लोकं तुम्हाला फसवतील त्या अगोदर हे नक्की वाचा..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो स्वतःसाठी थोडासा वेळ काढाच.. कारण आपण नेहमी इतरांसाठी जगत राहतो पण स्वतःसाठी जगणे मात्र राहूनच जाते. रडवणारे नेहमी तेच असतात जे आपल्याला सांगतात कि मी तुला कधी रडू देणार नाही. आपण जीवनात कितीतरी मित्र बनवतो, नातेवाईक बनवतो परंतु त्यातून आपले कोण व परके कोण हे फक्त वेळ आल्यावरच समजते. हे पण एक कडू सत्य आहे.
म्हणून आपल्या जीवनात एक नियम बनवून घ्या कि जीवनात नातेसंबंधी सर्वांशी ठेवा परंतु कोणाकडूनही अपेक्षा ठेऊ नका. कारण अपेक्षेचा नेहमी अपेक्षा भंगच होत राहतो. जर आपल्याला गरज असेल तर अशा वेळी आपल्याला कोणीही मदत करणार नाही. सर्वजण अशावेळी आपली असहायता दाखवतील परंतु देखाव्यासाठी आपल्याबरोबर सहानुभूती दाखवतील. या दुट्टपी जगातील लोकं तुमच्या जीवनातील दुःख व त्रास रडून रडून विचारतील व इतरांकडे हेच ते हसून हसून सांगतील.
परंतु चुकीचे ते नाहीत जे आपल्याला फसवतात तर चुकीचे तर आपण आहोत कि आपण त्यांना त्यासाठी संधी देतो. हे जीवन खूप मोठे आहे या जीवनात या जगाच्या हिशोबाने जगायला शिका. इथे त्रास, दुःख खूप आहेत त्यांना सहन करणे शिकून घ्या. कधीही कोणासमोरही आपले गार्हाणे गाऊन रडत बसू नका. जर डोळ्यातून अश्रू आलेच तर त्यांना लपवणे शिकून घ्या. या जगात सर्वजण स्वार्थी आहेत म्हणून रडत बसू नका.
जो पर्यंत तुम्ही कामाचे आहात तो पर्यंत इतर व्यक्ती तुमची ओळख ठेवतील. कारण लक्षात ठेवा नेहमी काडीपेटीची काडी पेटवून झाल्यानंतर ती फेकून दिली जाते. म्हणूनच अपेक्षा ठेवायची असेल तर एकतर स्वतःशी ठेवा किंवा भगवंतांशी ठेवा. कारण आपण स्वतः किंवा भगवंत यांच्याशिवाय इतर कोणीही कोणाचे नाही. कारण या जीवनात अपेक्षाच व्यक्तीला सर्वात जास्त खचविण्याचे काम करतात.
जर आपण स्वतःवर विश्वास ठेऊन स्वताकडूनच अपेक्षा ठेवायला सुरुवात केली तर आपल्याला आपल्या स्वतःमध्येच एक खूप चांगली व्यक्ती भेटेल. एकदा तरी स्वतःवर हा प्रयोग करूनच पहा. हे जीवन आता आपण नवीन प्रारंभ करूया, ज्या अपेक्षा आपण इतरांकडून करतो तीच अपेक्षा आपण आता स्वतःकडून करू. या स्वार्थी जगाचा भागच संपवून टाकू. ज्या प्रमाणे हे जग आहे तसेच आपण होऊन राहू.
आपल्या जीवनात जरी दुःख-त्रास असतील तरीही हसत रहा, कारण या जीवनात दुःख-त्रास नाहीत अशी कोणतीही व्यक्ती नाही. दुःख सर्वानाच असतात परंतु कोणी दाखवतं तर कोणी दाखवीत नाहीत. मग आपणही कशासाठी रडत बसायचे. चांगले किंवा वाईट हा आपला ब्रहम आहे, या जीवनाचे नाव तर कभी ख़ुशी कभी गम आहे.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला जरूर विसरू नका.