उंदीर घरातील सामान का कुरतडतात.? कारण जाणून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.!

उंदीर घरातील सामान का कुरतडतात.? कारण जाणून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो निसर्गाने आपल्या सानिध्यात वास करणार्या प्रत्येक सजीवाल काही ना काही वरदान दिले आहे. माश्यांना पाण्यात पोहायला शिकवले, पक्ष्यांना हवेत उंच भरारी घ्यायला शिकवले, मानवाला विचार करण्याची शक्ती दिले आणि उंदराला कुरतडण्याची देणगी दिली. होय हे हास्यसपद असू शकते मात्र उंदीर काही ना काही कुरतडतात या मागे देखील काही ना काही तरी कारण हे आहे.

या निसर्गात घडणार्या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही तरी नैसर्गिक कारण आहे. उंदीर कुरतडतात या मागे जे कारण आहे ते आम्हाला तुमच्या पर्यंत या लेखा द्वारे पोहचवायचे आहे हे कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच होईल म्हणून हा लेख तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

मित्रांनो तुम्ही तुमच्या घरात उंदरांना नक्कीच पाहिले असेल. उंदीर हा घाणीत राहणारा प्राणी आहे व याच उंदरांमुळे जगभारत दर वर्षी दोन लाख माणसे मृ’त्यू मुखी पडतात. तुम्हाला माहितच असेल उंदीर जर आपल्या घरी असतील तर आपल्याला त्रास तर होतोच मात्र यांच्या सहवासाने विविध प्रकारचे रोग देखील पसरतात. सोबतच गृहिणी पासून ते लहान-मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या उंदरांचा त्रास होतो. आपल्या घरातील गृहिणींना यांचा स्वयंपाक घरात आवरा-आवर करताना खूप त्रास होतो.

मित्रांनो तुम्हाला उंदरांची कुरतडण्याच्या सवयी बद्दल माहितच असेल. उंदीर घरात असलेल्या प्रत्येक सामानाला कुरतडून टाकतात. घरातील पुस्तके असुदेत कपडे असुदेत अथवा खाण्याचे समान उंदरांच्या हाती लागले की ते त्याला कुरतडून टाकतातच. एक गोष्ट तर साफ आहे आपल्या घरातील सामान कुरतडून उंदरांचे पोट तर भरत नाही कारण या असल्या समानाला ते कदाफि खाऊ शकत नाहीत व पचवू देखील शकत नाहीत. तरी ही ते आपल्या घरचे सामान कुरतडूनच सोडतात. मित्रांनो उंदरांच्या या लाचारीचे कारण आहे त्यांचे दात.

उंदरांचे पुढचे दोन दात खूप जलद गतीने वाढतात. उंदरांचे दात दर वर्षी दोन ते तीन इंच वाढतात वयाच्या पाचव्या वर्षी त्याचे दात चार सेंटी मीटर ते आठ सेंटी मीटर वाढू शकतात आणि या दातांचा त्रास उंदरांना देखील होतो. उंदीर या दातांना सारखे घासत असतात हे दात घासण्यासाठी ते जी वस्तू मिळेल तिला कुरतडतात अगदी लकडा पासून ते प्लास्टिक पर्यंत जे मिळेल ते आपल्या दातांना होणार्या त्रासाला कमी करण्यासाठी ते अश्या प्रकारे वस्तू कुरतडतात.

त्याच बरोबर जर उंदरांनी सामान कुरतडण्यास बंद केले तर त्यांचे दात पाच ते दहा सेंटी मीटर वाढतील आणि त्यांचा जबडा फाटून जाईल. शिवाय ते या मोठ्या दातांमुळे अन्न सुद्धा ग्रहण करु शकणार नाहीत. असे हे हास्यस्पद कारण उंदरांच्या वस्तू कुरतडण्या मागे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *