भांडण होत असताना आपले हात आणि पाय का कापायला लागते.? कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.!

भांडण होत असताना आपले हात आणि पाय का कापायला लागते.? कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहितीच असेल की जेव्हा दोन व्यक्तींचे एकमेकांसोबत भांडण होते तेव्हा व्यक्तींच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात व काही व्यक्तींच्या शरीरामध्ये कंपन सुद्धा होत असते. हे असे का घडते? या बद्दल तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा एखाद्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीसोबत जोरात भांडण होत असते अशावेळी व्यक्तीच्या शरीरामध्ये कंपन होऊ लागते हे कंपन कदाचित त्या व्यक्तीला आलेला रागामुळे सुद्धा होऊ शकते.

आजूबाजूला असे सुद्धा काही लोक आहेत की ज्यांनी जर एखादे भांडण किंवा आपल्या घरामध्ये एखादे भांडण होत असेल ते पाहिले तर त्यांच्या शरीरामध्ये कंपनी होऊ लागते आणि शरीरावर घाम सुद्धा फुटू लागतो. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही लोक असतात जे भांडणाला काहीच समजत नाही आणि असे सुद्धा काही लोक आहे जे भांडणाला खूपच महत्त्व देत असतात.छोट्या छोट्या गोष्टीवरून सिरियस होऊन जातात.

जी व्यक्ती या छोट्या मोठ्या गोष्टींना व भांडणाला अतिशय सिरीयसली घेते अशा व्यक्तींनाच शरीरामध्ये आपल्याला कंपन झालेले पाहायला मिळते. अशा प्रकारची कंपन अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये आवर्जून पाहायला मिळते असे लोक जास्त विचार करतात किंवा जे लोक अतिशय तणावग्रस्त परिस्थिती मध्ये जगत आहेत. अशा व्यक्तीं सोबत भांडण घडते तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये विशिष्ट बदल होऊ लागतात आणि त्यामुळेच त्यांचे शरीरामध्ये कंपन सुद्धा होऊ लागते.

जे लोक गरजेपेक्षा जास्त भावनिक असतात, छोट्याश्या गोष्टी मनाला लावून घेतात अशा प्रकारच्या व्यक्तींना सुद्धा शरीरामध्ये कंपन समस्येला सामोरे जावे लागते. आपल्यापैकी काही व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर मद्यपान, तंबाखू सेवन करत असतात अशा व्यक्तीं सुद्धा अनेकदा भांडण होत असतांना किंवा जर भांडण पाहिले तरी त्यांच्या शरीरामध्ये कंपन होत असते, शरीरामध्ये कंपन होणे हा काही मोठा आजार नाही, अशा प्रकारचे समस्येला एक शारीरिक बदल सुद्धा समजले जाते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती सोबत भांडण करत असतो अशावेळी आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोनची पात्रता वाढू लागते.

या परिस्थितीमुळे आपल्या हृदयाचे ठोके वाढतात आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील रक्तभिसरन सुद्धा वाढू लागते आणि एका ब्लड प्रेशर उच्च पातळीवर जातो आणि आपल्या श्‍वासाची गती सुद्धा वाढू लागते आणि अशावेळी आपल्या शरीराला एक सिग्नल मिळतो तर तुम्ही भांडण करा किंवा भांडण न करता पळून जा. अशा वेळी आपल्या शरीरातील मांस पेशी गरजेपेक्षा जास्त सक्रीय होऊन जातात यामुळेच आपले शरीर कंपन करू लागते. त्याचबरोबर जशी परिस्थिती बदलते तसतसा तिच्या शरीरावरचा सध्याचा बदल घडू लागतो आणि कालांतराने तुमचे शरीर नॉर्मल होऊ लागते अशा वेळी शरीरामध्ये कोणत्याच प्रकारची कंपन होत नाही अशा प्रकारची स्थिति तुमच्यासोबत वारंवार घडत असेल तर तुम्हाला एखाद्या मानसिक तज्ञ ची भेट घेणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे ,अशा परिस्थितीवर व शारीरिक बदल यावर डॉक्टर योग्य ते उपचार करून तुम्हाला आवश्यक तेथे गोळ्या औषधे सांगतील. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यसन करत असाल तर अशावेळी डॉक्टरांना त्या विषयाबद्दल सांगणे गरजेचे आहे यानुसार डॉक्टर तुम्हाला औषध गोळ्या देऊ शकतील.बहुतेक वेळा ज्या व्यक्ती जास्त प्रमाणामध्ये दारूचे सेवन ,अल्कोहोलचे पदार्थ सेवन करत असतात अशा व्यक्तींना त्वरित राग येत असतो आणि त्यांचे नियंत्रण आपल्या रागावर राहत नाही अशा वेळी भांडण खूप जोरात होत असते आणि शरीरांमध्ये कंपन सुद्धा होऊ लागते.

ही परिस्थिती तुमच्या शरीरांमध्ये वारंवार होत असेल तर तुम्हाला योग्य तो व्यायाम योगा करणं गरजेच आहे ,याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे जीवन नॉर्मल करू शकता आणि योगा च्या माध्यमातून तुमचे मानसिक संतुलन सुद्धा चांगले राहण्यासाठी मदत होऊ शकते.जर तुम्हीसुद्धा या समस्येला सामोरे जात असेल तर आजच डॉक्टरांना भेटा आणि तुमचे जीवन आनंदाने सकारात्मक दृष्टिकोनातून जगा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *