चुकून सुद्धा गुगल वर सर्च करू नका या ७ गोष्टी अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

चुकून सुद्धा गुगल वर सर्च करू नका या ७ गोष्टी अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की गुगल हे सर्च इंजिन आहे आणि या सर्च इंजिनचा वापर आपल्यापैकी प्रत्येक सगळेच जण करत असतात. छोट्यातील छोटी गोष्ट आपण गुगलवर सर्च करत असतो आणि या गुगलच्या माध्यमातून वेगवेगळे माहिती शोधत त्याचा आधार घेत असतो. गुगल वर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहज रित्या आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येक जण गुगलचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो परंतु अनेकदा गुगल वर काय सर्च करावे व काय सर्च करू नये याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्यामुळे अनेक विपरीत परिणाम याला आपल्याला सामोरे जावे लागते.

आपल्यापैकी अनेकांना अनेक धोके किंवा घोटाळ्यांना सामोरे जावे लागते. आपल्यापैकी अनेकांना बँकेतील खाते त्याच्याबद्दलची माहिती सर्च करून आपण आपल्या अकाऊंटमध्ये खात्यात पैसे सुद्धा कमी झालेले आहेत अशा बातम्या सुद्धा अनेकदा ऐकलेल्या पाहिलेल्या शब्द आहेत म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की अशा नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण गुगलवर कधीच सर्च करू नये.

अनेक वेळा आपण गुगलवर सर्च बद्दल माहिती शोधत असतो आणि अशा वेळी त्याच गुगल पेज वर अनेक अशा काही माहिती उपलब्ध असतात ज्या फेक असतात म्हणजेच खोटे असतात अशावेळी आपण सरकारी साईट समजून आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपली व्यक्तिगत माहिती व अनेक संक्षिप्त स्वरुपातील माहिती येथे फील करत असतो आणि या सगळ्यामुळे आपल्याला भविष्यात धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो.

आपल्या सर्वांना माहितीच असेल की अनेक जण पासपोर्ट बनवण्याच्या नादामध्ये अनेक खोट्या वेबसाईट वर जाऊन आपले व्यक्तिगत माहिती नमूद करत असतात आणि यामुळे अनेकांना व्यक्तिगत माहिती चोरी होण्याची धोके सुद्धा निर्माण झालेले आहेत म्हणून सध्याच्या काळामध्ये अनेक संस्था आपल्या वेबसाईट बद्दल जनजागृती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यापैकी अनेकांना गुगल वर जाऊन कस्टमर केअर नंबर शोधण्याची सवय असते जर तुम्ही सुद्धा असे करत असेल तर आत्ताच सावध व्हा.

आपल्यापैकी अनेक जण एखाद्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधण्यासाठी गुगल सर्च करत असतात आणि अनेकदा जेव्हा आपण या नंबरच्या माध्यमातून कॉल करतो तेव्हा आपली व्यक्तिगत माहिती सुद्धा त्या कॉलच्या माध्यमातून कुठेतरी रेकॉर्ड होत असते आणि अनेकदा आपण जी काही माहिती देत असतो ती माहिती कुठेतरी जमा होत असते आणि याचाच उपयोग जे घोटाळे करणारे किंवा स्पॅमर असतात ते या माहितीचा दुरुपयोग करत असतात म्हणून जर तुम्हाला एखाद्या कस्टमर केअरचा नंबर जरा हवा असेल तर एखाद्या उत्पादनाच्या किंवा वेबसाईटच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट देऊनच तेथून कस्टमर केअरचा नंबर घ्या आणि नंतरच त्यांच्याशी संपर्क साधा.आ

पल्यापैकी अनेक जण शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवत असतात परंतु अनेकांना पैसा कसा वाढतो किंवा पैसा वाढवण्याची वेगवेगळे टिप्स कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती सर्च करण्याची सवय असते अशावेळी जर तुम्ही शेअर मार्केट संबंधित कोणती माहिती सर्च करत असाल तर ही भविष्यात धोक्याची घंटा असू शकते कारण की अनेक वेबसाईट ह्या खोट्या असतात आणि फसवे असतात ज्या अशा पद्धतीचा उपयोग करून आपली ऑफिशियल माहिती जमा करतात आणि तुमच्या अकाउंट मध्ये खाते व पैसे नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरतात.

जर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर आत्ताच सावधान व्हा त्याचबरोबर चुकून सुद्धा वेगवेगळे मोबाईल ॲप्लिकेशन सर्च करू नका, जेणेकरून त्या सर्चच्या माध्यमातून तुमच्या मोबाईल मधील माहिती वेबसाईटला पुरवली जाऊ शकेल. जर तुम्हाला कोणतेही एप्लिकेशन्स मोबाईल मध्ये हवे असेल तर मोबाईल मध्ये गूगल प्ले स्टोर अप्लिकेशन मध्ये जाऊन इन्स्टॉल करा.

सध्याच्या काळामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने समोर आलेली आहे की आपल्यापैकी अनेकांना छोट्या छोट्या समस्या व आजार होत असतात अशावेळी आपण डॉक्टरांकडे न जाता असेच सर्च करत असतो आणि गुगल वर उपलब्ध असलेल्या औषधांच्या आधारे आपण औषध खात असतो यामुळे अनेक मोठे मोठे आजार व मृत्यू सुद्धा उद्भवलेले आहेत तर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर आत्ताच काळजी घ्या.जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत असेल तर सुरुवातीला डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतरच औषधे विकत घ्या.

सध्याच्या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन शॉपिंग सेल आपल्याला पाहायला मिळतो आणि या ऑनलाइन शॉपिंग सेल ला फसूनच आपण आपली माहिती अनेकदा खोट्या वेबसाईट ला पुरवत असतो आणि या माहितीचा उपयोग करूनच या खोट्या वेबसाईट आपल्या बँकेतील पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर अनेक जण उत्सुकतेचा भाग म्हणून बॉम्ब कसे बनवायचे अशा पद्धतीच्या माहिती शोधत असतात अशा प्रकारची माहिती शोधणे सुद्धा तुमच्या जीवावर बेतू शकते म्हणून भविष्यात गुगल सर्चचा वापर करताना विशेष काळजी घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *