या 6 देशांमध्ये रात्र होत नाही..का ते एकदा नक्की वाचा
आपण भारतीय सर्वात स्वस्त आणि मस्त जीवन जगतो म्हणूनच आपल्या भारत देशाला सुजलाम सुफलाम असा देश म्हणतात. भारतामध्ये दिवस व रात्र,ऊन,पाऊस सर्वकाही समतोल प्रमाणात पाहायला मिळतात. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का..? जर दिवस बुडाला नाही तर..? कायम सूर्यप्रकाश म्हणजेच २४ तास सूर्य पाहायला मिळाला तर..? किंवा सतत २४ तास रात्र पाहायला मिळाली तर..?
होय असे काही देश आहेत जिथे सूर्यप्रकाश काही महिने पाहायला मिळतो. तर काही देशामध्ये कायम रात्रच पाहायला मिळते. अशा काही रहस्यमय जागेंची माहिती आज आपण पाहणार आहोत.
१. Norway
हा देश युरोपियन देश आहे. हा जास्तीत जास्त जंगलांनी भरलेला आहे. या देशात मे पासून जुलै पर्यंत म्हणजेच जवळपास ७० ते ८० दिवस सूर्यास्त होत नाही म्हणजेच ३ महिने रात्र पाहायला मिळत नाही. Norway मधील काही प्रदेशांमध्ये ४ महिन्यापर्यंत सूर्यास्त होत नाही. ज्या लोकांना असे वातावरण आवडते त्या लोकांनी Norway ला जरूर भेट द्यावी.
२. Canada
कॅनडा हा दुसरा असा देश आहे ज्याचा सर्वात जास्त भाग बर्फ़ाने झाकलेला आहे. तेथील काही प्रदेशांमध्ये ५० दिवसांपर्यंत सूर्यास्त होत नाही. या प्रदेशामध्ये बरेच पर्यटक भेट देतात ज्यांना मजेदार रोड ट्रिप करण्याची आवड असते. बर्फाळ प्रदेशामध्ये लॉंग ड्राईव्ह करण्याची एक वेगळीच मज्जा असते.
३. Iceland
आइसलँड सुंदर असा देश आहे. ज्याला पाहताच क्षणी डोळ्याचे पारणे फिटतात. ग्रेट ब्रिटन नंतर हा सर्वात मोठा आयलंड आहे. येथे मे पासून जुलै पर्यंत सूर्यास्त होत नाही. या प्रदेशांमध्ये खूप सारे धबधबे तसेच ज्वालामुखी पाहिल्यानंतर मन मोहून जाते. निसर्गाचे वेगवेगळे पेहलु येथे पाहायला मिळतात.
४. Sweden
हा देश सुद्धा सुंदरतेने भरपूर आहे. या देशामध्ये सूर्यास्त मध्यरात्री होतो व काही प्रमाणात सूर्य दिसतही असतो. पहाटे ४:३० वाजता पुन्हा सूर्याचा उदय होतो. हा दिनक्रम मे पासून ऑगस्ट पर्यंत सर्वात जास्त पाहायला मिळतो. या देशाचा ३० टक्के भाग पाण्याने व्यापलेला असून त्या वॉर १४ आयलंड आहेत. ज्यांना पहिल्यांनंतर स्वर्गसुखाचा आनंद मिळतो.
५. Finland
फिनलँड हा देखील सुंदरतेने भरलेला असून पर्यटकांसाठी एक आकषर्णाचा भाग आहे. पण सर्वात आकर्षित करणारा भाग म्हणजे गर्मीच्या ऋतू मध्ये ७० ते ७५ दिवस सूर्यास्त होत नाही. सतत सूर्य आणि सूर्यकिरणे पाहायला मिळतात. याच्याविरुद्ध थंडीच्या वेळेस सूर्यास्त दिसणे कठीणच असते. त्यामुळे काही काळ जास्त सूर्यप्रकाश आणि काही काळ सूर्यास्त पाहायला मिळतो. व हाच प्रकार देशाला पर्यटनाचा केंद्रबिंदू बनवतो.
६. Murmansk
हे रशियातील ठिकाण आहे इथे ३० ते ४० दिवस सूर्योदय होत नाही. विना सूर्यप्रकाशाचे ४० दिवस येथील लोक राहतात पण भारतीय लोक ४० दिवस अंधारात राहण्याचा विचार हि देखील करू शकत नाही. पण या प्रदेशातील लोक आनंदाने येथे राहतात.
जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.