या दिवशी तुम्ही नखे कापलात तर पैसा नेहमीच तुमच्या हातात राहील..!

या दिवशी तुम्ही नखे कापलात तर पैसा नेहमीच तुमच्या हातात राहील..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण नखे कधी काढावीत आणि कशी काढावीत हे जाणून घेणार आहोत. समुद्रशास्त्र हे एक मोठं शास्त्र आहे, या समुद्रशास्त्रामध्ये नखं कधी काढावीत आणि कशी काढावीत याविषयी माहिती दिलेली आहे. नखं विशिष्ट दिवशी काढल्याने फायदे होतात तर काही दिवस असे आहेत कि ज्या दिवशी आपण नखं काढणे टाळायला हवे नाहीतर तोटे होतात असं समुद्रशास्त्र मानतं. मित्रांनो पहिल्यांदा आपण हे पाहूया कि नखे कशी काढावीत.

बरेचजण नखं काढताना ती नेलकटर ने काढतात आणि मग ती नखे कुठेही फेकून देतात. तर मित्रांनो असं करू नका, नखं काढल्यावर तर गोळा करा आणि एखाद्या कागदामध्ये त्याची पुडी बांधून हि पुडी आपण अशा ठिकाणी टाकावीत ज्या ठिकाणी मांजर किंवा कुत्री जाणार नाहीत. तुमच्या कचराकुंडीत टाकली तरी चालतं .

हि तर झाली नखं काढायची पद्धत. पण नखं कोणत्या वारी काढायला हवीत..? मित्रांनो तुम्ही जर सोमवारी नखं कापलीत तर तुमच्या बाबतीत शुभ घटना घडतात. म्हणजे कोणत्याही प्रकारची चांगली गोष्ट कि ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

मंगळवारी जर तुम्ही नखं कापलीत तर समुद्रशास्त्र असं मानत कि मंगळवारी नखं कापणाऱ्याला आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर होतात. म्हणजेच त्याच्याकडे धन, संपत्ती हि मोठ्या प्रमाणात येऊ लागते. तुमच्याकडे पैशाच्या समस्या असतील तर तुम्ही नखं मंगळवारी काढायला हवीत.

बुधवारी नखं कापल्याने शुभ गोष्टी घडतात मात्र त्याच प्रमाण कमी असतं.  गुरुवारी नखं कापलीत तर त्यामुळे शुभवार्ता येऊ शकते. जसे कि एखादा मेसेज, पात्र तुम्हाला येईल. जसे ज्याला नोकरी नाही त्याला एखादी नोकरी मिळू शकते. म्हणजेच एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते.

शुक्रवारच्या दिवशी नखं कापल्याने आपल्या संपत्तीत हळूहळू वाढ होते आणि इथून पुढचं भविष्य आहे ते आपलं चांगलं राहत. जर तुम्हाला ऐषोआराममध्ये जगायचं असेल तर तुम्ही शुक्रवारी नखं कापायला हवीत.

शनिवारचा दिवस सुद्धा नखं कापण्यास शुभ मानला जातो पण तो तितका शुभ नाहीय जितका मंगळवार,गुरुवार किंवा शुक्रवार आहे. आणि शेवटचा दिवस आहे रविवार या शेवटच्या दिवशी अजिबात नखं कापू नयेत. समुद्रशास्त्र असं मानतं कि रविवारी जे लोक नखं कापतात अशा लोकांच्या मागे खूप अडचणी लागतात. त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात. म्हणजेच काय तर रविवारी नखं कापणे आपण टाळायला हवे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.