झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवणे असते शुभ.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत, तसे तर झोप ही प्रत्येकाला आवडत असते, झोप ही अनेकांचा जीव की प्राण असतो परंतु झोपे बद्दल अनेक अशा काही गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत त्याबद्दल आपल्याला फारशी काही माहिती नसते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.या माहितीच्या आधारे अनेक नवनवीन गोष्टी तुम्हाला जाणून घेता येणार आहेत. तुम्हाला डोके कोणत्या दिशेला करून झोपल्याने सफलता विद्या व आरोग्य मिळते हे सांगणार आहे.
मित्रांनो आपण रात्री झोपतो तेव्हा आपली सुश्र अवस्था असते म्हणजे आपले डोके संपूर्ण शरीराला दुरुस्त करण्याचे काम झोपेत करीत असते त्यातून दुसऱ्या दिवशी आपल्याला काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते. आपण झोपेत असताना आपले डोके हे नीट पूर्व-दक्षिण दिशेला असावे.विशेषत: विद्यार्थ्यांनी पूर्व दिशेला डोके करून झोपावे कारण यामुळे आपल्याला विद्येचा लाभ मिळतो.
आपले मन अभ्यासात एकाग्र होते तर दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने आपल्याला धनलाभ होतो. प्रत्येक गोष्टीत सफलता प्राप्त होते. आपले शरीरही निरोगी राहते. पश्चिम दिशेला डोके करून झोपल्यास आपल्याला चिंता जाणवते तर उत्तर दिशेला डोके करून झोपल्यास आपले शरीर आणि मन आपण आजारी पडते. सकाळी उठल्यानंतर थकल्यासारखे वाटते.विष्णू पुराणात झोपण्याच्या योग्य अशी माहिती दिलेली आहे.
कोणत्या दिशेला डोके करून झोपावे? आता आपण कशा पद्धतीने झोपावे हेच जाणून घेतले परंतु कशा पद्धतीने झोपू नये हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. रात्री झोपताना कधीही नी वस्त्र कधी झोपू नये. अंतर्वस्त्रे घालूनही झोपू नये तसेच तुटलेला पलंग असेल तर त्यावर ही झोपू नये यामुळे आपल्या आयुष्याचा नाश होऊन आयुष्यमान कमी होते, त्याशिवाय आपल्या उंचीपेक्षा छोट्या पलंगावर किंवा खाटेवर त्यातून आपले पाय खाली लोंबत असतील अशा पलंगावर ही झोपू नये. धूळ ,घाण असलेल्या पलंग वर ही झोपू नये त्याच बरोबर खाटेवर झोपत असताना कोणतेही कपडे मोबाईल व अन्य वस्तू आजूबाजूला असू नये.
मृ’त्यू झालेल्या व्यक्तीला अंतिम समय बांबूच्या तिरडीवर झोपवतात म्हणून बांबूच्या पलंगावर झोपणे अशुभ असते तसेच काही खात असताना खाता खाता तसेच झोपू नये. आपण जे खात आहोत ते संपूर्ण खाऊन पाण्याने गुळणी करून तोंड स्वच्छ करून मगच झोपावे त्याबरोबरच तोंडात पानाचा विडा असेल तर तो थुंकून मगच झोपावे. झोपताना केसांमध्ये गजरा किंवा फुल असू नये किंवा टोपी घालून झोपू नये.
जर पुरुष कपाळाला टिळा लावत असेल तर तो पुसून च झोपायला हवे. यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते त्या बरोबरच गच्च अंधार करूनही झोपू नये.झोपताना मंद प्रकाश घरात असावा.आपण झोपताना आपले डोके शरीराच्या लेवल पेक्षा थोडे उंचावर असावे. खूप उंचावर सुद्धा डोके नसावे. थोडीशी का होईना उशी डोक्याखाली जरूर असावी यामुळे आपल्या शरीराला रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आणि कोणी राहत नाही, जास्त वापर नाही अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी एकटे कधीही झोपू नये त्याचबरोबर अशा मंदिरांमध्ये रात्री झोपण्याची मनाई केली जाते अशा मंदिरात मध्ये सुद्धा रात्री झोपू नये.
काही झाडे दिवसभर कार्बन डाय-ऑक्साइड शोषतात व ऑक्सिजन सोडतात तर काही झाडे रात्री कार्बन डाय-ऑक्साइड सोडत असतात म्हणून रात्री शक्यतो झाडाखाली झोपू नये. आता आपण या लेखांमध्ये झोपण्याची कोणती योग्य वेळ आहे व कोणत्या वेळेला झोपू नये याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्यावेळेस दिवस व रात्र एकत्र येतात अशी वेळ म्हणजे सूर्यास्तापूर्वी ची वेळ त्यालाच आपण संध्याकाळी असे म्हणतो.
यावेळेला कधीही झोपू नये. यावेळी झोपल्याने आपले शरीर रोगी बनते. आपल्या मेंदूची चेतना बंद पडते आणि आपण स्वत: चुकीचे निर्णय घेऊ लागतो म्हणून सकाळी, सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी कधी झोपू नये नाहीतर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये अयशस्वी होऊ लागतो. तसे पाहायला गेले तर दुपारचे झोपण्याची वेळ सुद्धा अमान्य केलेली आहे परंतु जर तुम्ही काही काम करत असाल, थकलेले असाल, आजारी असाल, रात्री व्यवस्थित झोप झाली नसेल तर अशावेळी तुम्ही दुपारी थोडा वेळ झोपू शकता.
दिवसा सारखी झोप घेतल्याने आपले शरीर आजारी बनते. जर तुम्ही आजारी असाल तर अशा वेळी दिवसा झोपू शकता परंतु निरोगी माणसाने दिवसा कधी झोपू नये त्याच बरोबर कुर्मा पुराणांमध्ये असे सांगण्यात आलेली आहे की गाढ झोपे मध्ये असलेल्या व्यक्तीला कधीच उठवू नये परंतु नीती शास्त्रानुसार जर झोपलेली व्यक्ती भुकेली असेल, विद्यार्थी असेल, त्या व्यक्तीला कुठेतरी बाहेर जायचे असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही जागवू शकता.
तर हे होते झोपेविषयी काही महत्त्वाचे नियम जे आपल्याला पाळणे अत्यंत गरजेचे आहेत त्याचबरोबर जरी आपल्याला झोप गरजेची असली तरी जास्त झोप सुद्धा आपल्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकते म्हणून योग्य वेळमध्ये झोप घेणे आपल्या शरीरासाठी चांगले ठरते म्हणून तुम्ही सुद्धा योग्य वेळ पाहून झोप घेतली तर तुमचे आयुष्य सुद्धा चांगले राहू शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.