लग्नात मुलीकडून हुंडा घेताय..? सावधान..; भोगावे लागतील गंभीर परिणाम

लग्नात मुलीकडून हुंडा घेताय..? सावधान..; भोगावे लागतील गंभीर परिणाम

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजकाल हुंडा चे प्रमाण कमी झाले आहे परंतु हे खरे आहे का ? प्रत्यक्षपणे मुलीच्या अंगावर दागिने द्या, मुलाला अंगठी द्या, लॉकेट द्या, चांगले कपडे द्या ,सासरच्या मंडळींचा मानपान करा, वरबाईची साडी हे सगळे काय आहे ? हा सुद्धा एक प्रकारचा हुंडा आहे ना… हुंडा मागणे म्हणजे एक भीक मागण्यासारखे आहे.

भिकारी तरी एका ठिकाणी बसून मागत असतात किंवा आपण दिलं ते ते घेऊन आपणास आशीर्वाद देत असतात परंतु हे सुटाबुटातील भिकारी आपल्याला नकोनकोसे करून टाकतात. हे लोक आपल्याला यादी करून देतात की, त्यांना आपल्या हुंड्या मध्ये काय काय हवे आहे.

मुलीचे आई-वडील आपल्या काळजाचा तुकडा त्यांना देत आहेत ते काय कमी आहे. एखादा व्यवहार करीत आहात आहात का ? हे द्या ते द्या..मुलांचे आई-वडील आधीच विचार करतात लग्नात काय काय बघायची. सायकल असेल तर मोटरसायकल घेऊ मोटरसायकल असेल तर काय घेऊन परंतु लक्षात ठेवा जी मुलगी घरामध्ये हूंडा घेऊन येते ना ती कधीच तुमची सून म्हणून येत नाही तू तुमच्या घराची मालकीण म्हणून येते व संपूर्ण घराचा ताबा घेते.

म्हणजे कार मे आयी हुई बहु बहु नही तो महाराणी बनकर आयी रहती है. जी तुम्हालाच कामाला लावेल ती कोणाचेच काही ऐकणार नाही. फक्त स्वतःची मते तुमच्यावर लादेन आणि आपल्या मनाप्रमाणे सर्व कार्य करेल म्हणून जर सून तुम्हाला आणायची असेल तर बिना हुंड्याची आणा कारण जर हूंडा घेऊन आपण सुन घरांमध्ये आणली तर आपला मुलगा विकला सारखं होते.

ती आपल्या मुलाला ताब्यात घेते आणि त्याच्यावर हक्क गाजवू लागते आणि सून मोठ्या घरची असल्यामुळे तिथे रुबाब व थाट सुद्धा मोठे असते.नाकापेक्षा मोती जड कशाला म्हणून कधीही मुलगी जर करायची असेल तर गरिबाघरची सून म्हणून करा. मुलगी गरीब घरातील असेल तरी तिच्या जवळ संस्कार खूप चांगले असतात म्हणून ही संस्काराची शिदोरी वरती तुमचे जीवन नेहमीच गोड करेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *