फक्त ५ मिनिटांत शोध हरवलेला मोबाईल.. पहा काय आहे ती ट्रिक..!

फक्त ५ मिनिटांत शोध हरवलेला मोबाईल.. पहा काय आहे ती ट्रिक..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वेबसाईट वर तुमचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि मोबाईल चोरी झाल्यावर कोणत्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमचा हरवलेला मोबाइल परत मिळवू शकता. तुमचा जर एखादा फिचर (साधा फोन) फोन किंवा स्मार्टफोन हरवलेला असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेप्स असतात. जर या ठिकाणी तुमचा साधा फोन हरवलेला असेल तर तुम्हाला फक्त एक ऑप्शन असतो तो म्हणजे तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकता याने काहीच शक्यता असते तुमचा मोबाइल परत मिळण्याची.

त्या साठी प्रोसेस अशी असते कि तुमचा साधा फोन हरवलेला असेल तर तुमच्या मोबाइलचा बॉक्स किंवा बिल वर आय एम इ आय (IMEI) नंबर दिलेला असतो आणि तो नंबर पोलिसांना देऊन कंप्लेंट द्यायची असते.जर सर्व काही नीट असेल तर तुमचा मोबाइलला क्वचितच मिळू शकतो. अन्यथा साधा मोबाइलला मिळण्याचे चान्सेस फारचं कमी असतात.

जर तुमच्याकडे Iphone असेल किंवा Android फोन असेल तर तुमच्याकडे तुमचा हरवलेला मोबाइलला मिळवण्याचे खूप चान्सेस असतात. सर्वात प्रथम तुम्ही एक खबरदारी घेतली पाहिजे कि तुमचा मोबाईल कायम पिन कोड ने लॉक असला पाहिजे जेणेकरून कोणी तुमचं पर्सनल डॉक्युमेंट चोरी करू अथवा बघू शकणार नाही. आणि त्याप्रमाणे मोबाइल मध्ये लोकेशन अथवा GPS  असते ते सतत चालू असले पाहिजे जेणेकरून तुम्ही फोन ला शोधू शकता.

जेव्हा तुमचा मोबाईल हरवतो तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये ज्या ई-मेल ऍड्रेस ने लॉगिन करता तो ई-मेल ऍड्रेस घेऊन तुम्हाला तुम्ही गूगल वर जाऊन Find My Phone असं टाईप करून सर्च करायचं आहे. समोर तुम्हाला एक गूगल चा डॅशबोर्ड मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या हरवलेल्या मोबाइलचा ई-मेल ऍड्रेस टाकून त्या ठिकाणी लॉगिन करायच आहे. लॉगिन झाल्यांनतर तुमच्या हरवलेल्या मोबाइल च नाव तुम्हाला दिसू लागेल तसेच समोर ३ ऑप्शन दिसू लागतील. सोबतच तुम्हाला Find My Phone हे सुद्धा दिसेल.

  1. Play Sound
  2. Secure Device
  3. Erase Device

जर तुमचा हरवलेला मोबाइल चालू असेल आणि त्या मध्ये GPS ऑन असेल तर तुम्ही Find My Phone या वर क्लिक करून तुम्हाला तुमच्या फोन ची लोकेशन दिसू लागेल. जेणेकरून तुम्हाला कळेल कि तुमचा फोन सध्या कुठे आहे.

जर का तुमच्या फोन मध्ये इंटरनेट चालू असेल आणि GPS ऑन असेल तरचं तुमचा फोन या ठिकाणी शोधू शकता. पण जर का तुमचा फोन स्विच ऑफ किंवा चोरलेला असेल तर तुम्ही Play Sound हे ऑप्शन वर क्लिक करून तुमचा फोन शोधू शकता असे केल्यास तुमचा फोन जर जवळपास असेल तर त्या मध्ये मोठ्या आवाजात एक ध्वनी ऐकायला येईल.

दुसरं ऑप्शन म्हणजे Erase Device & Secure Device या ऑप्शन चा वापर करून तुम्ही तुमच्या फोन मधील सर्वकाही डिलीट करू शकता अथवा फाईल्स लॉक करू शकता. जेणेकरून तुमचे जे डॉक्युमेंट असतील त्याचा कोणी गैरवापर करू शकणार  नाही.

आणि शेवटी तुम्ही पोलीस यंत्रणेची मदत घेऊ शकता. या साठी तुम्हाला तुमच्या हरवलेला मोबाईलचा IMEI नंबर द्यावा लागतो. या नंतर पोलीस तुमचा मोबाइलला Surveillance मोड मध्ये टाकतात.जेणेकरून जेव्हा कोणी तुमच्या फोन मध्ये नवीन सिमकार्ड टाकेल तेव्हा तो डेटा पोलिसांपर्यंत पोहोचतो आणि तुमचा मोबाइल सापडण्यास मदत होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *