फ्रिज एसी सारखा रूम थंड करू शकतो का..? जाणून हैराण व्हाल..

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल जर एक एअर कंडिशनर रूम ला थंड करू शकतो तर तसे फ्रिज एखाद्या रूम ला थंड करू शकतो का..? जर फ्रिज चा दरवाजा खुला ठेवला तर तो आपल्या रूम ला थंड करू शकेल..? मित्रांनो बंद रूम मध्ये एअर कंडिशनर एक चांगला पर्याय मानले जाते. परंतु AC हा सर्वांकडे नसतो. आणि राहिली फ्रिज ची गोष्ट तर फ्रीजचा दरवाजा खुला ठेवल्यानंतर रूम थंड होईल कि नाही हे जाणन्या आधी आपल्याला हे जाणावे लागेल कि फ्रिज नक्की कशाप्रकारे काम करतो.

आपल्याला माहिती असेलच कि उष्म म्हणजे हीट ते जास्त तापमानाहून कमी तापमानाकडे जाते. तसेच फ्रिजच्या बाहेर कोणती वस्तू ठेवली तर तिची उष्णता जास्त असते. मित्रांनो जेव्हा आपण फ्रीजचा दरवाजा खुला ठेऊ तेव्हा फ्रिजमध्ये लागलेले सेन्सर तापमान मापतील तेव्हा त्यावेळी उष्णता खूप जास्त असेल कारण फ्रीजचा दरवाजा खुला ठेवल्याने रूम सुद्धा आता फ्रिजचाच भाग झालेला आहे.

तेव्हा फ्रिजमध्ये लागलेले सेन्सर कॉम्प्रेसर ला संकेत देणार कि आतमध्ये गर्मी खूप जास्त आहे. आणि याकारणामुळे कॉम्प्रेसर कूलर जलद गतीने चालवेल आणि त्यामुळे कॉम्प्रेसर जास्त वीज वापरयाला लागेल, आणि कॉम्प्रेसर अन कूलर रूममध्ये पहिल्यापेक्षा जास्त गर्मी सोडायला लागेल.

homedepot.com

मित्रांनो म्हणून एअर कंडिशनमध्ये गर्मी फेकणारी युनिट घराच्या बाहेर लावली जाते. आणि थंड हवा देणारे युनिट घरामध्ये लावले जाते. मित्रांनो याचा अर्थ असा कि कॉम्प्रेसर फ्रीच्या आतमध्ये असलेला टेम्परेचर कमी करतो आणि फ्रिज ज्या रूम मध्ये ठेवलेला असतो त्या रूमचा टेम्परेचर तो वाढवतो.

अगदी सोप्प्या भाषेत सांगायला गेलं तर जेव्हा आपण फ्रीजचा दरवाजा खुला ठेऊ तेव्हा तो रूम तर थंड नाही होणार पण तो अजूनही जास्त गरम होईल. पण जर आपल्या फ्रिजला विंडो एसीसारखे वापराल तर शक्यतो काहीतरी फायदा होऊ शकतो.

तर मित्रांनो आपल्याला चांगलंच समजले असेल कि रूम मध्ये फ्रीजचा दरवाजा खुला ठेवल्यावर रूम थंड होईल कि नाही. मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्कीच विसरु नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *