श्रीमंत आणि यशस्वी माणूस होण्याचे हे ५ नियम तुम्हाला माहिती आहेत का..?
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला बिल गेट्स यांच्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. मायक्रोसॉफ्ट चे संस्थापक आणि जगातले दुसरे श्रीमंत व्यक्ती ज्यांची संपत्ती १०३ billion डॉलर्स म्हणजेच ७.५ लाख करोड रुपये आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती यशाच्या एवढ्या मोठ्या शिखरावर पोहोचते तेव्हा त्या व्यक्तीच्या शब्दाला , वाक्याला, प्रतिक्रियेला खूप महत्व असतं. कारण या जगात प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते. आणि यश मिळवण्याचा सर्वात सोप्पं मार्ग म्हणजे जो आधीच श्रीमंत झालेला आहे त्याचे गुण ,त्याच्या सवयी आणि त्याच्या विचार करण्याची पद्धत आपल्यामध्ये उतरवणे.
म्हणूनच आपण बिल गेट्स यांनी सांगितलेले ५ असे विचार बघणार आहोत ज्यांचा आपण अवलंब केला तर जीवनात आपण यशस्वी आणि श्रीमंत होऊ शकतो. भले बिल गेट्स यांच्या एवढे होणार नाही पण आत्ताच्या परिस्तिथी पेक्षा मोठा बदल नक्कीच आपल्या आयुष्यात होईल.
१. स्वतःची तुलना कोणाबरोबर सुद्धा करू नका.
जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही स्वतःचा अपमान करून घेत आहात. बिल गेट्स म्हणतात या जगात जो कोणी मनुष्य जन्म घेतो तो खास आहे. प्रत्येकामध्ये प्रचंड शक्ती आहे कोणीही दुर्बल नाही. प्रत्येक माणूस एका लोहचुंबकासारखा आहे. तो त्याला आयुष्यात हवं ते मिळवू शकतो फक्त त्याला स्वतःमध्ये असलेल्या क्षमतांची जाणीव झाली पाहिजे. मग तो काहीही करू शकतो.
म्हणून बिल गेट्स म्हणतात तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्या कोणासोबतही करू नका. मग ती व्यक्ती लहान असो किंवा मोठी. जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेत आहात. तुम्ही असामान्य आहात, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुमच्या मध्ये स्वतःचे असे विशेष गुण आहेत जे दुसऱ्या कोणामध्ये नाही.
२. जर तुम्ही गरीब घरात जन्माला आला असाल तर तो तुमचा दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात हा तुमचा दोष आहे.
बिल गेट्स म्हणतात जेव्हा तुम्ही गरीब घरात जन्म घेता या घटनेवर तुमचा कोणताच कंट्रोल नाही. पण जेव्हा तुम्ही या पृथ्वीवर येता तेव्हा तुमच्याकडे कर्म स्वातंत्र्य आहे. तुमच्याकडे सुद्धा दुसर्यांसारखे काही मोठं करण्याची संधी असते. तुम्ही आयुष्यात असे काही करा ज्याने तुमचे आयुष्य सर्वांगाने समृद्ध आणि सुखी झाले पाहिजे. जर तुम्ही गरीब घरात जन्म घेऊन गरीब म्हणूनच मेलात तर याचा अर्थ असा होतो कि तुम्ही आयुष्यात काहीच कर्तृत्व केले नाही.
३. अभ्यास आणि आयुष्य ह्या दोघांना एकाच तराजू मध्ये मापू नका. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
मी परीक्षेत काही विषयांमध्ये नापास झालो होतो आणि माझे सगळे मित्र पास झाले होते. आणि आज त्याच काही मित्रांपैकी मायक्रोसॉफ्ट कंपनी मध्ये इंजिनिअर आहेत आणि मी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मालक. बिल गेट्स म्हणतात शालेय अभ्यास आणि आयुष्य या दोघांना एकाच तराजू मध्ये मापू नका दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जरी परीक्षेत नापास झालात तरी आयुष्य तिथेच संपत नाही.
आपल्या अभ्यासासोबत आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव द्या. आपल्या मध्ये नवनवीन कौशल्य विकसित करा. बिल गेट्स यांची हि गोष्ट आपल्याला एवढंच शिकवते की परीक्षेत पहिलं येणं म्हणजे आयुष्यात पाहिलं येणं नाही. तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवनवीन गोष्टी शिकत राहिले पाहिजे आणि स्वतःची प्रगती करून घेतली पाहिजे. जर तुम्ही अभ्यासात मागे असाल तर काही हरकत नाही जरुरी नाही कि जो अभ्यासात प्रगती करतो तोच आयुष्यात प्रगती करतो. तुम्ही त्यांच्यासुद्धा पुढे जाऊ शकता.
४. नेहमी भूतकाळातल्या चुकांमधून शिका.
यश मिळाल्यांनतर त्याचे सेलिब्रेशन करणे चांगली गोष्ट आहे पण त्या पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे झालेल्या चुकांमधून शिकणे. बिल गेट्स म्हणतात आपण नेहमी आपल्या झालेल्या चुकांमधून शिकत राहिले पाहिजे.
यश मिळाल्यांनतर त्याचा जल्लोष करने चांगले असते पण त्या यशामध्येच आपण गुंतून राहिलो तर आळशी होऊ. तुम्ही ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनत घ्या भरपूर परिश्रम करा. आणि एकदा ध्येय गाठले तर तिथेच थांबू नका कोणत्या चुका तुम्हाला ते ध्येय गाठण्यापासून थांबवत होते त्याचा अभ्यास करा आणि पुढे जात राहा. ती सवय तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल.
५. नेहमी बेस्ट प्रॉडक्ट बनवा.
बिल गेट्स म्हणतात मायक्रोसॉफ्ट मधला प्रत्येक कर्मचारी जेव्हा रोज कामावर येतो तेव्हा तो हेच ध्येय घेऊन येतो की त्याला आज बेस्ट ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट बनवायचं आहे. कोणतेही प्रॉडक्ट बनवताना कॉम्प्रोमाईस करत नाही. त्यासाठी आम्ही वेळोवेळी लोकांचे आणि क्लायंटस चे फीडबॅक घेत असतो. जेणेकरून प्रॉडक्ट अजून कसा चांगला होईल आणि आमच्या कंपनीला मिळालेल्या यशाचे हे महत्वाचे गुपित आहे. त्यामुळे आयुष्यात कोणतेही काम करत असाल तर ते बेस्ट असलं पाहिजे व सर्वोत्तम असले पाहिजे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.