कॉलेजमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन मित्रात भांडण होते; खूप वर्षानंतर समोर येताच पहा काय घडलं.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मैत्रीच नात एक अस नात आहे ज्यात ना जात पहिली जाते ना धर्म. हे नात जरी रक्ताच नसलं तरी तरी रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त माया या नात्यात असते. शाळा-महाविद्यालयात व्यतित केलेला काळ आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर काळ असतो शिवाय या काळात आपल्याला कळते ती दुनियादारी शाळेत-महाविद्यालयात प्रवेश केल्यावर अनोळखी असणारी माणसं आपल्या मनात जागा करतात आपण त्यांसोबत आपल्या भविष्याची स्वप्ने पाहू लागतो.
काही दिवसातच आपल्या मध्ये घट्ट मैत्री होते. परंतू या काळातच मित्रांप्रमाणे आपण काही शत्रूसुद्धा बनवतो ज्यांच्याशी आपले पटत नाही अथवा त्यांचे असणे आपल्या खटकते. कित्येक वेळा आपण छोट्या-मोठ्या भांडणांना कट्टर शत्रूतेचा आकार देतो. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की आम्ही तुम्हाला नक्की कशाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
आज विषय थोडा वेगळा आहे आज आम्ही तुम्हाला अशा एका घटने बद्दल सांगणार आहोत ज्याने तुमच्या मनातील मैत्रीची परीभाषच बदलून जाईल.चला तर जाणून घेवूया महाविद्यालयात कट्टर शत्रू असणारे दोघे जेव्हा खूप वर्षांनी भेटतात नक्की काय घडतं त्यांच्यात.? महाविद्यालयात शिकणारे दोन मित्र त्यातील एक गरिब तथा दुसरा परिस्थितीने थोडा बरा. एकदा गरिब मित्राने फाटक्या पँटला रफू मारुन घालण्यास सुरवात केली.
अगदी कोणाला समजू नये म्हणून तो त्याची खूप काळजी घेत असे. पण एकदा दुसर्या मित्राने रफू केलेली पँट पहिली व सगळ्या वर्गात या गोष्टीचा बाजार मांडण्यास सुरवात केली. सगळा वर्ग त्या गरीब मुलावर हसू लागला होता. त्यावेळी संपुर्ण वर्ग खद-खदुन त्या गरीब मुलावर हसत होता तेव्हा तो त्या मित्राला म्हणाला होता देव न करो आणि अशी वेळ तुझ्यावर येवो.
त्यानंतर त्याने त्या गरीब मित्राची खूप वेळा माफी मागितली परंतू त्याने दुसर्या मित्राला तोडल ते कायमच आणि खूप वर्षांनी तो दुसर्या गरीब मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला होता. दोघांनाही एकमेकांना बघून आधी घट्ट मिठी मारली. त्यानंतर त्या गरीब मित्रा अहंकरी भाषेत दुसर्या मित्राला म्हणाला ”काय रे एवढ्या वर्षांनी आज माझी आठवण आणि चक्क तुला! वर्गात असताना तर या गरीब मित्राची तुम्ही खूप खिल्ली उडवली होती ना आज माझ्याकडे खूप पैसा आहे. जेवढा तुझा महिन्याचा पगार नाही आहे ना तेवढा पैसा मी एक दिवसात कमवतो.
हे ऐकून दुसरा मित्र उत्तरला ”होय मित्रा, खरचं तू खूप प्रगती केली आहेस बघून बरं वाटल. महाविद्यालयात झालेल्या एका चुकीमुळे तू माझ्याशी संबंध तोडलास तो कायमचा. मित्रा तू दिलेला तो मला एवढा लागेल अस स्वप्नातही वाटलं नव्हतं रे. माझ्या मुलाच्या हृदयाच ठिगळ मी नाही भरु शकलो रे गेल्याच महिन्यात त्याच नि’ध’न झाल. तुझा तो शाप खरच मला लागला. एवढ बोलून त्याला रडू कोसळले दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली व त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मित्रांनो आमची तुम्हाला विनवणी आहे की कधी ही कोणाच्या गरीबीची थट्टा मस्करी करु नका अश्या मुळे तो गरीबीने खचलेल तो व्यक्ती अजून खचत लोकांमुळे ही खचून जातो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.