इलेक्ट्रिक कारचा खर्च कमी असतो कि पेट्रोल-डिझेल कार.? पहा कुठली कार ठरते स्वस्त..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपले स्वागत आहे. कार घेण्याचा विचार करताय..? थांबा.. याआधी हि माहिती पूर्ण वाचा कारण कार घायची म्हणजे आता तोंडचा खेळ राहिलेला नाही. Maintainance, Insurance, Servicing हे तर ठरलेलंच आहे. सोबतच पेट्रोल डिझेल चे भाव तर दिवसेंदिवस वाढतंच आहेत. अशात इलेकट्रीक कार कडे बऱ्याचदा लोक एक पर्याय म्हणून पाहत आहेत. पण तरीही इलेक्ट्रिक कार ला पेट्रोल, डिझेल पेक्षा कमी खर्च लागेल याची काय ग्यारंटी..?
त्यासाठी तुलना करून पाहायला हवी तरच कळेल इलेकट्रीक कार बेस्ट कि पेट्रोल डिझेल कार. मग आता जास्त वेळ न घालवता सरळ आपण तांत्रिक दृष्ट्या इलेक्ट्रिक आणि पेट्रोल,डिझेल कार ची तुलना करून पाहुयात.
इलेक्ट्रिक कार ला समोरच्या बाजूला गाडीचा चार्जिंग पॉईंट, खालच्या बाजूला लिथियम बॅटरी पॅक, मागच्या बाजूला इलेक्ट्रिक मोटर असते. याउलट सर्वसामान्य कार मध्ये सामान्य पेट्रोल,डिझेल कार मध्ये समोरच्या बाजूला इंधनावर चालणारे इंजिन तर मागच्या बाजूला इंधन टॅंक असते.
इलेक्ट्रिक कार मध्ये फक्त एक इलेक्ट्रिक मोटर आहे तर पेट्रोल डिझेल कार मध्ये समोरच्या बाजूला अनेक मशिन्स आहेत. इलेक्ट्रिक कार मध्ये कमी फिरणारे मशीन असल्याने खर्च कमी लागतो. तर याउलट पेट्रोल डिझेल कार मध्ये जास्त फिरणाऱ्या मशिन्स असल्याने त्यांना खर्च जास्त येतो.
एकंदरीत इलेक्ट्रिक कार ला Maintainance खूप कमी आहे तर पेट्रोल-डिझेल कार ला Maintainance भरभरून आहे. इलेक्ट्रिक कार सामान्य पेट्रोल-डिझेल कार च्या तुलनेत खूप हलकी असते. गाडीचा भार कमी असल्याने गाडी इंधन कमी घेते. याउलट पेट्रोल-डिझेल कार जास्त वजनामुळे अतिरिक्त इंधन घेतात. महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक कार कुठलाही घातक वायू उत्सर्जित करत नाही. मात्र पेट्रोल-डिझेल कार कार्बोन उत्सर्जित करते. त्यामुळे प्रदूषण वाढते आणि मानवी जीवन धोक्यात येतं.
इलेक्ट्रिक कार एकदा चार्जे केली तर तुम्ही ३००-४०० किलोमीटर्स नॉनस्टॉप जाऊ शकता. परंतु पेट्रोल-डिझेल कार मध्ये एकवेळेला १०-२० लिटर इंधन बसतं. त्यात तुम्ही गाडीच्या मायलेज नुसार पल्ला गाठू शकता.
इलेक्ट्रिक कारचा देखील एक मायनस पॉईंट आहे. इलेक्ट्रिक कार चार्जे होण्यासाठी काही तास लागतात. परंतु पेट्रोल-डिझेल कार च्या टँक्स काही सेकंदातच फुल्ल होतात. पेट्रोल-डिझेल कार ला सर्वात जास्त खर्च येतो तो म्हणजे Maintainance आणि पेट्रोल-डिझेल चा. मात्र इलेक्ट्रिक कार ला हि अडचण नाही, यांच्या बॅटरीस चांगल्या दर्जाच्या असतात. परिणामी त्या लवकर बदलण्याची गरज लागत नाही.
याउलट खर्च येतो तो चार्जे करण्यासाठी लागलेल्या इलेकट्रीसिटीचा जो पेट्रोल डिझेल पेक्षा नक्कीच कमी असतो. आता सांगा कुठली कार घेताय..? इलेक्ट्रिक कि पेट्रोल-डिझेल कार..? तर मित्रांनो हि माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.