आयुर्वेदिक उपचार चांगले कि मेडिकल.? चांगल्या आरोग्यासाठी एकदा नक्कीच वाचा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो माणूस हा बुद्धीमान प्राणी आहे त्याने स्वत:चे आयुष्य आरामात जावे या साठी अनेक छोटे-मोठे आविष्कार केले आहेत आणि करत राहतो. माणसाने आपले जीवन किती ही सोपे करुन ठेवले असले तरी ही जर त्याचे आरोग्य ठीक नसेल तर या सगळ्या सोयी-सुविधांचा काही ही फायदा होत नाही. आजारी व्यक्ती मेहनत करू शकत नाही त्याचा विकास होणे शक्य ही नाही.
शारीरिक बाजू पडल्यामुळे माणसाची आर्थिक बाजू पण ढासाळते व पैसा नसल्या कारणाने माणसाची मानसिक स्थिती सुद्धा बिकट होवून जाते. म्हणून माणसाने नेहमी निरोगी रहावे त्याने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तरी ही वाढत्या प्रदूषणाच्या अभावी मानवाला काही ना काही आजार हा झालेलाच असतो. मग त्याचे निवारण करण्यासाठी आपल्याला डॉक्टर गोळ्या आणि औषधे यांची गरज भासते.
औषधांमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत त्यातील महत्वाचे भारतभर चालणारे दोन प्रकार म्हणजे ऍलोपॅथी व होमोपॅथी शुद्ध मराठी भाषेत यांना समान्य औषधे व आयुर्वेदीक औषधे म्हटले जाते. मात्र कोणती औषधे आपल्या शरीरास चांगली व कोणती हानिकारक हा प्रश्न अनेकांना पडतो याचे उत्तर अगदी सोपे आहे व हे उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्की लागली असेल म्हणूनच आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो प्रत्येक घरात कोणी ना कोणी हे आजारी असतच वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना वेग वेगळ्या प्रकारचे कोणते ना कोणते आजार हे होतच असताच दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला औषधे लिहून देतात ही औषधे भारतात मुख्यतः दोन प्रकारची असतात एक आयुर्वेदीक व एक समान्य औषधे. आयुर्वेदीक औषधे हे मूळ औषध असते त्यात कोणत्या ही प्रकारचे मिश्रण नसते एकाच गुणधर्मा पासून आयुर्वेदीक औषधे बनवली जातात. अडुळसा औषध, ज्येष्ठ मध, पंचाअरिष्ट, काढा, चूर्ण इत्यादी यांचा समावेश होतो.
तसेच समान्य जी औषधे असतात ती अनेक ड्र-ग च्या मिश्रणाचे स्वरूप असते. आणि ही औषधे थेट आपल्या दुखण्यावर प्रभाव पाडतात. ओमी, रीबाजेन, टेल्मिकाईंड इत्यादी हा समान्य गोळ्या आहेत. तुम्ही जर आयुर्वेदीक औषधे घेत असाल तर त्याचा एक फायदा आहे हे आपल्या शरिरासाठी अजिबात घातक अथवा हानिकारक ठरत नाहीत मात्र याचा प्रभाव दिसण्यास वेळ जातो.
सोबतच जर तुम्ही समान्य गोळ्या औषधे घेत असाल तर ते तुम्हाला त्वरित फायदा देतील मात्र या गोळ्या जास्त प्रमाणात खाल्यास आपल्या किडनीला या गोळ्यांचा त्रास होवू शकतो. सोबतच आयुर्वेदीक औषधे खाल्याने पित्ताचा त्रास होत नाही परंतू समान्य गोळ्या किंवा कैपसूल्स खल्यास आपल्याला पित्त होवू शकते म्हणूनच कोणता ही डोस लिहून देताना डॉक्टर सोबत पित्त न होण्याच्या गोळ्या ही लिहून देतात.
मित्रांनो माणूस अफाट पैसा कमवतो मौज-मजा ही करतो मात्र श्रीमंत असूनही त्याचे आरोग्य जर ठीक नसेल तर या पैशांचा काहीच उपयोग नाही. म्हणूनच निरोगी राहा बाहेरील अन्न उघड्यावरचे अन्न टाळा. दिवसातून 30 मिनिटे तरी योगा नाहीतर व्ययाम करा. भरपूर पाणी प्या. आपल्या आहारात सर्व प्रकारच्या पदार्थांचे सेवन करा. तुमच्या शरीराला जीवनसत्वे, प्रथीने, विटामीन आणि आयरन भरपूर प्रमाणात द्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.