इंटरनेट कसे काम करते.? | How Work The Internet.?
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माणूस आज एकवेळ जेवणाशिवाय राहू शकतो पण इंटरनेट शिवाय राहता येत नाही. तुम्हाला माहिती आहे का कि नेमकं हे इंटरनेट कशा पद्धतीने चालतं. इंटरनेट हे सेटलाईट द्वारे चालतं किंवा अजून काही दुसऱ्या पद्धती आहेत. आज आपण याच इंटरनेटविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
कदाचित तुम्हाला आतापर्यंत माहितीच असेल कि इंटरनेट हे सेटलाईट द्वारे चालतं. Jio ने हे सेटलाईट विकत घेतले आणि त्यानंतर त्यांनी इंटरनेट हे अतिशय कमी दरात देण्याचा प्रयत्न केला. मात्र तसं काहीही होत नाही. ९९% इंटरनेट हे ऑप्टिकल फायबर द्वारे चालतं. ऑप्टिकल फायबर या कॅबल समुद्रा द्वारे कनेक्ट केल्या जातात आणि नंतर त्याच्या द्वारे इंटरनेट चालतं. इंटरनेट हे फ्री आहे, जर तुमचं ऑफिस असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही ऑप्टिकल फायबर कनेक्ट केली किंवा २ कॉम्पुटर या ठिकाणी कनेक्ट केले तर जो काही डेटा तुम्ही ट्रान्सफर करणार आहात तो अगदी फ्री मध्ये होणार. परंतु इंटरनेट हे तुमच्या पर्यंत येईपर्यंत त्याचा Cost वाढत जातो. ३ कंपन्या या मध्ये मुख्य असतात त्या म्हणजे TR1,TR2,TR3
TR१ कंपनी असते ती समुद्रातून ऑप्टिकल फायबर पसरविण्याचे काम करते तसे प्रत्येक देशामध्ये याला पसरविण्याचे काम करते. TR2 आणि TR2 या कंपन्या असतात त्या त्यांच्याद्वारे कनेक्शन घेतात आणि ते तुमच्या राज्यांपर्यंत आणि राज्यांपासून शहरांपर्यंत आणि शहरांपासून गावापर्यंत पोहोचवतात.त्याला जो Cost लागतो तो मिळून तुमच्यापर्यंत हे वाढत जाते.
आता तुम्ही म्हणाल इंटरनेट हे पूर्ण ऑप्टिकल फायबर द्वारे चालते तर मग आमच्या मोबाईल मध्ये कुठल्याही प्रकारची वायर कनेक्ट केलेली नाही. तर तुमच्या नेटवर्क च जे टॉवर असते त्या टॉवर पर्यंत पूर्ण देशाद्वारे ऑप्टिकल फायबर कनेक्ट केलेलं असतं मात्र त्या टॉवर पासून तुमच्या मोबाईल मध्ये येण्यासाठी त्याला एक Frequency दिलेली असते त्यानंतरच तुमच्या मोबाईल मध्ये इंटरनेट काम करत असते. आता या ठिकाणी तुम्ही बघितले तर सर्वात जास्त केबल्स मुबईद्वारे ,चेन्नईद्वारे, आहेत. तर तुमचा जो काही डेटा आहे तो याच ठिकाणाहून जाणार आहे. JIO ने त्यांचं केबल हे आशिया, युरोप , या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा जो काही ट्राफिक आहे त्यासाठी त्यांना ० पैसे लागतात. त्याचा फक्त जो Maintainance खर्च आहे तो तो केबलसाठीच लागतो. त्यामुळे Jio ने त्यांचा डेटा कमी दरात दिलेला आहे. म्हणून आधी इंटरनेटचे जे काही रेट होते ते खूप महाग होते. कारण एरटेल,आयडिया , वोडाफोन हे TR १ कंपनीपासून विकत घेत होते आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंत त्याचे रेट वाढवत होते. मात्र आता कॉम्पिटिशन मुळे हे रेट अतिशय कमी होत आहेत
तर मित्रांनो तुम्हाला कळलेच असेल कि इंटरनेट कशाप्रकारे काम करते. जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.