“तू गोरं दिसण्यासाठी ट्रीटमेंट केली आहे” अशा युजरच्या कमेंटवर बिपाशाने दिले हे भन्नाट उत्तर..
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरने शुक्रवारी ‘फेअर’ हा शब्द आपल्या ‘फेअर अँड लवली’ क्रीमवरून काढण्याचा निर्णय घेतला. ही बातमी समजताच लोक वर्णभेदाला प्रोत्साहन देणार्या क्रीमबद्दल आपले मत व्यक्त करीत होते आणि यावर बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूनेही आपले विचार मांडले, पण त्यानंतर एका युजरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला ज्यांनंतर बिपाशाने त्याला चोख प्रत्युत्तर देखील दिले.
बिपाशा बसूच्या पोस्टवर एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, “तुम्ही गोऱ्या दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्किन लायटनिंग आणि व्हाईटनिंग ट्रीटमेंट केली आहे”. यावर बिपाशाने उत्तर दिले, “खरंच .. मला हे सांगण्याबद्दल धन्यवाद. माझी त्वचा खूप नाजूक आणि एलर्जिक आहे … मी आयुष्यात दोन फेशियल केले आहेत. विचित्र गोष्ट … अनोळखी व्यक्तीला मी काय केले ते माहित आहे”.
बिपाशाने सावळेपणामुळे तिच्या आयुष्यात निर्माण झालेल्या समस्यांविषयी लिहिले, “जेव्हा मी मोठी होत होते तेव्हा नेहमी एक गोष्ट मी ऐकत होती की बोनी सोनीपेक्षा जास्त सावळी आहे. माझी आईसुद्धा सावळी आहे आणि मी तिच्यासारखीच दिसते. पण मी लहान असताना माझ्या दूरच्या नातलगांमध्ये रंगाविषयी या चर्चा असायच्या.
बिपाशा पुढे हे लिहिले- ‘मी वयाच्या 15 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली आणि मी सुपर मॉडेलची स्पर्धा देखील जिंकली. सर्व वर्तमानपत्रांत असे लिहिले होते की कोलकत्ताची सावळी मुलगी बनली विजेती. मला आश्चर्य वाटले की सावळा रंग माझे पहिले वैशिष्ट्य कसे काय असू शकते.? नंतर मला या गोष्टीचे वाईट देखील वाटले कि मला अशी नावं लोकं का देत आहेत.
बिपाशा बसू पुढे अजून म्हणाली , ‘जगभर फिरल्यानंतर मी पुन्हा भारतात परतआले आणि चित्रपटांच्या ऑफर मला येऊ लागल्या. मग मी माझा पहिला चित्रपट “अजनबी” हा केला. मला सर्वांनी स्वीकारले आणि प्रेम दिले, पण सावळेपण माझ्यासोबत कायम जोडलं गेलं. माझासावळा रंग हा चर्चेचा मुख्य विषय होता. गेल्या 18 वर्षांपासून स्किन केअर कंपन्यांनी मला बर्याच पैशांची ऑफर दिल्या, परंतु मी नेहमीच माझ्या तत्त्वांवर टिकून राहिली.
तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला नक्कीच विसरु नका.