घरातील फक्त हि एक वस्तू वापरा; चष्मा ,हेल्मेट किंवा गाडीची काच यावर फॉग अजिबातच जमा होणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. को रोना व्हा यर स किंवा co vid- 19 पासून आपल्याला वाचायचे असेल तर तसेच मास्क वापरणे हे महत्त्वाचे आहे. मास्क वापरत असताना जर तुम्हाला चष्मा असेल किंवा सेफ्टी गॉगलचा वापर करत असाल तर त्यावर फॉग जमा होण्याची शक्यता तुम्हाला जाणवली असेल तसेच गाडी चालवत असताना हेल्मेट वर सुद्धा फॉग जमा होतो आणि तसेच आपल्याला समोरचे काही दिसत नाही.
पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आद्रता खूप जास्त असते आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ही समस्या जास्त असते. हेल्मेट वापरत असताना देखील समोरचे आपल्याला काही दिसत नाही. हा जो फॉग जमा होतो तसेच मास्क वापरून चष्मा लावल्यावर अजिबात जमा होणार नाही जर तुम्ही हा साधा उपाय केला तर..
हा साधा उपाय केल्याने तुमच्या सेफ्टी गॉगल वर, हेल्मेट वर अजिबात फॉग येणार नाही आणि हा उपाय केल्याने तुमचा चष्मा असेल त्यावरही कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. हा उपाय तुमच्या गाडीच्या बॅक साईडला सुद्धा करू शकतात फोरविलर ची मागची जी काच असते त्याच्यावर सुद्धा करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला ती वस्तू लागणार आहे म्हणजे साबण. कोणताही साबण घ्या.
सुती कपड्याने साबणाला पुसून त्यानंतर सेफ्टी गॉगल ला ,हेल्मेट ला, काचेला त्याच्याने पुसून घ्या. ती पूर्णपणे व्यवस्थित पुसून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही तोंडाने फुंकर मारून बघा.त्या चष्मा वर,सेफ्टी गॉगल वर, हेल्मेट वर अजिबात फॉग तयार होणार नाही. हा अत्यंत साधा उपाय आहे.
सुरक्षित राहण्यासाठी बरेच जण तोंडाची वाफ चष्मेला लाव तात तर मास्क सुद्धा काढतात तर ही चूक अजिबात करू नका तसेच मास्क न काढता व हेल्मेटची काच न उघडता हा साधा उपाय तुम्ही करून बघा. अजिबात फॉग जमा होणार नाही. उपाय सुंदर आहे त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि इतरांना सांगा याचा नक्की फायदा होईल सर्वांना.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.