कॅन्सरमुळे 6 महिने जगू शकणाऱ्या आई वडिलांना मुलाने आणि सुनेने पाठवले वृद्धाश्रमात; पुढे पहा काय घडले.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कलियुगात मुले म्हातारपणी आपल्या पालकांना वृध्दाश्रमात पाठवतात ही बाब काही नवीन नाही आहे. असेच एका मुलाने कैंसरग्रस्त पालकांना जे फक्त 6 महिने जगणार होते त्यांना निर्दयीपणे वृद्धाश्रमात पाठवले. काय आहे हे प्रकरण? चला तर जाणूण घेऊया. एक सुखी असा मोरे परिवार बोरिवली मध्ये त्यांच्या वन रुम किचन असलेल्या खोलीत राहत होते.
श्रीधर त्यांच्या पत्नी मीरा त्यांचा मुलगा श्रीकांत व सून श्रेया आणि दोन नातवंड. पण एके दिवशी श्रीधर रावांना कैंसर आहे असे कळलं आणि त्यांच्याकडे फक्त 6 महिने शिल्लक आहेत असे डॉक्टर म्हणाले. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. हसत-खेळत जगणार कुटुंबावर दु:खाचे ढग बरसू लागले. डॉक्टरांनी मीरा बाई यांना त्यांच्या कुटुंबासोबत राहण्याचा सल्ला दिला. परंतू 65 वर्षांच्या मीरा बाई यांनी घर सोडून वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेतला.
मुंबईतल्या एका गुलमोहर नामक वृध्दाश्रमात त्यांनी त्यांची व त्यांचे पती श्रीधरराव यांची नाव नोंदणी केली. तिथे त्यांनी एक खोली घेतली तथा या वृध्दाश्रमाचे भाडे सुमारे 5000 रुपये होते आणि हे भाडे हे दाम्पत्य त्यांच्या येणार्या पेंशन मधून भरणार असे ठरले गेले. जेव्हा घर सोडून आश्रमात जायची वेळ आली तेव्हा मात्र श्रिधाररावांची दोन्ही नातवंडे अगदी ढसाढसा रडू लागली आजी-आजोबा अम्हाला सोडून जाऊ नका अशी विनवणी करु लागली.
सून श्रेया हिला सुद्धा तिचे अश्रू अनावर झाले गुपचूप किचनमध्ये जाऊन ती सुद्धा रडली आणि साडीच्या पदराने अश्रू पुसत ती बाहेर आली. मुलगा श्रीकांत मात्र शांत होता. दोन्ही हातात पिशव्या घेवून तो अश्रू अगदी शेवटच्या टोकापर्यंत डोळ्यात रोखून धरुन होता. बाहेर पडण्याच्या वक्ताला श्रीधर रावांना सुद्धा रडू कोसळले. मात्र मीराबाई रडल्या नाहीत. त्या आपल्या पतीसोबत अगदी हसतमुखाने बाहेर पडल्या आणि वृध्दाश्रमात जाऊन वास्तव्य करु लागल्या.
जरी मोरे कुटुंबियांची खोली लहान असली शिवाय ते मध्यम वर्गिय असले तरी ही श्रीधर राव आणि मीरा बाई यांनी वृद्धाश्रमात जाऊन रहावे असे कोणालाच वाटत नव्हते आणि त्यांच्या अश्या जाण्याने कोणी आनंदी ही झाले नाही. परंतू मीरा बाईंनी आपल्या पती श्रीधर यांसोबत वृध्दाश्रमात राहण्याचा निर्णय घेतला या मागे खूप मोठे गुढ असे कारण होते. श्रीधर राव हे फक्त 6 महिन्याचे पाहुणे उरले होते.
या शेवटच्या काळात मीरा बाई यांना त्यांच्या पती सोबत वेळ व्यतित करायचा होता. सून लेक नातवंड यांच्या मागे धावता-धावता मीरा बाई हे विसरुनच गेल्या की या उतरत्या काळात त्यांच्या पतीला त्यांची सर्वात जास्त गरज आहे. पैसा नको जमीन-जुमला नको दाग-दागिणे नको श्रीधर रावांना साथ हवी होती ती आपल्या माणसाची हे जेव्हा मीरा बाई यांनी जाणले तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला की या पुढे वेळ आपल्या पतीला देणार आणि घर सोडून त्यांनी वेगळ राहण्याचे ठरवले. श्रीधर राव अजून किती काळ जिवंत असतील हे आपण सांगू शकत नाही परंतू आत्ता ते आपल्या साथीदाराच्या कुशित निवांत झोपून ‘मृ’त्यू’ ला समोरे जावू शकतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.