मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी नेमकं काय करावं.? | How to Port Mobile Number?
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या TRAI ने Mobile Number Portability साठीचे नियम सोपे केले आहेत. म्हणजेच आता फक्त ३ दिवसातच एका सर्व्हिस प्रोव्हायडर कडून तुमचा नंबर दुसऱ्या कंपनीकडे आरामात नेता येईल. नेमकं काय करावे लागेल हे जाणून घ्यायचे असेल तर हि माहिती पूर्ण वाचा.
PORT
Mobile Number
आणि हा मेसेज १९०० या नंबर वर पाठवा.
त्यानंतर थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल वर एक Uniq Porting Code येईल. पुढचे ४ दिवस हा कोड वैध्य असेल. म्हणजे या ४ दिवसात तुम्हाला सगळं कामकाज पूर्ण करायचंय. फक्त जम्मू काश्मीर,आसाम आणि ईशान्यकडच्या राज्यांमध्ये हा Uniq Porting Code पुढचा महिनाभर वैध्य असणार आहे. तर आता तुम्हाला काय करायचंय कि ज्या कंपनीची सेवा तुम्हाला घायची आहे त्यांच्या गॅलरीत जा आणि त्यांच्याकडे काही फॉर्म्स भरावे लागतील शिवाय तुम्हाला तुमचं KYC पूर्ण करावं लागेल. आणि यामध्ये हा कोड तुम्हाला नमूद करावा लागेल. हे पूर्ण केल्यावर साधारण ३ ते ५ दिवसात तुमचा मोबाईल नंबर एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे PORT होईल. जर तुम्ही ज्या शहरात आहात त्यामध्येच एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे जात असाल तर ३ दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल. आणि समजा तुम्ही शहर बदलत असाल म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असाल तर ५ दिवसांमध्ये हे काम पूर्ण व्हायला हवं.
अर्थातच हा नंबर Port करण्यासाठी तुम्हाला मोबाईल कंपनीला तुमचा ID Proof आणि तुमचं Residencial Proof द्यावं लागेल. हि सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचं नवीन सिमकार्ड मिळेल आणि ते काही काळातच ऍक्टिव्हेट होईल. हे सगळं झालं वयक्तिक नंबर साठी. पण कॉर्पोरेट नंबर साठीच्या कोणत्याही नियमांमध्ये TRAI ने बदल केलेला नाहीय.
तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि Mobile Number Portability बद्दल हि संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तसेच आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला नक्कीच विसरू नका.