तुमच्या घरामध्ये फ्रिज असेल तर या ८ गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहिजे नाहीतर…

तुमच्या घरामध्ये फ्रिज असेल तर या ८ गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहिजे नाहीतर…

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो ९९ टक्के लोकांना फ्रिज बद्दल हि गोष्ट माहित नसते. मित्रांनो तुम्हाला जेव्हा हि माहिती समजेल तेव्हा तुमच्या फ्रिजचं आयुष्य वाढणार आहे. तुमचा फ्रिज तुम्हाला दीर्घकाळ सेवा देईल. तो चांगल्या प्रकारे टिकेल, तर हि नेमकी कोणती गोष्ट आहे कि ज्या लोकांना अजूनही माहित नाहीत हे आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील फ्रिज हा सपाट जागेवर ठेवला आहे का हे जरा चेक करा. बऱ्याचश्या घरामध्ये फ्रिज हा सपाट जागी ठेवत नाही. ज्या वेळी आपण फ्रिज ला सपाट जागी ठेवतो तेव्हा त्याचा कॉम्प्रेसर अगदी सुरळीत काम करतो. आणि ज्या फ्रिज चा कॉम्प्रेसर चांगला ते फ्रिज कधीही तुम्हाला चांगलीच सर्व्हिस देणार.

दुसरी गोष्ट म्हणजे फ्रिज मध्ये बटाटा कधीही ठेऊ नये. यामुळे आरोग्यदृष्ट्या खूप सारे तोटे होतात. जर तुम्ही बटाटा फ्रिज मध्ये ठेऊन नंतर तो भाजीसाठी वापरत असाल तर तुम्हाला आरोग्यविषयी समस्या पाहायला मिळतील.

तिसरी गोष्ट म्हणजे आपला फ्रिज हा हवेशीर जागे ठेवा. हवेशीर याचा अर्थ काय.? तर बरेचजण फ्रिज भिंतीला चिकटवून ठेवतात, तर अशा प्रकारे फ्रिज ठेऊ नका. कारण कॉम्प्रेसरमधून सतत गरम हवा बाहेर पडत असते. आणि हि हवा भिंतीला आदळून परत जर आली तर त्यामुळे कॉम्प्रेसरच टेम्परेचर वाढतो आणि त्यामुळे फ्रीजचा गॅस लवकर संपतो. म्हणून फ्रिज आणि भिंत यामध्ये किमान १ फुटांचं अंतर ठेवावं.

चौथी गोष्ट म्हणजे फ्रिज ला कधीही गरम ठिकाणी ठेऊ नका. जर एखादी रूम खूप गरम होत असेल तर अशा ठिकाणी फ्रिज ठेऊ नका. यामुळे तुमचा फ्रिज लवकर खराब होऊ शकतो.

पाचवी गोष्ट म्हणजे फ्रिजमध्ये कोणतीही गरमागरम पदार्थ ठेऊ नका. बरेचजण दूध गरम असतानाच लगेचच फ्रिज मध्ये ठेवतात. यामुळे २ तोटे होतात एकत्र तुमच्या फ्रिजचं आयुष्य कमी होत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो पदार्थ त्यामध्ये ठेवलेला आहे त्या पदार्थातील पोषक घटक कमी होतात.

सहावी गोष्ट म्हणजे फ्रिजमधून काढलेले पदार्थ लगेच गरम करू नका. बऱ्याच जणांना सवय असते कि फ्रिज मधून काढलं कि लगेच गरम करायचं आणि मग खायचं. यामुळे त्या पदार्थातील पोषक तत्वे नष्ट होतात, म्हणून फ्रिजमधून काढलेला पदार्थ किमान ५ मिनिटे तरी गरम करू नका.

सातवी गोष्ट म्हणजे फ्रीजचा दरवाजा वारंवार उघडू नका किंवा जास्तवेळ उघडा ठेऊ नका. कारण ज्यावेळी तुम्ही असं करता तेव्हा फ्रिजचं तापमान झपाट्याने वाढत. यामुळे फ्रिजमधील तापमान पुन्हा कमी करण्यासाठी फ्रिजला तेवढीच वीज लागते आणि त्यामुळे विजेचं बिल वाढत.

शेवटची आठवी गोष्ट म्हणजे प्रत्येक फ्रिजला डीफ्रॉस्ट नावाचं एक बटण येत, याचा वापर ९९ टक्के लोक करतच नाहीत. मित्रांनो डीफ्रॉस्ट हे बटण आहे हे बटण आठवड्यातून किमान एकवेळ तरी दाबायला हवे. यामुळे फ्रिजमधील साचलेला बर्फ वितळतो आणि फ्रिज पुन्हा पहिल्यासारखा होतो. मित्रांनो हि गोष्ट फार महत्वाची आहे. हि जर तुम्ही पाळलीत तर तुम्हाला दिसेल कि तुमचं फ्रिज कधीच मेंटेनन्स साठी त्रास देणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *