हवाई सुंदरी कडून रतन टाटांच्या अंगावर ज्यूसचा ग्लास सांडल्यावर पहा रतन टाटांनी काय केलं.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याच देशातल्या सुप्रसिद्ध उद्योगपतीची हि कहाणी आहे. एके दिवशी हा उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यास निघाला असताना त्याच्यासमोर घरमालक येऊन उभा राहिला. आज कसं येन झालं..? उद्योगपतीने त्या माणसाला विचारलं. कामाच्या नादात तो विसरून गेला होता कि घरमालक त्याच्या समोर उभा आहे.

घरमालक विनम्रपणे म्हणाला कि मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही स्वतः पाठवून देता पण यावेळी कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतंय. उद्योगपती वरमला, आणि म्हणाला हे घ्या तुमचं घरभाडे.  उशीर झाल्याबद्दल मला क्षमा करा. एवढे बोलून त्यांनी खिशात हात घातले आणि पैसे घरमालकाला दिले. घरमालक उद्योगपतींना म्हणाला कि तुम्ही एवढे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता याचे मला फार आच्छर्य वाटते.

यावर उद्योगपती हसला व म्हणाला मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्व आहे. माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाडयाच्या घरात राहतो. घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला. हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्राइवर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेशी प्रवासासाठी तिकीट काढायला एका ऐरलाईन च्या ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती, तिथे बरीच गर्दी होती, उद्योगपती एका सामान्य माणसासारखे लाईन मध्ये उभे राहिले. तेवढ्यात ऐरलाईन च्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले “सर तुम्ही रांगेत का उभे आहेत..? आम्ही तुमचं तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा.” एवढे मोठे उद्योगपती रांगेंत उभे राहून आम्हाला लाजवू नका.

उद्योगपती म्हणाले आता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही. तुम्ही एवढी धावपळ करण्याची खरंच आवश्यकता नाही. उद्योगपती हे माझ्या नावापुढे लावलेलं विशेषण आहे. मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे हे महत्वाचं आहे. ऐरलाईन चा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला. तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे जायला निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसं धावपळत आपापल्या कार्यालयात जाताना दिसली. त्यांना लाज वाटली कि आपण एवढ्या आलिशान गाडीमध्ये फिरत आहोत, सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली.

लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान मिळायचे. ज्या दिवशी उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले त्या दिवशी आणखी एक प्रसंग घडला. एका हवाई सुंदरीच्या हातून चुकून त्यांच्यावर पेय पडले, त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती कि या चुकीबद्दल तिला शिक्षा मिळणार.

उद्योगपतीने तिच्याकडे पाहिले व विचारले कि तू माझ्या अंगावर काय सांडलं..? हवाई सुंदरी भीतभीत म्हणाली कि “माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा..!” उद्योगपती हसले आणि म्हणाले पुढच्यावेळी माझ्या अंगावर सोडा किंवा व्हिस्की सांड, त्यांचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी हसायला लागली. आणि तिच्या मनावरचा सर्व ताण एका झटक्यात निसटला. असे अनेक प्रसंग उद्योगपतीच्या ड्रॉयव्हरने पाहिले व ऐकले. त्याची उत्सुकता चळवळी गेली होती.

तो उद्योगपतींना म्हणाला “साहेब तुम्हाला इतके साधे राहणे, वागणे कसे काय जमते..? ” आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता. यावर उद्योगपती म्हणाले “अरे मी पण लहान असताना फार उद्दाम होतो.  मला सांभाळायला एक नर्स होती.  एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली म्हणून मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते कि त्यांनी मला बदढुन काढले होते. आणि मला म्हणाले होते कि तू कोण आहेस हे बिलकुल महत्वाचे नाही पण तू कसा आहेस हे फार महत्वाचे आहे.

theprint

आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा. तेव्हापासून मी माझ्या वडिलांचे वाक्य स्मरत आलो आहे. मला खरोखरचं पटले आहे कि आपण कोण आहोत हे महत्वाचे नसतेच आपण कसे आहोत यावर आपली किंमत ठरत असते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले हे सगळे साधे होते. या उत्तुंग उद्योगपतींचे नाव “रतन टाटा” होते.  खरंच जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला वागायला अत्यंत साधी आणि कुठलीही गुंतागुंत नसलेली असतात. खरेतर साधे राहणे हेच कठीण असते. या व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे.

मित्रांनो आम्हाला आशा आहे कि हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास तुमच्या मित्रपरीवाला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *