जर आपण चुकून डेटॉल पियालात तर काय होईल.? परिणाम जाणून अंगावर काटा येईल.!

जर आपण चुकून डेटॉल पियालात तर काय होईल.? परिणाम जाणून अंगावर काटा येईल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपलं स्वागत आहे. मित्रांनो माणसाला जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टींची गरज भासते आणि तो आपल्या गरजेनुसार अनेक गोष्टी घरी घेऊन येतो त्यातील काही केमिकल पासून बनलेल्या असतात उदाहरण द्यायचे झाले तर रुम फ्रेशनर, हँड सैनिटायजर, परफ्यूम, बाथरुम साफ करण्यासाठी लागणारे लिक्वीद व कॉलिन इत्यादी मात्र एक केमिकल असे देखील आहे ज्याला आपण आपल्या घरी ठेवतो व त्याचा भरपूर वापर आपण करतो आणि ती आहे डेटॉल.

आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला विस्तारात या डेटॉल बद्दल माहिती देणार आहोत या डेटॉलमध्ये कोण-कोणते घातक केमिकल मिसळलेले असतात व हे डेटॉल जर आपण ग्रहण केले तर याचा आपल्या शरीरावर कोणता परिणाम होवू शकतो.

मित्रांनो डेटॉल एक मोठी कंपनी आहे. डेटॉल एक जंतू शामक लिक्वीड आहे. आज जग भरात डेटॉल कंपनीचे नाव उच्च स्थानी आहे. डेटॉल हे ब्रांड प्रोडक्ट्स पैकी एक आहे. मित्रांनो डेटॉल इंग्लंडच्या रेकिड बेकिंगसनचा एक ब्रांड प्रोडक्ट आहे. डेटॉलला इसवी सन 1876 मध्ये बनवले गेले होते मात्र भारतात याचे आगमन हे इसवी सन 1933 साली इंग्रजांच्या काळी झाले.

डेटॉल एक असे जंतू शामक लिक्वीड आहे ज्याला आपण मागिल 80 वर्षे वापरत आलो आहे आमच्या बोलण्याचा एकच अर्थ आहे की डेटॉल एक अतिशय जुने व प्रसिद्ध ब्रांड प्रोडक्ट आहे. डेटॉल मध्ये अनेक इन अॅक्टिव म्हणजेच असक्रिय केमिकल असतात. डेटॉल मध्ये कॅरामल, वाइट पाइन ऑइल व पाणी यांसारखे असक्रिय केमिकल असतात.

यांच्या असण्या मात्रेने डेटॉलवर जास्त काही फरक पडत नाही मात्र हे डेटॉलला खराब होण्यापासून वाचवतात व रंग प्रदान करतात. आणि हे असक्रिय केमिकल आपल्या शरीरासाठी सुद्धा हानिकारक नसतात. मित्रांनो डेटॉलमध्ये काही सक्रिय केमिकल सुद्धा असतात. हे डेटॉलला जंतू शामक बनवतात. डेटॉल मध्ये क्लोरीझायनोझोल हा एक अॅक्टिव केमिकल उपलब्ध असतो. डेटॉलमध्ये या केमिकलची मात्रा फक्त 4.8 % च असते. डेटॉलला अनेक ठिकाणी वापरले जाते. जंतू मारण्यासाठी तसेच घाव साफ करण्यासाठी वापरले जाते.

डेटॉल मध्ये असणारा क्लोरीझायनोझोल हा सक्रिय म्हणजेच अॅक्टिव केमिकल आपल्यासाठी खूप जास्त हानिकारक आहे. हा जर तुमच्या पोटात गेला तर तुम्हाला या केमिकलचा खूप त्रास होवू शकतो. तुम्ही याचे सेवन करताच तुम्हाला उलट्या होण्यास सुरवात होईल तुमचे पचन तंत्र पूर्ण रित्या बिघडून जाते.

त्याच बरोबर क्लोरीझायनोझोल हा केमिकल तुमच्या सरळ मेंदूवर प्रभाव पडतो याच्या प्रभाव मात्राने तुमचा मेंदू खूप स्वस्त होईल आणि तुम्ही को’मामध्ये सुद्धा जाऊ शकता. त्या सोबतच तुमच्या श्वसन क्रियेच्या चक्रावर देखील वाईट प्रभाव पाडतो. आपल्याला श्वान घेण्यास त्रास जाणवू लागतो म्हणूनच डेटॉल हा अति धोकादायक पदार्थ आहे हा लहान मुलांपासून नेहमी दूर ठेवावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *