अल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाताय.? तर सावधान; नाहीतर द्याल रोगांना आमंत्रण.!

अल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाताय.? तर सावधान; नाहीतर द्याल रोगांना आमंत्रण.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो Aluminum च्या भांड्यामधे शिजवलेले अन्न आपण का खाऊ नये? किंवा खाणाऱ्यांनी कोणती दक्षता बाळगावी हि माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आपले शरीर हे आपण घेत असलेल्या अन्नावर अवलंबून असते. त्यामुळे आपण जे खातो ते किती पोषक आणि शरीरास सुरक्षित ठेवण्यास समर्थक आहे हे पाहणे आवश्यक असते.

आपण दिवसातून २ वेळा जेवण करत असाल पण हे जेवण आपण कोणत्या भांड्यामधे शिजवले आहे हे पाहत नाही. आपल्याला जेवण करण्याशी घेणेदेणे असते. परंतु हे आपण पाहणे आवश्यक आहे कि आपण Aluminum चा तर वापर करत नाही ना? कारण बऱ्याच प्रमाणात आपण बऱ्याच ठिकाणी Aluminum च्या भांड्यामधे अन्न शिजवले जाते.

आज सऱ्हास प्रत्येकाच्या घरामध्ये नाही तरी ९० टक्के घरांमध्ये आपण बघतो कि Aluminum ची भांडी आहेत वे ते आपण रोजच्या जेवण करण्यामध्ये वापरतो. परंतु तुम्हाला माहिती नसेल कि याच Aluminum च्या भांड्यामधे शिजवलेल्या अन्नातुन आपण आपल्या शरीरामध्ये विष पाठवतो आहे. अलीकडे झालेल्या रिसर्च नुसार हे सिद्ध झाले कि Aluminum बरेच आजार होतात.

Aluminum ने अलसायम होण्याची जास्त संभावना असते. ज्यामुळे तुमच्या शरीराची पचन शक्ती बिघडू शकते, अल्युमिनियम चे केमिकल आपल्या मेंदूला कमजोर बनवू शकते. ज्यामुळे तुमची समरणशक्ती कमी होऊन आजारसुद्धा बळावू शकतात. किडनीवर याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो.

कोणतेही डॉक्टर तुम्हाला हे सांगणार नाहीत कि तुम्हाला हा आजार अल्युमिनियम ने झाला आहे, किंवा अल्युमिनियम च्या भांड्यामधे तुम्ही शिजवलेले अन्न घेतलेले आहे त्यामुळे तुम्हाला आजार झालेला आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील शक्ती क्षीण होऊन जाते. बरेचसे लोक आपण बघतो कि ते अल्युमिनियम च्या भांड्यात शिजवलेला चहा घेतात.

प्रेशर कुकर मध्ये जेवण कधीच करू नका, याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. प्रेशर कुकर मध्ये शिजवलेल्या अन्नाला सूर्य किंवा हवा याचा स्पर्श होत नाही. कोणतेही अन्न शिजवताना त्या अन्नाला हवा किंवा सूर्याचा स्पर्श होणे खूप गरजेचे असते असे शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे. CDRI म्हणजे ” सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट “या संस्थेने यावर रिसर्च केला आणि त्यामधून बऱ्याचशा गोष्टी बाहेर आलेल्या आहेत.

कोणीच टीव्ही किंवा मीडियासमोर बोलायला तयार नसतो कि अल्युमिनियम च्या भांड्यात शिजवलेले अन्न हे किती घातक आहे. प्रेशर कुकर बघतो तर ९० टक्के हे अल्युमिनियम चे बनलेले असते. शास्त्रज्ञांच्या मते जेवण ठेवण्याकरिता किंवा शिजवण्याकरिता सर्वात खराब जर कोणतं भांड असेल तर ते अल्युमिनियम चे आहे. कारण यासारखे घातक मेटल कोणतेच नाही.

१८ वर्ष यावर संशोधन झाले आणि आजही त्यावर संशोधन चालू आहे. अल्युमिनियम च्या भांड्यातील जेवण आपण जर करत असाल तर आपल्याला डायबिटीज,टीबी,अस्थमा यांसारख्या समस्या उदभवण्याची संभावना जास्त राहते. संशोधनानुसार हेही समजले आहे कि ४० प्रकारचे आजार यामुळे तुम्हाला होऊ शकतात, त्याकरता प्रेशर कुकर सर्वात जास्त कारणीभूत आहे.

त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जाते म्हणजेच रोग आपल्याला लवकर लागतात. आपल्या देशामध्ये आपण बघतो कि अल्युमिनियम साधारणतः सव्वाशे वर्ष अगोदर आलेत ज्यावेळी इंग्रजांचे भारतावर राज्य होते. त्यांनी जेल मधील कैद्यांच्या जेवण शिजवण्याकरिता अल्युमिनियम चे भांडे तिथे वापरले. आणि आजही आपण पाहतो कि तेच भांडे इंग्रज निघून गेले तरी अल्युमिनियम चे भांडे जेल मधून आपल्या घरापर्यंत आलेले आहे.

अल्युमिनियम चे भांडे सर्वात जास्त गरिबांच्या घरामध्ये आहेत. कारण ते स्वस्थ आहे पण स्वास्थ्याकरिता चांगले नाही त्यामुळे आपल्याला अस्थमा यासारखे आजार होऊ शकतात. प्रेशर कुकर अन्न लवकर शिजवण्याचे काम करते म्हणजे अतिरिक्त प्रेशर ते अन्नावर आणते. पण अन्न उशिरा शिजत असेल ते आपल्यासाठी चांगले आहे, कारण ती प्रक्रिया स्लो आहे अन्नावर अतिरिक्त दबाव पडत नाही. अन्न उकळून खाणे खूप महत्वाचे असते. कुकर मध्ये अन्न उकळत नाही तर ते प्रेशर ने फक्त शिजते व गरम होते आणि ते आपण खातो.

मित्रांनो अशाप्रकारे जर आपण अल्युमिनियम च्या भांड्यात शिजवलेले अन्न खात असाल तर ते लवकर सोडून द्या. मातीच्या भांड्यामधे किंवा स्टील च्या भांड्यामधे आपण अन्न खावं आणि आपले स्वास्थ्य सांभाळावे. तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *