ह्या एका घटनेमुळे सचिन तेंडुलकर झाला क्रिकेटचा देव..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपलं स्वागत आहे. क्रिकेट मध्ये १०० आंतराष्ट्रीय शतके झळकवणारा जगातील पहिला खेळाडू तसेच ३०,००० पेक्षा जास्त रन्स बनवणारा जगातील पहिला खेळाडू, तब्बल २२ वर्ष भारतीयच नाही तर पूर्ण जगातल्या क्रिकेटवेड्या लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या तुमचा आमचा सर्वांचा लाडका तो म्हणजे Sachin Tendulkar ज्याला क्रिकेटचा देव सुद्धा म्हटले जाते.
आज आम्ही त्याच्या आयुष्यातली एक छोटी गोष्ट सांगणार आहोत. ज्या गोष्टीमुळे त्यांचे आयुष्य बदलले. आणि जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज होण्यास या गोष्टीचा मोठा वाटा आहे.
सचिन शाळेत असताना त्याच्या शाळेतील जुनिअर टीम कडून खेळत असे. सचिनचे कोच म्हणजे त्याचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर आपल्या सर्वांना परिचयाचे आहेत. त्यांनी सचिन मधली गुणवत्ता ओळखली होती. म्हणून ते सचिन साठी नेहमी सर्वसामने ठेवत जेणेकरून सचिन ला जास्तीत जास्त ब्याटिंग चा सराव करण्यास मिळेल हि त्या मागची संकल्पना होती.
असेच एक दिवस त्यांनी सचिन साठी एक सरावसामना ठेवला होता. आणि आचरेकर सरांनी सचिनला सांगितले तुझी शाळा सुटल्यानंतर मी सरावसामना ठेवला आहे. माझं कॅप्टन बरोबर बोलणं झालं आहे. तुला फिल्डिंग करायची गरज नाही आणि तू ४ थ्या नंबर वर फलंदाजी कर. हे सांगून आचरेकर सर निघून जातात. नेमके त्याच दिवशी सचिनच्या शाळेतल्या सिनिअर टीमची वानखेडे वर एक फायनल Match होती.
सचिन त्यांचा सराव सामना सोडून फायनल Match बघायला जातो. तिथे तो आपल्या सिनिअर टीम चा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्या वाजवतो. आणि Match ची पूर्ण मज्जा घेतो.
Match संपल्यावर सचिन बघतो तर समोरून आचरेकर सर येत असतात. तेव्हा सचिन जाऊन त्यांना नमस्कार करतो. तेव्हा सर त्याला विचारतात आजच्या Match मध्ये तू किती रन्स बनवले?. तेव्हा सचिन सांगतो कि मी सिनिअर टीम चा उत्साह वाढवण्यासाठी इथे आलो होतो. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होतो. तेव्हा आचरेकर सर सचिनला खूप ओरडले.
तिथे आजूबाजूला बरेच जण होते. आचरेकर सर म्हणाले हे बघ सचिन तुला दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवायची गरज नाही तू तुझ्या क्रिकेट ची काळजी घे आणि आयुष्यात असं काहीतरी करून दाखव जेणेकरून लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील. हे ऐकून सचिनचे डोळे उघडतात आणि तिथून पुढे तो कधीच सराव सामन्याला गैरहजर राहत नाही.
सचिन सांगतो कि हा त्याच्या आयुश्यातला सर्वात मोठा धडा होता. आणि नंतर सचिनने काय केले हे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. हि गोष्ट सांगायचा हेतू हा कि मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात असं काहीतरी करून दाखवा कि लोकांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत.
पुनर्जन्म असतो नसतो माहित नाही पण ह्या आयुष्यात असं काहीतरी करा कि लोकांनी तुमचे नाव काढले पाहिजे. किती दिवस आपण लोकांना मोठे होताना बघणार आहोत? किती दिवस आपण दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवणार आहोत? तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तिथे टॉप ला जायचा प्रयत्न करा. मेहनत करा.
आमचा हेतूच हा आहे कि तुम्हाला तुम्हाला तुमच्यामध्ये असलेल्या क्षमतेची जाणीव करून देणे जेणेकरून तुम्ही त्याचा वापर करून तुमच्या क्षेत्रात टॉप ला जाल. आणि अशाने आपला देश सुद्धा पुढे जाईल.
हि माहिती आवडली असेल तर आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा.