भांग पिल्यानंतर ती तालावर कशी नाचवते आणि त्यामुळे शरीरावर काय परिणाम होतात..?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एखादा आनंदोउत्सव विशेषतः होळी आली तर सर्वप्रथम आठवण येते ती भांगची. तसे भारतात भांगेचे सेवन करणे हे अगदी प्राचीन काळापासून चालत आलंय. काही लोक तर याला आपल्या संस्कृतीचाच एक भाग मानतात. सुख्या मेव्यासोबत भांग दुधात मिसळून पिणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. बरेच लोक असेही म्हणतात कि भांग पिऊन होणारी नशा हि इतर नशेच्या तुलनेत विलक्षण वेगळी असते. पण तुम्हाला माहिती आहे का भंग पिणाऱ्याच्या सर्व शरीराचं नियंत्रण काही वेळातच भंग आपल्या हातात घेते आणि लोक नशेत झुरू लागतात. एकच गोष्ट वेड्यासारखी पुन्हा पुन्हा करतात. तुम्हाला ठाऊक आहे का हे असं का होतं..?

twitter

आज भांगेचे शरीरावर होणारे परिणाम तर पाहणारच आहोत सोबतच भांग कशी तुमच्या शरीरावर प्रभुत्व मिळवते याबद्दलही सविस्तर जाणून घेणार आहोत.

wikipedia

भांग ठराविक प्रमाणात पियालाने किंवा भांगेची मिठाई खाल्ल्याने नशा हि प्रमाणातच राहते कारण काही प्रमाणात चढली तर थोड्याच वेळानंतर उतरते. मात्र भंग बनवणारे उस्ताद भांगेत सुखा मेवा घालून तीच असं स्वादिष्ट दूध बनवतात कि लोकं आपल्या जिभेवर आवर घालूच शकत नाहीत. आणि प्रमाणाबाहेर भांग पिऊन घेतात आणि मग त्यांच्या डोक्यात असणारी एकच गोष्ट ती पुन्हा पुन्हा करत राहतात. बऱ्याच वेळेला भाग पिणाऱ्या व्यक्तीला नशेत वाटतही कि मी असं का वागतोय, पण तो आवर घालू शकत नाही.

भांग अतिशय हळूहळू चढते पण एकदा चढल्यावर माणसाचं मानसिक संतुलन च बिघडून जातं. सतत हसायला येतं किंवा रडायला येतं. तोंड कडू पडू लागतं, झोपल्यावर हवेत उडल्यासारखं वाटू लागतं. जास्त प्रमाणात भांग घेतली असेल तर हि नशा उतरायला २ ते ३ दिवस लागतात तर काही वेळेस एक आठवडाही लागतो. भांग घेणाऱ्यांनी प्रमाणाच भान ठेवावं कारण नशेत काहीही होण्याची शक्यता असते. कित्येक वेळा प्रमाणाबाहेर भांग घेणाऱ्यांना दवाखान्यात दाखल करावं लागतं.

favpng

पूर्वी पणी नावाने ओळखली जाणारी मनुष्य जाती भांगेची शेती करायचे. भांगेच्या झाडाचे नर आणि मादी असे २ प्रकार असतात. नर झाडाची पाने सुकवून भांग बनविली जाते तर मादी झाडाचा फुलोरा सुकवून गांजा बनवला जातो. व या झाडाच्या पानातून व फांद्यातून निघणारा चीक म्हणजेच चरस. हे सांगण्या मागचं कारण हेच कि शरीरासाठी चरस गांज्या इतकंच भांग घातक आहे. भांगेच जास्त प्रमाणात सातत्याने सेवन केल्यास मानसिक संतुलन कायमचं बिघडू शकतं. स्मरणशक्ती कमी होते, लैगिक समस्या उदभवतात, एकाग्रही होता येत नाही, चिडचिड होते, डोळे, कान , नाक , त्वचावरही भांगेचा वाईट परिणाम होतो. हे व्यसन मृत्यूचं कारणही ठरू शकतं.

scoopwhoop

भांगेची शेती विशेषतः पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. या झाडांचा उपयोग औषधांसाठी केला जायचा मात्र कोणाला नशा करायची बुद्धी सुचली देव जाणे..! सण उत्सव या दिवशी काही प्रमाणात नशा करायला हरकत नाही. सातत्याने प्रमाणाच्या बाहेर नशा करणाऱ्या व्यसनी प्राण्यांनी वेळेवर सावरायला हवं.

आत्तापर्यंत भांग म्हणजे काय हे तुम्हाला नक्कीच कळले असेल. यासंदर्भात तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट करायला विसरू नका. आणि हि माहिती आवडल्यास सगळीकडे शेअर करायला नक्कीच विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *