सुद्धा केली नाही, अशा वेळी रमेशला म्हणाला अगं हा माझे ऐकून तरी घे…

माझ्या आईला आता माझ्या भावाकडे राहणे शक्य नाही तेव्हा ती जोराने रमेश वर ओरडली का काय झाले ? आणि आपल्याकडे काही कुबेराचा भंडारा आहे काय? कोणी यायचे आणि कोणीही राहायचे.तुमच्या या तुटपुंज्या दहा हजाराच्या पगारामध्ये आपले भागत नाही त्यात आईना कुठे सांभाळायचे आणि आई यांना सुद्धा लाज नाही वाटली का इथे यायला..

हेमा ने घराबाहेरील बल्ब लावला आणि बाहेर आली परंतु आईचा चेहरा बघताच तिला आश्चर्याचा धक्का भरला आणि ती म्हणाली आई तु येथे काय करतेस? आईने आतापर्यंत सर्व गोष्टी ऐकल्या होत्या तिच्या डोळ्यांमध्ये पाण्याच्या धारा वाहत होत्या आणि तशीच ती म्हणाली मला तुझ्या भावंडांनी आणि त्यांच्या बायकांनी खूपछळले म्हणून सहन न होताच मी जावईबापूंना फोन लावला व जावईबापू त्वरित तिकडे येऊन मला इथे घेऊन आले.

हेमा ने आईचे डोळे पुसले आणि स्वतःचे डोळे सुद्धा पुसले आणि आपल्या पतीकडे प्रेमळ नजरेने पाहून म्हणाली काय हो तुम्ही मला सुंदर सरप्राइज दिले .किती दिवसानंतर आईची भेट झाली आणि हेमा आईला आत मध्ये घेऊन आली , म्हणाली दुपारपासून काय खाल्लं नसेल मी तुला जेवण गरम करून वाढते परंतु या जागी रमेश ची आई असती तर किती गोंधळ झाला असता. या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करण्यासारखे आहेत.

शेवटी आई ही आई असते मग ती रमेश असू दे किंवा हेमा ची..आपल्याला परमेश्वराने सुंदर भेट दिलेली आहे ती म्हणजे आई त्यामुळे प्रत्येक आईचा मान सन्मान करणे हे आपल्या हातात आहे. तिची काळजी घेणं आपल्या हातात आहे परंतु यावर सुद्धा विचार करणे गरजेचे आहे.

हे आपण विसरता कामा नये आणि आईच्या पोटी जन्माला आलेली मुलगी आज सून होऊन उद्याची सासू बनणार आहे म्हणून हे काळाचे चक्र सातत्याने चालणार आहे तुम्हीसुद्धा तुमच्या आई सोबत घरांमध्ये चुकीचे वागत असाल तर हे वागणे आजच थांबवा. असे म्हणतात की, आई शिवाय घराला घरपण नाही आणि ज्या घरात आई नसते ते घर रिकामे असते म्हणून आपल्या आईची काळजी घ्या तिच्या तब्येतीला जपा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *