९०% लोकांना माहिती नसेल ट्रकच्या मागे लिहिलेल्या या गोष्टीचा खरा अर्थ.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आजच्या या युगात माणूस खूप प्रगती करत आहे. शिवाय जगात वाढणारी लोक संख्या चिंतेचा विषय आहे. या अफाट गर्दी असणार्या पृथ्वीवर माणूस सर्व लोकांना राहण्यासाठी मोठ्या मोठ्या इमारती बांधतो परंतू मित्रांनो तुम्ही पहिला असेल जिथे ही इमारतीचे काम चालू असते जिथे मोठ-मोठ्या क्रेन आणि मशीन असतात तिथे हिरव्या रंगाचा कापड बांधलेला असतो शिवाय मोठ्या रस्त्याचे बांधकाम जिथे चालू असते तिथे देखील हिरव्या रंगाचा कपडा बांधलेला असतो.तुम्ही कधी विचार केला आहे का अस का केला जात ? कित्येक लोकांना या मागचे कारण माहित नसेल. चला तर या लेखात आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देखील देऊन टाकू.
मित्रांनो तुम्ही पाहिले असेल कुठे मोठे रस्त्याचे अथवा इमारतीचे काम चालू असेल तर तिथे मोठा हिरव्या रंगाचा कपडा बांधला जातो. असे करण्यामागे एक नाही तर अनेक कारणे आहेत. हा हिरवा कपडा लांबून देखील स्पष्ट दिसू शकतो म्हणून याचा वापर मोठ्या इमारत अथवा रस्त्याच्या कामांमध्ये केला जातो. सोबतच हा हिरवा रंग आपल्या डोळ्यांना आराम देतो म्हणूनच आपल्या घरच्या भिंतीना देखील खूप ठिकाणी हिरव्या रंगाने रंगवले जाते.
सोबतच जो कामगार वर्ग आहे तो जेव्हा कामामध्ये असतो तेव्हा हा हिरवा रंग त्यांचे मन विचलीत व्हायला देत नाही. सोबतच हा रंग लांबून देखील सुद्धा अगदी स्पष्ट दिसतो म्हणून हिरव्या रंगाचा कपडा अगदी सगळीकडेच जिथे बांधकाम चालू आहे तिथे आपल्याला दिसून येतो. या हिरव्या रंगाच्या कपडाची सुरवात ब्रिटिश काळात झाली होती.
मित्रांनो सोबतच तुम्ही मोठ्या ट्रकच्या मागे अथवा मोठ्या वाहनांच्या मागे HORN OK PLEASE असे लिहलले असल्याचे पाहिले असेलच शिवाय हे ठिक ठिकानी हिरव्या रंगात लिहलले असते मात्र या मागचे कारण तुम्हाला माहित आहे का ? मित्रांनो HORN OK PLEASE हे वाक्य हिरव्या रंगात लिहण्याचे उद्देश म्हणजे हिरवा रंग प्रकाशात उठून दिसतो जेव्हा मागच्या वाहनाची लाईट या वाक्यावर पडते तेव्हा समोर एखादी गाडी आहे हे आपल्याला त्वरित कळते.
तसेच जेव्हा पण आपण मोठी गाडी रस्त्यात पाहतो तिला कापून म्हणजेच ओवरटेकर करताना आधी हॉर्न द्यावे मग समोरच्या गाडीने लाईट अथवा बाजू दिल्यावरच मग त्या गाडीच्या पुढे आपण ओवरटेक करुन जावे असे या HORN OK PLEASE चा अर्थ आहे. सोबतच वाहन चालवताना आपण नेहमी सतर्क राहिले पाहिजे. वेगाच्या भरात आपण आपल्या वाहनावरचे आपले संतुलन बिघडवतो आणि मग मोठे अपघात होतात. म्हणूनच सगळ्या नियमांचे पालन करुन वाहन चालवावे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.