चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यावर नेमके काय करावे.? हि भन्नाट उपाय एकदा नक्कीच जाणून घ्या..!

चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यावर नेमके काय करावे.? हि भन्नाट उपाय एकदा नक्कीच जाणून घ्या..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण कधी न कधी एखाद्याला पैसे ट्रान्सफर करत असतो. जेव्हा आपण पैसे ट्रान्सफर करत असतो तेव्हा नेहमीच काळजी घेतली पाहिजे. कारण एखाद्याला पैसे ट्रान्सफर करताना एकही नंबर चुकला तर ते पैसे दुसऱ्याच्या अकॉउंट वरही जाऊ शकतात.

मित्रांनो आजकाल जास्तीत जास्त लोक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग चा वापर करतात. आणि मोबाईल व इंटरनेट बँकिंग ने पैसे ट्रान्स्फर करताना या चुका जास्त होतात. पण मित्रांनो आपल्याला हे माहितेय का जर तुमच्याकडून कधी चुकून दुसऱ्या कोणाच्या अकाउंट वर पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करायला पाहिजे?

जर तुमच्याकडून चुकून कधी दुसऱ्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर झाले तर सर्वात प्रथम याबद्दल आपल्या बँकेला कळवावे. हे काम तुम्ही बँकेच्या ब्रांच मध्ये जाऊन, इमेलद्वारे किंवा फोनद्वारे करू शकता, तसेच याबद्दल तुम्ही तुमच्या बँकेच्या ब्रांच मॅनेजर शी सुद्धा बोलू शकता. शक्यतो ब्रांच मॅनेजर शी बोलून तुमचं काम लवकरही होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडून ज्या बँकेत पैसे ट्रान्सफर झाले आहेत तीच बँक तुमची यामध्ये मदत करू शकते.

यानंतर तुमच्याकडून झालेल्या चुकीच्या Transaction बद्दल संपूर्ण माहिती बँकेला द्या. जसे Transaction ची तारीख, टाइम, आपला अकॉउंट नंबर,आणि ज्या खात्यात पैसे चुकून ट्रान्स्फर झालेत तो अकॉउंट नंबर. याव्यतिरिक्त तुम्हाला हे सुद्धा सिद्ध करावे लागेल कि पैसे चुकून तुमच्याकडून चुकीच्या अकाउंट वर ट्रान्स्फर झाले आहेत. यासाठी आपण आपल्या केलेल्या Transaction चा स्क्रीनशॉट देखील दाखवू शकता.

जर का तुम्ही ज्या चुकीच्या अकाउंट वर पैसे पाठवलेत ते अकाउंटच अस्थित्वात नसेल तर तुमचे पैसे तुमच्याच अकाउंट मध्ये परत येतील. परंतु ते अकाउंट चालू असल्यास तुम्हाला कम्प्लेंट द्यावी लागणार आणि पूर्ण प्रोसेस होण्याची वाट बघावी लागणार. मित्रांनो जर का पैसे पाठवणाऱ्याचा आणि पैसे रिसिव्ह करणाऱ्यांचं अकाउंट एकाच बँकेत असेल तर हि प्रोसेस लवकर पूर्ण होते.

पण जर का पैसे रिसिव्ह करणाऱ्याचे अकाउंट दुसऱ्या बँकेत असेल तर या प्रोसेस ला थोडा टाइमही लागू शकतो. इथे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि एखादी बँक आपल्या खातेदाराच्या च्या परवानगी शिवाय कोणालाही पैसे ट्रान्स्फर नाही करू शकत. तसेच बँक आपल्या खातेदारकाची माहिती सुद्धा कोणालाही नाही देऊ शकत. म्हणूनच आपल्याला सर्व परिस्थिती बद्दल त्या बँकेला सांगावे लागेल. यानंतरच बँक आपल्या खातेदारासोबत बोलेल आणि पैसे परत तुमच्या अकाउंट मध्ये पाठवायला सांगेल.

मित्रांनो चुकून पैसे ट्रान्सफर होण्याच्या प्रकरणात शक्यतो  रिसिव्हर पैसे परत करण्यास तयार होतात. परंतु तर तो पैसे परत देण्यास नकार देत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर केस सुद्धा फाईल करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला आता समजले असेलच कि चुकून दुसऱ्याच्या अकाउंट वर पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *