संजय दत्त साकारणार बाजीप्रभू…? पहा कधी प्रदर्शित होतोय हा ऐतिहासिक चित्रपट..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो गेल्या काही दिवसात एकावर एक असे ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होताना आपण बघत आहोत. आणि पूर्ण महाराष्ट्र व भारताकडून अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद येत आहे. या मध्ये बोलायचे झाले तर फर्जंद , पानिपत, तान्हाजी यांसारखे चित्रपट आहेत. आणि या चित्रपटांना संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळताना आपण पाहत आहोत.
सध्याचे बोलायचे झाले तर तान्हाजी हा चित्रपट चित्रपटगृहात अजूनही धुमाकूळ घालत आहे. अजून सुद्धा या चित्रपटाविषयी लोकांची क्रेज कमी झालेली नाहीय. चित्रपटासोबतच जिथे तान्हाजी मालुसरेंनी लढाई केली तो सिंहगड बघण्यासाठी सुद्धा जवळजवळ दिवसाला ३०-४० हजार लोक जात आहेत. इतका प्रभाव या चित्रपटामुळे झालेला आहे.
आणि असाच अजून एक इतिहास आपल्यासमोर येत आहे. अभिजित देशपांडे यांनी पावनखिंड या आगामी चित्रपटाची घोषणा नुकतीच केलेली आहे. हा चित्रपट बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी जी पावनखिंडीमध्ये लढाई केली त्या लढाईवरती आधारित असा हा चित्रपट असणार आहे.
तसेच या चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण साकारणार हा एक मुद्दा आहेच. त्याविषयी कोणतीही अधिकृत सूचना झालेली नसली तरी ज्या वेळी अभिजित देशपांडे यांनी ट्विटर वर पोस्टर पोस्ट केले त्या वेळी एका युसर ने अशी कमेंट केली कि या चित्रपटात संजय दत्त यांना बाजीप्रभू देशपांडे यांची भरदस्त अशी भूमिका देण्याची इच्छा व्यक्त केली आणि अभिजित देशपांडे यांनीही त्याला ओके असा रिप्लाय दिला.
आता हेच बघायचं आहे कि या चित्रपटासाठी बाजीप्रभूंची भूमिका कोण साकारणार आहे. खरोखरचं संजय दत्त हि भूमिका साकारणार आहेत कि नाही हे अजून काहीही जाहीर झालेले नाही. तुम्हाला काय वाटत कोण हि भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतं? हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवू शकता. सोबतच हि पावनखिंडीतील थरार बघायला तुम्हाला सुद्धा आवडेल. तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करायला विसरू नका.
Ajay Devgan only