बापाला दूध पाजणारी मुलगी.. कारण ऐकून तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो हि एक इतिहासातील घटना आहे, मित्रांनो या कथेचा सार जाणून घेतल्यानंतर तुम्ही पण रडाल. एखाद्या मुलीचं आपल्या वडिलांवर किती प्रेम असत हे या लेखातून तुम्हाला बघायला मिळेल. आपल्या देशामध्ये मुली वाचवा व मुली जगवा असा संदेश देतात पण ह्याच मुली आपल्या बापावर किती जीव लावतात त्याचंच मित्रांनो हे ज्वलंत उदाहरण आहे.
सायमन नावाच्या म्हाताऱ्याला रोमन राज्यामध्ये शुल्लक कारणावरून कडक भयंकर शिक्षा झाली. त्या राजाने आदेश ठोठावला कि या म्हाताऱ्याला अन्न पाणी तो पर्यंत देऊ नका जो पर्यंत हा तडफडून त्या अंधारी कोठारींमध्ये मरत नाही. त्या म्हाताऱ्याला तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. प्रत्येकजन त्याच्या मरणाची वाट पाहू लागला. परंतु त्या ठिकाणी एक नियम होता कि त्याच्या घरच्यांना त्याला भेटता येऊ शकत होत. त्या म्हाताऱ्याला एक मुलगी होती, ती दिसायला आणि स्वभावाला चांगली होती आणि तिचा आपल्या बापावर खूप जीव होता.
तिला माहिती होत कि आपला बाप जरी गुन्हेगार असला तरी तो नात्याने आपला बापच आहे. त्या बापावर त्या मुलीचं जीवापाड प्रेम होत. मित्रांनो ती मुलगी जेव्हा या म्हाताऱ्याला भेटायला जायची त्यावेळी तिची कसून चौकशी केली जायची कि तिने काही खायला तर नेलं नाही ना..? तिच्यापाशी दुसरं काही तर नाही ना जेणेकरून म्हातारा जिवंत वाचेल. इतकी तिची कडक चौकशी केल्यानंतरच तिला त्या म्हाताऱ्याला भेटण्यासाठी पाठवलं जायचं.
मित्रांनो तब्बल एक महिना झाला, त्या म्हाताऱ्याची तब्येत खराब झालेली पण तो म्हातारा मेला नाही. एका महिन्यामध्ये जर माणसाला खायला पियायला नाही भेटलं तर तो माणूस मरून जातो पण हा म्हातारा जिवंतच कसा..? तेथील सुरक्षरक्षकांना राजाने दरडावले कि तुम्ही करता काय नेमकं.? त्याला तुम्ही खायला तर पुरवत नाही ना, त्याला कोण खायला तर आणून देत नाही ना तुम्ही.
तेव्हा त्या सुरक्षारक्षकाने त्या दिवशी त्या मुलीवर नजर ठेवायचं ठरवलं. मुलीला आत सोडल्यानंतर दुसरा सुरक्षारक्षक आतमध्येच लपून बसलेला होता. मुलगी आली आणि बापापाशी गेली, बाप त्या मुलीपाशी आला. मित्रांनो ती मुलगी एका लेकराची आई होती. एखाद्या बारक्या बाळाला स्तनपान करावं त्या पद्धतीने ती आपल्या बापाला स्तनपान करू लागली. हे पाहून सुरक्षारक्षकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हे कसलं कृत्य जे मुलगी आपल्या बापाला स्तनपान करत आहे.
मित्रांनो त्याने ताबडतोब त्या दोघांना पकडलं आणि राजापुढे हजर केलं. राजाने विचारलं पोरी तुझी काय अक्कल ठिकाणावर आहे का..? असला कसला गुन्हा तू केला. तेव्हा ती मुलगी म्हणाली मी जर माझ्या बापाला माझं दूध पाजलं नसत तर माझा बाप कधीचाच मेला असता. माझ्या बापाला काहीपण करून मला जिवंत ठेवायचं होत. काहीपण करून मी जोपर्यंत माझ्या जीवांमध्ये जीव आहे तो पर्यंत माझ्या बापाला जिवंत ठेवायच होत म्हणून मी हे कृत्य केलं. मग ते नैतिक आहे का अनैतिक हे मला नाही माहिती. परंतू माझा बाप माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. माझा पती मेलेला आहे आणि बापानेच लहानपणापासून माझा सांभाळ केलेला आहे. आणि माझा पती मेल्यानंतर माझा बापच माझा सांभाळ करतोय. आणि हा जर गेला तर मी कोणाकडे बघून जगू.?
मित्रांनो या दगड असलेल्या राजाला हृदयाचा पाझर फुटला, हि बातमी वणव्यासारखी त्या देशामध्ये पसरली. तेथील जनता रस्यावरती आली आणि सायमन ची शिक्षा माफ करायला लावली. मित्रांनो या ठिकाणी एका पित्यासमोर मुलीचं प्रेम जिंकलं होत आणि मुलीच्या प्रेमाने बापाचा जीव वाचवला होता. आणि राजाच्या तावडीतून सुद्धा त्या सायमनला वाचवलेलं होत.
या कथेचा मित्रांनो सारांश एवढाच आहे कि मुलगी बापावरती जीव खूप लावते. तीच आईवर एवढं प्रेम नसेल पण बापावर प्रेम खूप असतं. मित्रांनो कथा आवडली असेल तर कमेंट करा. आणि हि एवढी शेअर करा कि ज्यांना मुली आहेत त्यांना अभिमान वाटेल आणि ज्यांना मुली नाहीत त्यांना वाटेल कि आपल्याला सुद्धा एखादी मुलगी असायला पाहिजे.