एका भारतीय नोकरावर झाले होते महाराणी व्हिक्टोरियाला प्रेम; ब्रिटिश शाही परिवारात झाला होता खूप मोठा भूकंप.!

एका भारतीय नोकरावर झाले होते महाराणी व्हिक्टोरियाला प्रेम; ब्रिटिश शाही परिवारात झाला होता खूप मोठा भूकंप.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जगाच्या सुरवातीच्या काळापासूनच ब्रिटिश साम्राज्य सर्व जगला नमवत आले आहे. दळण-वळण पासून मोठ-मोठ्या बंदूकांपर्यंत ब्रिटिशांचा हात कोणी नाही धरु शकत. जेवढी प्रगती आज इतर देश करतायत तेवढी प्रगती तर यांनी 200 वर्षांपूर्वीच केली आहे. सुरवातीच्या काळात राणी विक्टोरिया ब्रिटिश राज्याची प्रमुख होती आणि संपुर्ण साम्राज्य हे तिच्या एका इशर्यावर चालयच. राणी विक्टोरिया भारतात सुद्धा आली होती आणि इथे तिच मन खूप रमलं होत.आणि तिने आपला मुक्काम भारतात बरेच दिवस ठेवला होता.

या काळातच राणी विक्टोरिया भारतातील एका नोकरावर मोहित झाली होती तथा ती त्याच्या प्रेमात पडली. या नोकरचे नाव हाफिज अब्दुल करीम असे होते तसेच भारताच्या इतिहासात याच नाव जास्त नसल तरी ही ब्रिटिश इतिहासात अब्दुलच नाव सुवर्ण अक्षरात लिहलेले आहे. इंग्लैंडची महाराणी विक्टोरिया स्व:ता भारतातील एका गरीब नोकराच्या प्रेमात पडली होती आणि यांचे संबंध एवढे पुढे गेले होते की ब्रिटिश राजघराणे सुद्धा खूप मोठ्या संकटात आले होते.

अब्दुल यांचा जन्म झांसी येथील ललितपूर या गावी झाला होता. अब्दुल करीम यांचे वडिल एका सरकारी इस्पितळात काम करीत होते आणि त्यांची बदली झांसीतून थेट आग्रा येथे झाली होती आणि आपल्या अब्बूसोबतच अब्दुल आग्रा येथे नोकरीसाठी आले.येथे अब्दुल करीम यांनी जावदाच्या नवाबांसाठी वकीलाचे काम केले. पण या कामात मन न लागल्यास त्याने हे काम सोडून दिले आणि आपल्या वडिलांच्या ओळखीवर आग्रा जेल इथे क्लार्कच काम करु लागला.

येथील कैदींना लंडनला कामासाठी घेवून जाण्यात आले तथा या कैदींबरोबर अब्दुल करीम यांना पहिल्यांदा लंडनला जाण्याची संधी मिळाली होती. इथे गेल्यावर काही दिवसांनी अब्दुल यांच्या अधिकार्याने राणी विक्टोरियाकडे कामाला ठेवले. राणी विक्टोरियाला भारत खूपच भावला होता त्यामूळे तिला अब्दुल करीम यांच्याशी बोलण्यात त्यांच्यासोबत राहण्यास जास्त आवडत असे.

राणी विक्टोरियाने अब्दुल यांना इंग्रजी बद्दल ही ज्ञान देण्यास सुरुवात केली या मागचे कारण म्हणजे दोघेही एकमेकांना निट समजून घेवू शकतील. फेब्रुवारी 1888 मध्ये राणी ने लिहलेल्या डायरीत असे नमूद कलेले आहे की अब्दुल अतिशय चांगली इंग्लिश बोलणे शिकत आहे. राणी विक्टोरिया सोबत राहता-राहता अब्दुल करीम अनेक उच्च पदी काम करु लागले होते. 1890 मध्ये मुख्य भारताचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत झाले.

हाफिज अब्दुल करीम यांचे व्यक्तीमत्व अतिशय आकर्षक होते. त्यांची भाषा शांत व मन-मोहक होती ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांशीच आदराने व विनम्रपणे बोलायचे आणि म्हणूनच परदेशात जावून ही त्यांनी सगळ्यांनाच आपलसं केल होत. एकदा राणी विक्टोरिया आणि अब्दुल करीम राणीच्या रिमोट पैलेस मध्ये 2 दिवस एकांतात व्यतित केले होते.

राणी या पैलेस मध्ये फक्त तिचा नवरा आणि नंतर तिचा बॉयफ्रेंड ब्रोन ह्यांच्या सोबतच गेली होती या वरुन तुम्ही अंदाज लावू शकता की राणी आणि अब्दुल यांचे संबंध कोणत्या टोकापर्यंत पोहचले असतील. राणीच्या या संबंधामुळे ब्रिटिश शाही परिवार चिंतेत होता. राणीच्या ‘मृ’त्यू’ नंतर अब्दुल यांना भारतात परत पाठवण्यात आले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *