तुमच्या जवळचीच लोकं व नातेवाईक तुमची सतत बदनामी करत असतील तर त्यांची तोंड कशी बंद करावी.?

तुमच्या जवळचीच लोकं व नातेवाईक तुमची सतत बदनामी करत असतील तर त्यांची तोंड कशी बंद करावी.?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे प्रत्येकाला अनुभव आलेला असणार कि समाजात विनाकारण बदनामी  होते. बाहेरचे तर सोडाच घरचे व नातेवाईक सुद्धा माघारी तुमची बदनामी करत फिरतात. तुमच्या बद्दल अफवा पसरवतात, तुमची कोणतीही चूक नसूनही अपमान सहन करावा लागतो.

त्यामधील काही माणसं जवळची असल्याने तुम्ही त्यांना काही बोलूही शकत नाही कारण ते असतात नातेवाईक, मित्र, भाऊबंध , अगदी घरातले सुद्धा काहीजण मग हे लोक तुमची बदनामी करत असतील तर तुम्ही गप्प बसायचं का.? अशा परिस्थिती मध्ये काय करावं याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. माणसं पाय खेचतात.

➧ सुरुवातीला असे लोक का एखाद्याची बदनामी करतात त्याची कारणे पाहू.

पहिलं कारण आहे दुसऱ्याच्या यशाची, ताकदीची भीती वाटणे. समोरचा व्यक्ती यशस्वी होतोय, काहीतरी मोठं करतोय, आपण स्वतः मात्र यशस्वी होऊ शकत नाही, समोरचा व्यक्ती करोडपती बनतोय, लखपती बनतोय. मात्र स्वतःला पैसे कमवता येत नाहीत. दुसऱ्याच यश व स्वतःच अपयश मनामध्ये तिरस्कार करू लागतो.

याचाच परिणाम शेवटी अपयशी व कमी मनोबल असलेला व्यक्ती दुसऱ्याची बदनामी करून स्वतःला चांगला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. उदा. एखादे नातेवाईक असतात ज्यांचा मुलगा डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघत असतो पण ऍडमिशन मिळत नाही. परंतु तुम्ही मात्र डॉक्टर बनता, तेव्हा ते लोक तुमची बदनामी करतात.

तो कॉपी करून पास झालाय, पैसे येऊन डिग्री विकत घेतली, याला काहीही नॉलेज नाही, बेकार डॉक्टर आहे, त्याला कोणताही आजार बरा करता येत नाही.  अशा अनेक मार्गांनी तुमची बदनामी करायला सुरवात करतात. याच कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा बुद्धीने, शिक्षणाने, व धनाने श्र्येष्ट बनला आहात.

दुसरा प्रकार आहे मूर्ख लोक, या लोकांची विचारसरणी खालावलेली असते. स्वतःला जिंकायचं असेल तर मेहनत करून पुढे जाणार नाहीत तर मोठ्या व्यक्तीला पाडून पुढे जाण्याचा विचार करतात. एक म्हण प्रसिद्ध आहे

मराठी माणूस खेकड्यासारखा आहे, जो आपल्याच पुढे जाणाऱ्या माणसाचे पाय मागे खेचतो. 

असे सर्वजण नसतात, पण बरेच असे लोक आपल्याला पाहायला मिळतात जे विनाकारण सर्वांची बादनामी करत असतात. १० हजार कमवायची अक्कल नसते तरी पंतप्रधानाची मापं काढतात. असे लोक केवळ मूर्ख आहेत म्हणून अशा लोकांपासून शक्य तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा हे लोक तुमचा अपमान करतील, बदनामी करतील तेव्हा स्वतः जास्त पॅनिक होऊ नका.

कारण तुम्हाला जर राग आला तर स्वतःवरचा ताबा सुटतो, विनाकारण भांडणाला सुरवात होते, नको ते शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडतात व त्याच बाहेर पडलेल्या शब्दांमुळे तुमची अजून बदनामी होऊ शकते. परिणामी तोच मूर्ख व्यक्ती तुम्हाला अजून बदनाम करायला सुरवात करतो. तुमचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. म्हणून डोकं शांत ठेवा, स्वतःच्या चेहऱ्यावर मंद स्मित ठेऊन त्याचा अपमान करा. तुमच्या हसण्याने व प्रतिकार न केल्याने बदनामी करणारा खूपच अपमानीत होतो.

त्यानंतर त्याचे उत्तर तुम्ही काम करून द्या व इथून पुढे जेव्हा तो माणूस तुमच्या पुढे येईल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल ठेवा. तुमचा हाच आनंद पाहून बदनामी करणारा व्यक्ती स्वतः बदनाम होईल. त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागेल. जर हा राग तुम्ही कृती न करता बोलून व्यक्त केला तर त्याचे नुकसान तुम्हालाच भोगावे लागेल. म्हणून राग बोलून नाही तर कृती करून यशस्वी होऊन व्यक्त करा.

आम्ही आशा करतो तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल . आणि आवडल्यास कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *