शास्त्रानुसार पूजेमध्ये घंटी कधी घंटी कधी वाजवावी.? बऱ्याच लोकांना माहिती नसतात या गोष्टी.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण पूजेमध्ये वापरण्यात येणाऱ्या घंटी विषयी अनेकांना काही गोष्टी माहिती नसतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत. पूजेमध्ये घंटी कधी वाजवावी? का वाजवावी ?याच्या बद्दल सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घरी देवघर स्थळ असते आणि त्या ठिकाणी तसेच देवी देवतांची पूजा करण्यासाठी काही सामग्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये शंख घंटी पाणी इत्यादी.त्याशिवाय पूजा अर्धवट मानली जाते.
पूजेमुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होते त्याच बरोबर ज्या घरांमध्ये देवी देवतांची पूजा करताना घंटेचा नाद केला जात नाही अशा ठिकाणी देवी देवतांचा वास राहत नाही तसेच नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर त्या घरामध्ये प्रवेश करत असते. आपल्याला फक्त एवढेच माहीत आहे की देव पूजा करताना आपण घंटी वाजवत असतो.
परंतु असे नाही अनेकदा देवपूजा करत असताना आपण ज्या काही वेगवेगळ्या विधी करत असतो,त्या विधी करताना आपल्याला घंटानाद करावा लागतो म्हणजेच देवी-देवतांना आवाहन करण्यासाठी घंटी नाद करावा लागतो. घंटी च्या पवित्र नादामुळे देवी-देवता आवाहन पावतात आणि पूजेला उपस्थित राहतात तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा या घंटेचा नादामुळे निघून जाते व वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण होते.
हिंदू धर्म शास्त्रामध्ये असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की घंटी ची पूजा करूनच घंटीचा नाद केला पाहिजे म्हणजेच पूजन केल्याशिवाय घंटी वाजवू नये. कालिका पुराणांमध्ये घंटी विषयी असे सांगितले गेले आहे की स्नान, धुपे तथा दिपे नैवेद्य भूषणे तथा घंटानाद पूर्वी तम तथा निरंजन पिते यानुसार देवी-देवतांच्या स्नान विधि मध्ये घंटी वाजवावी तसेच देवी-देवतांना धूप-दीप दाखविताना सुद्धा घंटी वाजवायची आहे.
त्याचबरोबर पूजन झाल्यानंतर आपण देवी-देवतांना नैवेद्य दाखवत असतो, त्यावेळी नैवेद्य दाखवताना सुद्धा घंटी वाजवायची आहे त्यानंतर देवी-देवतांना वस्त्र परिधान करताना सुद्धा आपल्याला घंटी वाजवायची आहे.हे सगळं झाल्यानंतर देवी देवतांची आरती जेव्हा आपण करू त्यावेळी सुद्धा आपल्याला घंटी च्या नादाने वातावरण निर्मिती करून आनंदाने देवदेवतांची आरती करायची करायची आहे.
तसेच देवी-देवतांना जागे करण्यासाठी शंखनाद केला जातो परंतु अनेकदा आपल्याला शंखा बद्दलची काही विशिष्ट नियम माहिती नसतात. अशा वेळी जर तुमच्या घरी शंख नसेल तर तुम्ही घंटानाद त्याच्या साह्याने देवी-देवतांना आवाहनाला द्वारे जागृत करू शकता म्हणूनच यापुढे देवी देवतांची पूजा करत असताना घंटी नाद करून तुम्ही घरामध्ये सकारात्मकता निर्माण करून देवदेवतांना प्रसन्न करू शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.