आपल्या घरामध्ये निघालेल्या काळया मुंग्या आणि लाल मुंग्या ; काय असतात संकेत शुभ संकेत की अशुभ संकेत….!!

आपल्या घरामध्ये निघालेल्या काळया मुंग्या आणि लाल मुंग्या ; काय असतात संकेत शुभ संकेत की अशुभ संकेत….!!

मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की मुंग्या आपल्या घरामध्ये होत असतात. एखादा गोड पदार्थ जर आपण घरामध्ये केला किंवा बाहेरून आणला तर तो खाली पडल्यावर त्याचा वासाने मुंग्या अगदी क्षणार्धात त्याच्या अवतीभवती जमलेल्या असतात. वास्तुशास्त्रानुसार तसेच ज्योतिष शास्त्रानुसार मुंग्या घरामध्ये होण्याचे काही शुभ अशुभ फळ आपल्यावर आपला आयुष्यावर होत असतात. त्याचेच माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

मुंग्या या दोन प्रकारच्या असतात. काळया मुंग्या व लाल मुंग्या. या दोन्ही मुंग्या जर आपल्या घरामध्ये झाले तर त्याचे परिणाम आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर तसेच आपल्यावर होत असतात. हे परिणाम काही शुभ असतात. तर काही अशुभ असतात. मुंग्या घरामध्ये होणे हा आपल्याला एक संकेत असतो की जो आपल्यावर होणारा शुभ अशुभ घटनेचे संकेत देत असतात.

 

मुंग्यांबद्दल काही माहिती पाहणार आहोत की, ज्यामध्ये कोणते संकेत हे आपल्यासाठी शुभ असतात व कोणत्या संकेत आपला साठी अशुभ असतात? प्रथम आपण पाहूया जर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या झाल्या तर त्या आपल्याला कोणता संकेत देत असतात? जर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या होत असतील तर, त्याचे अशुभ परिणाम आपल्यावर होत असतात.

 

वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की, जर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या होत असतील तर त्याचे अशुभ परिणाम आपल्यावर होत असतात. त्या आपल्याला काहीतरी वाईट घडणार आहे याची संकेत देत असते. त्यामुळे लाल मुंग्या झाल्या तर तुम्ही सावध व्हा. लाल मुंग्या होण्याचा संकेत म्हणजे तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये धनप्राप्ती संबंधित संकटे येणार आहेत. तुमच्या जीवनातील खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

 

असा हा संकेत लाल मुंग्या तुम्हाला देत असतात. परंतु जर या लाल मुंग्यांच्या तोंडामध्ये अंडी असतील तर त्याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला अचानकपणे धन प्राप्ती होणार आहे. आता आपण पाहूया की काळया मुंग्या आपल्याला कोणता संकेत देत असतो? जर तुमच्या घरामध्ये काळा मुंग्या होत असतील तर त्याचे परिणाम हे शुभ असतात.

 

वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की काळा मुंग्या या शुभ फल देणाऱ्या असतात. त्यामुळे घरामध्ये सर्व काही शुभ घडत असते. त्याचबरोबर या मुंग्यांना देवांच्या मुंग्या असे देखील मी म्हटले जाते. या मुंग्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर्या प्राप्त होत असते. या मुंग्या तुमच्या घराच्या उत्तर दिशेकडून येत असतील तर असे समजून जा की, तुम्हाला लवकरच काहीतरी खास बातमी मिळणार आहे.

 

पूर्व दिशेकडून जर या मुंग्या येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. घरामध्ये मुंग्या झाल्या तर आपण त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मुंग्यांना मारणे हे खूप मोठे पाप आहे आणि आपण त्यांना मारून या पापाचे धनी होत असतो. म्हणूनच मुंग्यांना कधीही ईजा पोचवू नये. त्या मुंग्यांना तुम्ही खायाला घालावे. साखर, पेठ त्यांना खाऊ द्यावे.

 

असे केल्याने तुम्ही जर कोणते पाप केलेले असतील तर ते पाप कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत मुंग्या येत असतील तर यामुळे तुम्हाला आता मुंग्यांचा त्रास होत असेल तर या मुंग्यांवर चिमूटभर हळद टाका.यामुळे तुमच्या घरातून मुंग्या निघून जातील.

 

अशाप्रकारे आपल्या घरामध्ये होणाऱ्या काळा मुंग्या व लाल मुंग्या हे आपल्याला काही शुभ व अशुभ संकेत देत असतात. ते आपण जाणून घेणे खूप गरजेचे असते.

Team Viral Marathi