लग्नापूर्वी नवरा नवरी रक्तगट एकच आहे का म्हणून का तपासतात..?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  मित्रांनो लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असं फार पूर्वीपासून म्हटले जाते. लग्न जुळवताना कुंडली, शास्त्रद्न्य, संस्कृती,राहणीमान यांबरोबर सध्या आरोग्यविषयी घटकांचा देखील विचार केला जातो. आरोग्यविषयी मध्ये बऱ्याचदा समान रक्तगट असलेल्या स्त्री पुरुषांनी एकमेकांशी लग्न करावे कि नाही व त्यांचा परिणाम त्यांच्या मुलांवर होऊ शकतो का? हे प्रश्न सध्या चर्चेत असतो.

बऱ्याचदा भारतीय कुंडली शास्त्रांमध्ये नदी शास्त्री तपासली जाते. आजच्या काळामध्ये मुलगा व मुलगी लग्न होण्यापूर्वी आपले रक्तगट तपासून घेत असल्याचे दिसून येते. रक्तगट एक असल्यावर नक्की काय परिणाम होतात हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

रक्तगट एक असल्यावर नक्की काय परिणाम होऊ शकतो..?

एकच रक्तगट असेल तर वैवाहिक आयुष्यावर कोणताही प्रभाव पडत नसल्याचे निष्कर्ष समोर आलेले आहेत. एकाच रक्तगट असलेल्या स्त्री पुरुषांनी विवाह केला व मुलं होऊ देण्याच्या वेळी प्रजनन क्षमतेवर काही दाम्पत्यांना अडचणींचा सामना करण्याचे निदर्शनास आले आहे . मात्र काहींना अशा कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झालेली नाही असेही आरोग्य संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे एकच रक्तगट असलेल्या स्त्री पुरुषांना जेव्हा ते बायोलॉजिकल पेरेंट्स असतात तेव्हा खरोखरच प्रजनन क्षमतेवर होतो का नाही हा एक विवादित हे प्रश्न आहे. रक्तगट AB आणि AV अशा चार रक्तगटांमध्ये त्यांचे प्रकार मानवी रक्तगट विभागलेले असतात. या रक्तगटांमध्ये आर एच पॉसिटीव्ह आणि आर एच निगेटिव्ह या २ प्रकारांमध्ये प्रथिनं अस्थित्वात असतात.

TimesOfIndia

यामुळे या चार रक्तगटाचे आर एच फॅक्टरनुसार वर्गीकरण करून ८ प्रकारांमध्ये विभाजन होतं. आर एच प्रकारानुसार तुमच्या Immunie system वर प्रभाव टाकणारे अँटीबॉडीज तयार होत असतात. तुमच्या रक्तातील आर एच फॅक्टर हा पॉसिटीव्ह आहे कि निगेटिव्ह आहे यानुसार गर्भावस्थेतील काही गुंतागुंतीची समस्या क्वचित निर्माण होऊ शकतात.

जर मातेचा रक्तगट आर एच निगेटिव्ह असेल आणि गर्भाचा आर एच पॉसिटीव्ह असेल तर मातेच्या रक्तगटातून तयार होणारे अँटीबॉडीज गर्भांतील आर एच पॉसिटीव्ह लाल पेशींवर प्रतिबंधात्मक हल्ला करू शकतात. अशावेळी गर्भावस्थेतील जास्त काळजी घेणं अत्यावश्यक ठरू शकते.

मातेचा आर एच फॅक्टर निगेटिव्ह असेल तर डॉक्टरकडून सातव्या महिन्यामध्ये रक्ताच्या लाल रक्तपेशींवर हल्ला करणारे अँटीबॉडीज तयार होऊ नयेत यासाठी काही उपचार केले जातात. व प्रसूतीनंतर लगेचच बाळाचा आर एच पॉसिटीव्ह आहे कि नाही हे पुन्हा एकदा निश्चित केलं जात.

तर मित्रांनो अशाप्रकारे उपाययोजना करून त्या समस्या सुधारता येतात. तर हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि माहिती आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *